Home » Raj and Uddhav Thackeray : राज आणि उद्धव ठाकरे यांचा ‘विजयी मेळावा’

Raj and Uddhav Thackeray : राज आणि उद्धव ठाकरे यांचा ‘विजयी मेळावा’

by Jyotsna Kulkarni
0 comment
Raj and Uddhav Thackeray
Share

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघं बंधू एकत्र येणार येणार अशी चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु होती. ठाकरे बंधूनी एकत्र यावे अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती. अखेर आज तो दिवस उजाडला आहे तब्बल १९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर वरळी डोममध्ये ऐतिहासिक सभा सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आले आहे. आज ५ जुलै रोजी मुंबईतील वरळी डोममध्ये भव्य सभा होणार आहे. या सभेच्या व्यासपीठावर उद्धव आणि राज यांना महाराष्ट्राची जनता एकत्र पाहणार आहे. थोड्याच वेळात वरळीतील एनएससीआय डोममध्ये विजयी मेळाव्याच्या मंचावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतील. (Marathi News)

१६ एप्रिल २०२५ रोजी, राज्यातील महायुती सरकारने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तिसरी भाषा शिकवण्यासाठी सक्ती करण्याचा सरकारी आदेश जारी केला. या आदेशाविरोधात संपूर्ण महाराष्ट्र्रामध्ये विरोधी पक्ष आणि मराठी संघटनांनी आवाज उठवला. हिंदी लादण्याचा सरकार प्रयत्न असल्याचे म्हणत या हिंदी भाषेच्या सक्तीला तीव्र निषेध केला. अखेर सरकारने देखील २९ जून रोजी दबावाखाली सरकारने हा आदेश मागे घेतला. रद्द करण्यासाठी दोन्ही सेनांनी ५ जुलै रोजी मोर्चा कढण्याचे आवाहन केलेले. मात्र त्यापूर्वीच सरकारने हे आदेश मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता ठाकरे बंधू एकत्रितपणे विजयी मेळावा घेत आहेत. (Todays Marathi HEadline)

ठाकरे बंधू शेवटचे २००५ मध्ये मालवण पोटनिवडणुकीदरम्यान मंचावर एकत्र आले होते. पण त्याच वर्षी राज ठाकरे यांनी शिवसेनेशी संबंध तोडत २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येत जनतेला या मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरात ‘आवाज मराठीचा’ असा संदेश देत बॅनरबाजी तसेच या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रत्येक मराठी प्रेमी, साहित्यकार, लेखक, कवी, शिक्षक, संपादक आणि कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी या डोममध्ये मोठी आसन व्यवस्था देखील करण्यात आहे. वरळी डोमच्या बाहेर देखील एलईडीची व्यवस्था करण्यात आली आहे. विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधूंचे जागोजागी बॅनर्स लावण्यात आले आहेत. ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो ठेवण्यात आले आहेत. हिंदी सक्तीच्या या सरकारी आदेशाविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी देखील पाठिंबा दिला होता. मात्र असे असले तरी आजच्या या विजयोत्सवाला काँग्रेस हजर राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे किंवा जितेंद्र आव्हाड हे कदाचित या मेळाव्याला उपस्थित राहू  शकतात.(Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.