घरातील डायनिंग टेबलपासून रस्त्यावरील चहा, पानाच्या टपरीपर्यंत केवळ एकाच विषयावर होणारी चर्चा तुमच्या कानावर पडत असेल, ती म्हणजे लोकसभा निवडणूका. सध्या देशभरात निवडणुकांचे (Lokasabha Election 2024) वारे वाहताना दिसत आहे, महाराष्ट्रात तर दररोज काही ना काही रंजक घडामोडी राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत.
कुणी मोदी आणि भाजपाला सपोर्ट करतय तर कुणी कॉँग्रेस आणि इतर पक्षांचे गोडवे गाताना दिसत आहेत.
आपल्यापैकी कित्येकांनी याआधीदेखील मतदान नक्की केलं असेल. मतदान (Lokasabha Election 2024) केल्यावर आपल्या डाव्या हाताच्या तर्जनीवर म्हणजेच पहिल्या बोटावर शाई लावली जाते. तुम्ही मतदान केल्याचा हा सर्वात मोठा पुरावा मानला जातो.
या शाईच्या मागेही एक वेगळाच इतिहास आहे. ही शाई नेमकी कुठे बनते? तसंच केव्हापासून निवडणुकीत या शाईचा वापर केला जाऊ लागला? आजच्या लेखामधून याबद्दलची इंटरेस्टिंग माहिती जाणून घेऊयात.
मतदान केल्यावर सध्या सगळेच आपल्या तर्जनीला शाई लावल्याचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेयर करतात. पण डाव्या हाताच्या या पहिल्या बोटाला शाई लावण्यामागचा नेमका हेतू तुम्हाला ठाऊक आहे का? (Lokasabha Election 2024)
एका व्यक्तीने केवळ एकदाच मतदान (Lokasabha Election 2024) केले पाहिजे आणि यावरच अंकुश ठेवण्यासाठी ही शाई बोटाला लावली जाते. ही शाई एकदा बोटाला लागली की ती सहज पुसता येत नाही. बोटाला लावताना ही शाई निळ्या रंगाची असते आणि नंतर ती काळी पडते.
ही शाई ‘इंडेलिबल इंक‘ या नावानेही ओळखली जाते. केवळ भारतातच नव्हे तर इतरही काही देशांमध्ये मतदानानंतर (Lokasabha Election 2024) या शाईचा वापर केला जातो. मतदान केल्यानंतर ही शाई लावणं हे आजही बऱ्याच देशांमध्ये बंधनकारक आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे बहुतांश देशात वापरली जाणारी ही शाई भारतातूनच पुरवली जाते. ही शाई भारतात नेमकी कुठे बनते याबद्दल आपण जाणून घेऊयात.
भारतात मुख्यत्वे ही शाई दोन ठिकाणी बनते. हैद्राबादमधील रायूडू लॅबमध्ये आणि म्हैसूरमधील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड या दोन ठिकाणी ही शाई बनवली जाते. देशातील बहुतेक सर्वच भागात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ‘म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड’ या कंपनीमध्येच बनवली गेलेली शाई वापरली जाते. तर हैद्राबादच्या कंपनीतील शाई ही इतर देशांना पाठवण्यासाठी वापरली जाते.
जगातील जवळपास ९० देशांमध्ये या शाईचा वापर निवडणुकांदरम्यान (Lokasabha Election 2024) होतो. सुरुवातीला छोट्या छोट्या बाटल्यांमधून ही शाई एक्सपोर्ट केली जायची. रायूडू लॅबचे सीइओ शशांक रायूडू यांच्या मते आता हे तंत्रज्ञान बदललं आहे.
===
हेदेखील वाचा : ऑनलाइन बेटींग प्लॅटफॉर्ममुळे तमन्ना भाटीया अडचणीत
===
२०१४ नंतर या सहजासहजी पुसल्या न जाणाऱ्या शाईचे मार्कर बनवून ते एक्सपोर्ट केले जाऊ लागले. निवडणुकांशिवाय (Lokasabha Election 2024) या शाईचा वापर पल्स पोलिओ मोहिमेदरम्यानही केला जातो. ज्या लहानग्यांना पोलिओ डोस दिला जातो, त्यांच्याही बोटांवर हीच शाई लावली जाते.
मतदानानंतर (Lokasabha Election 2024) तुमच्या बोटावर ही शाई लावली जाते ज्यात सिल्व्हर नायट्रेटचं प्रमाण १० ते १८ टक्के इतकं असतं. ही शाई बोटावर लावल्यावर अगदी काहीच सेकंदात म्हणजेच ४० सेकंदात ती सुकून जाते आणि नंतर जेव्हा पाण्याशी याचा संपर्क येतो तेव्हा ती काळी होते.
कोणताही साबण, शॅम्पू, तेल किंवा कोणतंही क्रीम लावलं तरी हा डाग निघत नाही. तज्ञांच्या मतानुसार किमान ७२ तास तरी हा शाईचा रंग बोटावरुन काढता येत नाही.
या शाईचा नेमका वापर कधी होऊ लागला. याबद्दल थोडं जाणून घेऊयात. १९६० च्या दशकापासून या शाईचा वापर होऊ लागला. निवडणुकांच्या आधीच निवडणूक आयोग (Lokasabha Election 2024) लाखो शाईच्या बाटल्यांची ऑर्डर देते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lokasabha Election 2024) तब्बल २१ लाख बाटल्यांची ऑर्डर देण्यात आली होती आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये ही संख्या वाढून २६ लाख इतकी झाली होती. ज्या ब्रशने ही शाई लावली जाते त्या ब्रशचं उत्पादनही म्हैसूर इथल्याच प्लांटमध्ये केलं जातं.
जर मतदारने आधी केलेल्या मतदानाची (Lokasabha Election 2024) शाईची खूण अजूनही तर्जनीवर दिसत असेल तर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ही शाई मतदाराच्या मधल्या बोटावर लावली जाते, आणि जर त्या बोटावरही शाई असेल तर मतदाराच्या अनामिकेवर ही शाई लावली जाते.
आता यंदाच्या निवडणुकांमध्ये (Lokasabha Election 2024) जेव्हा तुमच्याही बोटाला ही शाई लावली जाईल तेव्हा तुम्हाला या शाईचे महत्त्व आणि याची ही माहिती नक्की आठवेल.