Home » पुण्यात सेक्सटॉर्शनचे बळी, पण यामध्ये अडकल्यानंतर कसे बाहेर पडाल?

पुण्यात सेक्सटॉर्शनचे बळी, पण यामध्ये अडकल्यानंतर कसे बाहेर पडाल?

by Team Gajawaja
0 comment
Pune sextortion
Share

पुणे पोलिसांनी राजस्थान मधील २९ वर्षीय व्यक्तीला शहरातील एका अल्पवयीन सेक्सटॉर्शन प्रकरणी अटक केली आहे. अल्पवयीन मुलाने कथित रुपात ऑनलाईन फसवणूकीद्वारे त्रास दिल्याने आणि ब्लॅकमेल केल्याने आत्महत्या केली. २८ सप्टेंबरला पुण्यातील दत्तवाडी परिसरात ऑनलाईन फसवणूकीद्वारे केल्या गेलेल्या आणि ब्लॅकमेलिंगमुळे एका १९ वर्षीय तरुणाने उडी मारत आत्महत्या केली होती. (Pune sextortion)

पोलिसांनी आरोपीला राजस्थान येथून घेतले ताब्यात
ऑनलाईन पद्धतीने फसणूक करणाऱ्या या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वारंवार धमकी दिली जात होती, त्यानंतर त्याने त्याच्याकडून ४५०० रुपये सुद्धा घतले. मात्र त्यानंतर ते मान्य केले नाही. मुलाला त्याला देण्यात येणारा त्रास सहन झाला नाही आणि आत्महत्या केली. दत्तवाडी ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन यांनी असे म्हटले की, आम्हाला तपासात राजस्थान मधील अलवर जिल्ह्यातील गोथरी गुरु गावात पोहचत तेथून गावातूनच सेक्सटॉर्शनचे रॅकेट चालवणारा मास्टरमाइंड अनवर सुबन खान याला ताब्यात घेतले.

Pune sextortion
Pune sextortion

गावातील काही पुरुष-महिला सुद्धा होत्या रॅकेटचा हिस्सा
तपासात असे समोर आले की, गावातील काही तरुण आणि महिला या ऑनलाईन सेक्सटॉर्शन मध्ये सुद्धा सहभागी होत्या. पोलिसांनी अधिकृत विधानात अनवर खान हा १९ वर्षीय मुलाच्या प्रकरणात थेट सहभागी होता. त्याच्यावर पैसे देण्यासाठी वारंवार दबाब टाकला जात होता. तर सायबर पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, पुण्यात जानेवारी ते ऑक्टोंबर २०२२ दरम्यान एकूण १४४५ अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये पीडितांना सायबर गुन्हेगारांनी त्रास दिला आणि ब्लॅकमेल सुद्धा केले.

अशा पद्धतीने पुरुषांन केले जाते टार्गेट
अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, सायबर गुन्हेगार इंस्टेट मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून पुरुष पीडितांना टार्गेट करण्यासाठी रॅकेटमधील महिलांना यामध्ये सहभागी करुन घ्यायचे. पुरुष डीपी वर लावण्यात आलेल्या महिलांचा फोटो पाहून आकर्षित होतात आणि त्यांच्याशी बोलणे सुरु करतात. मेसेच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये मैत्री अधिक वाढते आणि नंतर पुरुषांचे ते आपत्तिजनक व्हिडिओ रेकॉर्ड काढायचे. नंतर त्याच व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी किली जाते आणि याच्या माध्यमातून पैसे उकळले जातात.

भीतीपोटी पीडित यामध्ये सहज अडकले जातात. त्यानंतर समोरचा व्यक्ती पीडित व्यक्तीकडून पैसे लुटण्याचा प्रयत्न करतात. यांच्या धमक्यांमुळे काही जण अधिकच घाबरुन जात आत्महत्या ही करतात. त्यामुळे सायबर पोलिसांनी लोकांना इंस्टेट मेसेंजिंग अॅपवर अज्ञात महिलांसोबत बातचीत करण्यापासून दूर रहावे असे आवाहन केले आहे.(Pune sextortion)

हे देखील वाचा- अलर्ट! तुमचा पासवर्ड ****ket असा आहे का? सहज होऊ शकतो हॅक

सेक्सॉटर्शनच्या जाळ्यात अडकल्यास काय कराल?
या प्रकरणातून बाहेर पडायचे कसे हे सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र पोलिसांनी यामध्ये काही गोष्टींची काळजी घेण्यास सांगितली आहे. त्यानुसार जेव्हा तुमच्याकडे पहिल्यांदा पैसे मागितले जातात तेव्हाच पोलिसांना याबद्दल कळवा. तर सेक्सॉटर्शनमध्ये खरंतर महिला आपल्याला नग्न होताना दिसत जरी असल्या तरीही ते तसे नसते. त्यावेळी रियर कॅमेरा सुरु असल्याचे दाखवत पॉर्न व्हिडिओ दाखवले जातात. मात्र यामध्ये पीडित व्यक्तीचा कॅमेरा सुरुच असतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.