ब्रिटेनच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनासह एका युगाचा सुद्धा अंत झाला आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या आणि ८ सप्टेंबरला त्यांचे निधन झाले आहे. महाराणी एलिजाबेथ द्वितीय स्टॉकलँन्डच्या बाल्मोरल येथे होत्या. या दरम्यान त्यांचा मुलगा प्रिंस चार्ल्स बाल्मोरल मध्ये महाराणी यांच्यासोबत होते. आता त्यांच्या निधनानंतर ते ब्रिटेनचे पुढील राजा होणार आहेत.
एलिजाबेथ द्वितीय यांनी ब्रिटेनवर दीर्घकाळ राज केले. त्यांनी ७० वर्ष शासन केले. महाराणी १९५२ मध्ये गदीवर बसल्या आणि त्या अभूतपूर्व सामाजिक परिवर्तनाच्या साक्षीदार होत्या. त्यांच्या निधनानंतर आता सर्वात मोठा मुलगा आणि उत्ताराधिकारी चार्ल्स १४ राष्ट्रमंडळ क्षेत्रांच्या प्रमुख रुपात त्यांच्यावर अंत्यसंस्कार आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. डॉक्टरांच्या द्वारे महाराणी यांच्यावर देखरेख ठेवल्यानंतर चार्ल्स आणि महाराणी यांच्या घरातील निकटवर्तीय सदस्य एबरडीनच्या जवळ बालमोरल येथे पोहचले होते.
तर एलिजाबेथ द्वितिय यांनी २ जून १९५३ रोजी ब्रिटेनची राजगादी सांभाळण्यास सुरुवात केली होती. याचसोबत त्यांनी ब्रिटेन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँन्डसह कॉमनवेल्थ देशांच्या सुद्धा राणी झाल्या होत्या. त्याचसोबत त्यांना आणखी एक अधिकार मिळाला तो म्हणजे वर्षभरात दोन वेळा वाढदिवस साजरा करण्याचा. ब्रिटेनच्या इतिहासाच याचे कारण सुद्धा सांगितले आहे.
खरंतर ब्रिटेनच्या महारामी एलिजाबेथ द्वितीय यांचा वास्तविक वाढदिवस २१ एप्रिलला साजरा केला जातो, मात्र ब्रिटेनमध्ये राजगादी सांभाळणाऱ्या राजा किंवा राणीसाठी दुसऱ्या जन्मदिवसाचे खास महत्व असते. हा दुसरा जन्मदिवस त्यांचा अधिकृत जन्मदिवस असतो. दुसऱ्या दिन्मदिवसासाठी एक खास दिवस ठरवला जातो. त्यावेळी मोठा सोहळा आयोजित केला जातो. ब्रिटनेमध्ये राजगादी सांभाळणाऱ्या राजा किंवा राणीचा जून महिन्ययात जन्मदिवस साजरा केला जातो, कारण त्यांच्या दृष्टीने तेव्हा उत्तम वातावरण असते.
हे देखील वाचा- आणि भारतात आलेले ओबामा तब्बल ११ मिनिटं गाडीतच बसून राहिले
ब्रिटेनच्या महाराणीच्या मुकुटावरील कोहिनूर हिऱ्याचे काय होणार?
रिपोर्ट्सनुसार महाराणींच्या निधनानंतर ब्रिटेनचे राजा झालेले किंग चार्ल्स तृतीय यांची पत्नी डचेज ऑफ कॉर्नवेल कॅमिला यांना दिला जाणार आहे. डचेज ऑफ कॉर्नवेल आता क्वीन कंसोर्टच्या नावाने ओळखला जाणार आहे. त्यांना महाराणींचा अत्यंत महागडा असलेल्या कोहिनूरच्या हिऱ्याचे मुकुट दिले जाणार आहे.(Queen Elizabeth II)
खरंतर महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांनी याच वर्षाच्या सुरुवातीला अशी घोषणा केली होती की. कॅमिला यांना क्विन कंसोर्टच्या नावे ओळखला जावा. दरम्यान, ७५ वर्षीय कॅमिला यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे संवैधानिक अधिकार नसणार आहेत. अशाच अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, किंग चार्ल्स तृतीय यांना राज्याभिषेकाच्यावेळी कॅमिला यांना कोहिनूर हिरा असलेला मुकुट घातल्याचे दिसून येणार आहे.