ऑगस्ट महिन्यामध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या मॉस्को भेटीदरम्यान व्लादिमीर पुतिन यांच्या या भारत भेटीची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच पुतिन यांची एक विशेष सुरक्षा ब्रिगेड कामाला लागली. व्लादिमीर पुतिन यांचे स्वतःचे असे एक सुरक्षा पथक आहे. पुतिन, कुठल्याही देशाच्या दौ-यावर गेले, तरी त्यांचे हे पथक त्यांच्या सोबत असते. यात पुतिन यांची बुलेटप्रूफ गाडी ते त्यांची टॉयलेट सीट यांचा समावेश आहे. पुतिन यांचा दौरा जाहीर झाल्यापासून हे त्यांचं सुरक्षा पथक कामाला लागतं, आत्ताही भारतात पुतिन येण्यापूर्वी त्यांचे विशेष दल दाखल झाले आहे. (Vladimir Putin)

जगभरातील नेत्यांमध्ये कायम पुतिन यांची सुरक्षा यंत्रणा ही चर्चेत राहिली आहे. व्लादिमीर पुतिन यांच्या या सुरक्षा यंत्रणेमध्ये सर्वाधिक चर्चा त्यांच्या टॉयलेट सुटकेसची होती. पुतिन यांच्या दौ-यात ही सुटकेस सोबत असते. पुतिन यांचे मलमूत्रही कुठल्याही देशात ठेवले जात नाही. हे मलमूत्र परत रशियामध्ये नेले जाते, आणि त्याचे विशिष्ट जागी विघटन केले जाते. पुतिन यांच्या तब्बेतीबाबत अनेक शंकाकुशंका उपस्थित करण्यात येतात. त्यामुळे त्यांचे मलमूत्र कुठल्याही देशात राहिल्यास त्याची तपासणी होण्याची शंका आहे, म्हणूनच ही काळजी घेण्यात येते. भारतात आल्यावर व्लादिमीर पुतिन यांच्या सुरक्षेची जबाबदारी राष्ट्रपती सुरक्षा सेवेवर आहे. फेडरल गार्ड सर्व्हिसचा हा एक भाग आहे. (International News)
पुतिन हे कायम ३० सशस्त्र रक्षक असतात. पुतिन जिथे जाणार आहेत, त्या ठिकाणीही त्यांचे गुप्त रक्षक पसरलेले असतात. अगदी पुतिन यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीमध्येही हे सुरक्षा रक्षक सामान्य नागरिक म्हणून मिसळून जातात. पुतिन यांच्या दौ-याच्यावेळी कायम त्यांच्यासोबत एक वैयक्तिक स्वयंपाकी आणि एक पोर्टेबल लॅब असते. पुतिन यांना जे पदार्थ देण्यात येणार आहेत, त्यांची अगोदर तपासणी केली जाते. त्यासाठी एक अद्ययावत पोर्टेबल लॅबही या सुरक्षा पथकाचा भाग असते. फारकाय या सुरक्षा पथकात पाण्याच्या मोठ्या बाटल्याही असतात. पुतिन दुस-या देशातील पाणीही पित नाहीत. पुतिन यांची मिटिंग जिथे असेल, त्या जागेचा ताबा आधी सुरक्षा रक्षक घेतात. त्या जागेवर आधी कोणाचे ठसे तर नाहीत ना, याचीही पहाणी केली जाते. पुतिन यांची बैठक झाल्यावर पुन्हा हिच प्रक्रिया केली जाते. त्यांच्या हाताचे सर्व ठसे साफ केले जातात. (Vladimir Putin)

पुतिन यांच्या दौ-यापूर्वी त्या दौ-याचा पूर्ण कार्यक्रम त्यांच्या सुरक्षा रक्षक पथकाकडे आलेला असतो. अगदी त्यामध्ये त्यांच्या गाडीचा दरवाजा कोण उघडणार, त्याचे कपडे कसे असणार याचीही माहिती या पथकाकडे असते. पुतिन यांचे स्वागत करतांना कितीजण उपस्थित असणार, ते कुठल्या पद्धतीचे आणि कुठल्या रंगाचे कपडे घालणार, त्याच्याकडे बुके किंवा हार असणार का, असा बारीक सारीक तपशील या पथकाकडे महिनाभर आधीच आलेला असतो. त्याप्रमाणे हे पथक आधी सराव करते. प्रत्यक्षात स्वागत करतांना एखाद्या व्यक्तिच्या कपड्यांचा रंग बदलला तर त्याबाबत मग लगेच सुरक्षा पथक सतर्क होते. (International News)
========
हे देखील वाचा : Bangladesh : भारतही त्या भीतीच्या छायेखाली !
========
पुतिन यांचे आयएल-९६ जेटलाइनर ही चर्चेत असते. हे विमान म्हणजे, रडारसह सर्व आवश्यक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेले फ्लाइंग कमांड सेंटरच आहे. एखाद्या फाईवस्टार हॉटेलपेक्षा अधिक सुविधा या विमानात आहेत. पुतिन यांच्या सुरक्षा ताफ्यात अशी तिन विमाने असल्याची माहिती आहे. यापैकी नेमक्या कुठल्या विमानातून पुतिन प्रवास करणार याची माहिती कुणालाही नसते. स्वतः पुतिन कधीही मोबाईल वापरत नाहीत. पण त्यांच्या या विमानात आधुनिक संपर्कप्रणाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पुतिनकडे एक सुपर-सिक्रेट आर्मर्ड ट्रेन आहे. ट्रॅकवरील बंकर म्हणूनही ओळखले जाते. पुतिन या ट्रेनचा वापर रशियामध्ये फिरण्यासाठी करतात. अशीच त्यांची कारही भक्कम किल्ला म्हणून ओळखली जाते. अगदी त्याखाली बॉम्बस्फोट झाला तरी या कारमध्ये बसलेल्यांना त्याचा त्रास होत नाही. पुतिन येण्याआधी त्यांची ही सर्व साधनसामृग्री भारतात दाखल होऊ लागली आहे. (Vladimir Putin)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
