भोपळ्याच्या बिया खाल्याने आरोग्याला काही फायदे होतात. या बियांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. याची टेस्ट गोडसर असते. भोपळ्याच्या बियांमुळे तुमच्या शरीराला ओमेगा-३ फॅटी अॅसिड सारखी पोषक तत्त्वे मिळतात. त्याचसोबत याला फायबरचा उत्तम स्रोत मानले जाते. नियमित रुपाने भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने शरीरातील काही समस्या दूर होतात. याचे सेवन केल्याने नक्की काय फायदे होतात हे पाहूयात. (Pumpkin Seeds)
अँन्टीऑक्सिंडेट्सचा स्रोत
भोपळ्याच्या बियांमुळे शरीराला भरपूर प्रमाणात अँन्टीऑक्सिडेंट्स मिळू शकतात. मुख्य रुपात यामध्ये व्हिटॅमिन ई आणि कॅरोटीनॉइड असतात आणि त्यात अँन्टिऑक्सिडेंटची क्षमता असते. हे अँन्टीऑक्सिडेंट्स सूज कमी करण्यास मदत करू शकतात आणि आपल्या शरीराला फ्री रेडिकल्सपासून सुरक्षित ठेवतात. यामुळे तुम्ही काही आजारांपासून दूर राहू शकतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने हृदयासंबंधित धोका कमी होतो. मुख्य रुपात यामध्ये असलेले अँन्टीऑक्सिडेंट्स हार्ट संबंधित समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम ब्लड प्रेशर कमी करू शकतात. मॅग्नेशियम आपल्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर आणि ट्राइग्लिसराइड्स कमी करतात. यामुळे हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होतो.
कँन्सरपासून बचाव
भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने कँन्सरचा धोका कमी होतो. मुख्य रुपात गॅस्ट्रिक, स्तन आणि कोलेरेक्टल कँन्सरचा धोका कमी होतो. याच्या बियांमध्ये अँन्टीऑक्सिडेंट्स असल्याने कँन्सरपासून तुम्ही दूर राहू शकतात.
डायबिटीज कंट्रोलमध्ये राहते
मॅग्नेशियमच्या कारणास्तव ब्लड शुगरचा स्तर कंट्रोल राहू शकतो. या बिया मधुमेहात होणाऱ्या चयापचयासंबंधित विकार कमी करू शकतात. त्याचसोबत शरीरातील ब्लड शुगर किंवा ग्लुकोजचा स्तर कमी करू शकतात. जर तुम्ही नियमित रुपात भोपळ्यांच्या बियांचे सेवन केल्यास काही प्रमाणात मधुमेहाचा धोका कमी होतो. (Pumpkin Seeds)
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
व्हिटॅमिन ई आणि जिंकमध्ये असलेल्या भोपळ्याच्या बियांच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासमदत करते आणि तुम्ही काही संक्रमणांपासून दूर राहता. ऐवढेच नव्हे तर भोपळ्याच्या बियांमधअये अँन्टीऑक्सिडेंट्स असल्याने शरीरातील फ्री-रेडिकल्स सुरक्षित राहिले जातात. त्यामुळे हेल्थी कोशिकांना नुकसान पोहचवण्यापासून रोखले जाते. बियांमध्ये जिंक असल्याने शरीराला येणारी सूज आणि एलर्जीची समस्या कमी होऊ शकते.
हेही वाचा- Bottle Gourd Juice Benefits: मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी गुणकारी आहे दूधी भोपळ्याचा रस !