Home » संभाजीराजे छत्रपतीकडून ‘स्वराज्य संघटनेची स्थापना’, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

संभाजीराजे छत्रपतीकडून ‘स्वराज्य संघटनेची स्थापना’, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

by Team Gajawaja
0 comment
Sambhaji Raje Chhatrapati
Share

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पुणे येथील आयोजित पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. सामाजिक कार्य करण्यासाठी आपण ‘स्वराज्य’ संघटनेची (Swarajya Organization) स्थापना करत असल्याची घोषणा त्यांनी केली. आगामी काळात ही संघटना एक राजकीय पक्ष म्हणूनही उदयास येऊ शकते. तशी माझी तयारीही आहे, असे सूचक विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

याच वेळी त्यांनी आगामी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections) अपक्ष लढविण्याची घोषणाही केली आहे. आपण यापुढे कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. मात्र, राज्यसभेसाठी आवश्यक संख्याबळाचे गणीत पाहता सर्वपक्षांनी मला राज्यसभेवर पाठवावे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.

आपण राज्यसभा अपक्ष लढणार आहोत. संधी मिळाली तर भविष्यात लोकसभाही लढू शकतो, असे सूतोवचही त्यांनी या वेळी केली. महाराष्ट्रात दोन, तीन लोक असे आहेत राज्याते कोणत्याही मतदारसंघातून लढू शकता, असेही ते या वेळी म्हणाले.

chhatrapati sambhaji raje: chhatrapati sambhaji raje hunger strike Live  Updates : संभाजीराजेंचे मुंबईत उपोषण, पंढरपूरमध्ये पाठिंबा - live updates  chhatrapati sambhaji raje hunger strike for maratha reservation ...

====

हे देखील वाचा: मैत्रिचा हात पुढे करुन राष्ट्रवादीने पाठीत सुरा खुपसलाय – नाना पटोले

====

‘स्वराज्य’ संघटनेच्या माध्यमातून समाजाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल. स्वराज्य संघटनेसाठी अद्याप कोणताही रंग, चिन्ह ठरवले नाही. त्यासाठी महाराष्ट्रभर दौरे काढून लोकांशी करणार आहे. काही असले तरी हृदयात असलेला केशरी पट्टा तर कोणी काढू शकत नाही.

छत्रपती घराण्यांवर असलेले प्रेम मला या आगोदरच पाहायला मिळाले आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी या आधीही महाराष्ट्र पिंजून काढला आहे. राज्यातील जनतेने छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केले.

Pune: Sambhaji Raje Launches New Organization, Will Contest Rajya Sabha  Election As Independent Candidate – Punekar News

====

हे देखील वाचा: शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

====

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून विनंती केली की आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावे. म्हणून 2016 ला मी पद स्वीकारल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. त्या दोघांचेही संभाजीराजेंनी यावेळी आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विचारांवर माझी पुढील वाटचाल असणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.