ब्रिटेनची महाराणी क्विन एलिजाबेथचे निधन ८ सप्टेंबरला बाल्मोरल कॅसलमध्ये वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. तिच्या मृत्यूच्या ११ दिवसानंतर १९ सप्टेंबर २०२२ रोजी राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. एलिजाबेथ यांच्या निधनानंतर तिचा मुलगा प्रिंस चार्ल्स ब्रिटेनचा राजा झाला आहे. याच महिन्यात ६ मे ला त्यांचा राज्याभिषेक झाला होता. त्यासाठी जवळजवळ एक हजार कोटी रुपयांचा खर्च केला होता. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार राणीच्या अंत्यसंस्कारासाठी युके सरकारने जवळजवळ १६२ मिलयन पाउंड म्हणजेच एक हजार कोटी रुपयांचा खर्च केला होता. (Queen Elizabeth II)
युके सरकारने माहिती देत असे म्हटले की, क्विन एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनाचा १० दिवस कार्यक्रम होता. ज्यामध्ये एक हजार कोटी भारतीय रुपये खर्च झाला. महाराणीच्या अंत्यसंस्कारासाठी जगभरातील लाखो लोकांनी उपस्थिती लावली होती. राजकोषाचे मुख्य सचिव जॉन ग्लेन यांनी असे म्हटले की, राजकीय अंत्यसंस्कार फार मोठा राष्ट्रीय महत्वाचा क्षण होता.

तर महाराणी एलिजाबेथ द्वितीय युके मधील सर्वाधिक काळ राहिलेली महाराणी होती. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार तिच्या शोक कार्यक्रमात होम ऑफिस ७४ मिलियन पाउंड आणि संस्कृती. मीडिया आणि क्रिडा विभाग ५७ मिलियन पाउंड खर्च केले होते. याच दरम्यान जवळजवळ दीड लाख लोकांनी तिच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थिती लावली होी. महाराणीनेला बर्कशायरच्या विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्ज चॅपलमध्ये दफन करण्यात आले होते. युके सरकारने विविध पद्धतीने खर्च केला. ज्यामध्ये सुरक्षा, खानपान आणि राजकीय खर्चाचा समावेश आहे.
ज्या वेळी महाराणीचे निधन झाले तेव्हा तिचे वय ९६ वर्ष होते. तर २०२१ मध्ये तिचा पती प्रिंस फिलिंप यांचे निधन झाले होते. त्यावेळी त्यांचे सुद्धा वय ९६ वर्षच होते. क्विन एलिजाबेथ केवळ २५ व्या वर्षी १९५२ मध्ये तिला महाराणीचा ताज घातला गेला होता. तिच्या निधनानंतर तिचा मुलगा प्रिंस चार्ल्स ब्रिटेनचा नवे किंग झाले आहे. त्यांना किंग चार्ल्स तृतीय असे म्हटले जातेय. तर त्यांची पत्नी कॅमेला आता डचेस ऑफ कॉर्नवालने ओळखली जाईल. (Queen Elizabeth II)
हेही वाचा- तहव्वूर राणाला भारतात आणणार…
तर भारतावर २०० वर्ष शासन करणाऱ्या ब्रिटेनच्या रॉयल फॅमिलीचा इतिहास फार जुना आहे. खरंतर सन् १६०० मध्ये जेव्हा भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती तेव्हा ब्रिटेनमध्ये महाराणी प्रथमची हुकूमत होती. तिच्यानंतर जेम्स प्रथम, चार्ल्स प्रथम, चार्ल्स द्वितीय, जेम्स II व VII, विलियम III व II और मैरी II, एनी, जॉर्ज प्रथम, जॉर्ज द्वितीय, जॉर्ज तृतीय आणि जॉर्ज IV यांच्या नंतर विलियम चतुर्थने १७६५ ते १८३७ पर्यंत ब्रिटेनची राजगादी सांभाळली. विलियम चतुर्थच्या शासन काळातच इलाहाबाद मध्ये करारानंतर भारतात ब्रिटिश शासनाचा पाया पडला गेला.