इजिप्तमधील गिझाचा ग्रेट पिरॅमिड हा जगातील सर्वात मोठा पिरॅमिड म्हणून ओळखला जातो. सुमारे 2600 ईसापूर्व बांधलेला, हा पिरॅमिड जगाच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. या पिरॅमिडला बघण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक इजिप्तमध्ये जातात. आता या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण या पिरॅमिडसंदर्भात एक नवा शोध लागला असून या शोधामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इटली आणि स्कॉटलंडनमधील संशोधक या गिझाच्या पिरॅमिडमध्ये गेली काही वर्ष संशोधन करीत होते. या संशोधनात अनेक आश्चर्यचकीत गोष्टी समोर आल्या आहेत. मुख्य म्हणजे, गिझाचा पिरॅमिड आपल्याला जेवढा वर दिसतो, तेवढाच जमिनीच्या भूभागातही आहे. या पिरॅमिडच्या खाली एक विशाल असे भूमिगत शहरच असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. एवढंच नाही तर हजारो वर्षापूर्वी सूर्याची उर्जा घेऊन त्यापासून विद्युत निर्मिती करण्याची क्षमता असलेली यंत्र सामुग्रीही या गिझाच्या पिरॅमिडखाली मिळाल्याची माहिती आहे. या शोधामुळे संशोधकही आवाक झाले असून गिझाच्या पिरॅमिड हे अधिक रहस्यमय झाले आहे. 2600 वर्षापूर्वी पिरॅमिड जेव्हा उभारले गेले, तेव्हाची संस्कृती किती प्रगत होती, याचा अंदाज यावरुन मिळत असला तरी पिरॅमिडच्या खाली भव्य शहर बनवण्यामागचा हेतू काय आहे, याबाबत गुढ वाढलं आहे. (Pyramids Of Giza)
गिझाचे पिरॅमिड हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. या गिझाच्या पिरॅमिडबाबत सुरु असलेल्या संशोधनात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. या पिरॅमिडच्या खाली चक्क मोठं शहर असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय उर्जा गोळा करणारे यंत्र सामुग्री सापडल्यानं संशोधकांना मोठा धक्का बसला आहे. गिझाच्या पिरॅमिडखाली संशोधन करतांना संशोधकांना रहस्यमय रचना मिळाली आहे. ही रचना म्हणजे, उर्जा निर्मिती यंत्रणा असल्याचे काही संशोधकांचे म्हणणे आहे. हे सर्व संशोधन करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. विशेष रडार यंत्रणा यासाठी बसवण्यात आली होती. या रडार यंत्रणेमधून मिळालेल्या संदेशानुसार गिझाच्या दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पिरॅमिड, खाफ्रेच्या पायथ्याजवळ पाच समान रचना आढळल्या आहेत. अनेक किलोमीटर लांबीची ही रचना बघितल्यावर संशोधक बुचकळ्यात पडले आहेत. त्यातच सापडलेल्या यंत्रसामुग्रीमुळे हे संपूर्ण पिरॅमिड महाकाय वीज प्रकल्प आहे की, याचा शोध आता घेण्यात येत आहे. (International News)
गिझा पिरॅमिड्सच्या 6500 फूट खाली हा मोठा खजिना आढळल्यानं जगभरातील संशोधक इजिप्तमध्ये जात आहेत. गिझा पिरॅमिडखाली प्रचंड असे भूमिगत शहर मिळाल्यानं आता या शहराला बघण्याची उत्सुकता संशोधकांमध्ये आहे. संशोधकांचा दावा आहे की गिझा पिरॅमिडच्या अगदी खाली 6500 फूटांपेक्षा जास्त खोलीवर एक विशाल शहर असून त्यामध्ये अनेक रचना आहेत. पिसा विद्यापीठाचे संशोधक कोराडो मलंगा आणि स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठाचे फिलिपो बिओंडी यांनी हा मोठा शोध लावला आहे. या संशोधनात तिन्ही पिरॅमिडच्या खाली सुमारे दोन किलोमीटरपर्यंत एक शहर आहे. पिरॅमिडच्या खाली 2100 फूटांपेक्षा जास्त खोलीपर्यंत पसरलेल्या 8 उभ्या दंडगोलाकार रचना मिळाल्या आहेत. शिवाय 4000 फूट खोलीपर्यंत या रचनांचा विस्तार झाला आहे. यासाठी संशोधकांनी रडार पल्स वापरून पिरॅमिडच्या खाली एक उच्च रिझोल्यूशन प्रतिमा तयार केली. या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्याची गरज नसते. (Pyramids Of Giza)
==============
हे देखील वाचा : Tenzin Gyatso : दलाई लामांचे चीनला आव्हान !
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
इजिप्तमधील गिझा येथे 3 पिरॅमिड आहेत. त्यांची नावे खाफ्रे, खुफू आणि मेनकौरे अशी आहेत. नाईल नदीच्या पश्चिम तीरावर ही पिरॅमिड उभारण्यात आली आहेत. मात्र या पिरॅमिडनी नेहमी संशोधकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पिरॅमिड बांधण्याचा उद्देश काय, हे शोधण्यासाठी आजही अनेक संशोधक येथे अभ्यास करीत आहेत. गिझाच्या पिरॅमिडबद्दल अनेक रहस्ये आहेत. पिरॅमिड बांधण्यासाठी वापरलेले प्रचंड दगड कसे वाहून नेले गेले हे एक गूढ आहे. पिरॅमिडच्या बांधकामासाठी 23 लाख दगडी ब्लॉक वापरण्यात आले आहेत. तसेच दगडांमध्ये चुनखडी आणि ग्रॅनाइटचा समावेश आहे. हे सगळं बांधकाम साहित्य हजारो वर्षापूर्वी या भागात कसे नेण्यात आले हा प्रश्न नेहमी विचारला जातो. त्यामुळे पिरॅमिड उभारण्यासाठी परग्रहींनी मदत केल्याचा मुद्दाही मांडला जातो. या सर्वातच आता या पिरॅमिडच्या खाली दुसरे मोठे शहर सापडले आहे, तसेच विद्युत निर्मिती तयार करणारी यंत्र सामुग्रीही मिळाल्यानं पिरॅमिडची बांधणी नेमकी कशासाठी झाली होती, हा प्रश्न संशोधकांना पडला आहे. (International News)
सई बने