Home » पुतिन यांनी जेव्हा केजीबीला अंतानंतर पुन्हा स्थापित केले…पुस्तकातून हनी ट्रॅप संबंधित मोठे खुलासे

पुतिन यांनी जेव्हा केजीबीला अंतानंतर पुन्हा स्थापित केले…पुस्तकातून हनी ट्रॅप संबंधित मोठे खुलासे

by Team Gajawaja
0 comment
Putin's school of sexpionage
Share

जेव्हा शीतयुद्ध हे शिगेला पोहचले होते तेव्हा मास्को मध्ये सेंट सोफियाच्या किनाऱ्यावर एक ब्रिटिश दूतवास होते जे राजकीय आणि कुटनिती प्रतिष्ठेचे प्रतीक होते. १८९० च्या दशकात ते एका चीनी व्यापाराने उभारले होते. याच्या प्रवेशद्वारावर एक मजबूत पॅनल असणारी स्कॉटिश बॅरोनियल हॉलवे आणि लाल गालिचा असलेली एक सुंदर जिना होता. पहिल्या मजल्यावर विशाल सफेद आणि सोन्याच्या बॉलरुमचे प्रभुत्व होते. यामध्ये एक उत्तम प्रकारची लाकडी फरशी होती. ज्याचा पार्ट्यांसाठी वापर केला जायचा. डेली मेलच्या रिपोर्टनुसार आता Putin’s school of sexpionage पुस्तकातून असा खुलासा झाला आहे की, रशियन राष्ट्रपती पुतिन यांनी मास्को जवळ गुप्त अॅकेडमी उभारली आहे. यामध्ये जुन्या केजीबीच्या साथीदारांना आसरा दिला आहे.

केजीबी काय होते?
ब्रिटेनला स्टालिन यांनी एका नव्या ठिकाणी दूतवास शोधावे असे सांगितले होते. मात्र तीन महिन्यानंतर स्टालिन यांचा मृत्यू झाला आणि इंग्रजांनी एका मोठ्या ठिकाणच्या नव्या दूतवासाचा प्रस्ताव नकारला. केजीबीचा मुख्य उद्देश हा ब्रिटेनच्या हितांना कमजोर करणे होते. केजीबीची कोणतीही सीमा नव्हती. त्यांचे काम बगिंग, जाळपोश हनीट्रॅप, ड्रिंक्समध्ये भेसळ, ड्रग्ज तयार करणे आणि जासूसी करणे असे होते. हे गुप्त अधिकारी आणि राजकीय नेत्यांना निशाणा बनवायचे. त्यांचे रेकॉर्डिंग, फोटोच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करायचे आणि जासूसी करणे अथवा गु्पत गोष्टींचा खुलासा करण्यास मजबूर करायचे.

पुतिन यांनी केजीबीच्या साथीदारांना दिला आसरा
सोवियत संघ एक ब्लॅकमेल राज्य बनले होते. १९९१ मध्ये सोवित संघ तुटल्यानंतर केजीबीचा अंत झाला. याची जागा नव्या सुरक्षा सर्विस FSB ने घेतली. मात्र १९९९ मध्ये जेव्हा केजीबीचे माजी अधिकारी पुतिन सत्तेत आले तेव्हा त्यांनी वेगाने केजीबीच्या आपल्या संपूर्ण साथीदारांना स्थापित केले. पुतिन यांच्यावर आज सुद्धा आपल्या राजकीय विरोधक, असंतुष्टांची हत्या, त्यांचे शोषण करणे, हनीट्रॅपचा वापर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुचनांचा चुकीचा वापर केल्याचा आरोप आहे.(Putin’s school of sexpionage)

हे देखील वाचा- गेल्या काही वर्षात पुतिन यांना विरोध केलेल्या अनेकांचा रहस्यमय मृत्यू

रशियन गुप्तहेर एना चॅपमॅन हिला अटक
रशियन गुप्त एजेंसीसाठी काम करणारी रशियन गुप्तहेर एना चॅपमॅनला जून २०१० मध्ये न्यूयॉर्कमध्ये अटक केली होती. ती बार्कलेज बँकेसाठी काम करत होती पण ती एक रशियन एजेंट होती. पुतिन हे याआधी केजीबीचे प्रमुख होते आणि त्यांच्या वागणुकीवर जुन्या केजीबीची छाप आहे. पुतिन यांनी माजी केजीबी अधिकारी, ज्यांना सिलोविकी नावाने ओळखले जाते त्यांना प्रमुख शासकीय मंत्रालय, कायदे एजेंसी आणि राज्याद्वारे कंट्रोल करण्यात येणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी दिली होती. वास्तवात पुतिन यांनी केजीबी राज्य निर्माण केले आणि त्याचा वापर परराष्ट्र धोरणाचे शस्त्र म्हणून केला.

पुतिन यांनी उभारले सेक्सपियनेज स्कूल
KGB ने मास्कोच्या पू्र्वेला कजानमध्ये एक सेक्सपियनेज स्कूल उभारले. यामध्ये त्यांनी निवडक अभिनेत्री, गायक, डांन्सर्स आणि शिक्षकांना ट्रेनिंग दिली. त्यांना असे शिकवले जायचे की, कसे क्लब, हॉटेल लॉबी किंवा बनावट वेश्यालयांमध्ये पदेशातून संपर्क केला. माजी जर्मनीमध्ये अशा प्रकारची एक अॅकेडमी HVA जी प्रभावी रुपात केजीबीची सहाय्यक कंपनी होती. ती पुरुषांना सुद्धा अशा प्रकारे प्रशिक्षण द्यायची. त्यामधील पुरुष हे ३० वर्षाचे असायचे. या लोकांनी खुप वर्ष गुप्तहेरांच्या रुपात काम केले आणि रशियाची मदत केली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.