Home » ‘या’ शाकाहारी पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास तुम्हाला कुठल्याही प्रोटीन पावडरची गरज नाही

‘या’ शाकाहारी पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास तुम्हाला कुठल्याही प्रोटीन पावडरची गरज नाही

by Team Gajawaja
0 comment
Protein Rich Veg Food
Share

‘प्रोटीन’ हा आपल्या आहाराचा मुख्य भाग आहे. तज्ज्ञांच्या मते सामान्य व्यक्तीने आपल्या वजनाच्या तुलनेत प्रति किलोग्राम किमान ०.८ ते १.०० ग्रॅम इतके प्रोटीनचे प्रमाण असायला हवे. अनेकांचा असा गैरसमज असतो की, प्रोटीन फक्त नॉन-व्हेज पदार्थांमधूनच मिळतं. पण हे खरं नाही. कित्येक व्हेज पदार्थ असे आहेत, ज्यामध्ये नॉन व्हेज पदार्थांइतकंच किंवा त्यापेक्षाही जास्त प्रोटीन असतं. हे पदार्थ कुठले आहेत याबद्दल माहिती घेऊया (Protein Rich Veg Foods). 

प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ (Protein Rich Veg Food)

१. दुग्धजन्य पदार्थ 

जवळपास सर्वच दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते. तसेच दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे जर तुम्ही शाकाहारी असाल तर, पनीर, दूध, दही यापैकी किमान एका पदार्थाचा आहारात समावेश करायला हवा. 

पनीर तर प्रोटीनचा सर्वात टेस्टी पर्याय समजला जातो. पनीरच्या भाज्या खाण्यापेक्षा भाज्यांच्या अथवा कडधान्यांच्या सॅलडसह खाल्ल्यास अधिक उत्तम शिवाय तळलेले पनीर शक्यतो टाळा.

Trends shaping dairy in 2021 - ADPF

२. सोयाबीन 

सोयाबीन हे एक धान्य आहे. ५ किलो गव्हामध्ये पाव किलो सोयाबीन मिसळून पीठ करून घ्यावे व या पिठाच्या पोळ्या कराव्यात. गहू आणि सोयाबीन हे दोन्हीही पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्रोत समजले जातात. शिवाय रोजच्या आहारात आपण पोळीचा समावेश करत असल्यामुळे सोयाबीनमधलं प्रोटीन आपल्याला आपोआपच मिळतं. याशिवाय टोफू, सोया मिल्क, सोया चंक्स अशा सोयाबीनच्या इतर पदार्थांचा वापरही तुम्ही आहारात करू शकता. (Protein Rich Veg Food)

टोफू हा पनीरसारखाच पदार्थ असतो. यामध्ये पनीरपेक्षाही जास्त प्रमाणात प्रोटिन्स असतात. शिवाय कमी कॅलरीज असल्यामुळे हा वजन कमी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक उत्तम पर्याय आहे. 

३. मूग (अख्खे मूग आणि डाळ)

भारतीय खास करून महाराष्ट्रीयन जेवणामध्ये आवर्जून डाळींचा वापर केला जातो. वरण, आमटी, डाळ, दाल फ्राय, दाल तडका, यापैकी कुठला ना कुठला पदार्थ आपल्या रोजच्या जेवणाचा भाग असतोच. डाळींपैकी मूग डाळीमध्ये सर्वाधिक प्रोटीन असते. (Protein Rich Veg Food)

====

हे देखील वाचा: ‘या’ नैसर्गिक गोष्टीच्या साहाय्याने करा बद्धकोष्टता आणि अपचनावर मात!

====

आहारतज्ज्ञांमध्ये बऱ्याचदा ‘मूग डाळ विरुद्ध चिकन’ असा वाद रंगतो. शाकाहाराचा पुरस्कार करणारे आहारतज्ज्ञ मूग डाळीचे समर्थन करतात, तर नॉनव्हेज प्रेमी चिकनलाच वरचा दर्जा देतात. बाकी काहीही असलं, तरी चिकनशी स्पर्धा करणारी मुगडाळ प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे, हे मात्र नक्की. मुख्य म्हणजे मुगामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असल्यामुळे चिकनच्या तुलनेत उत्तम पर्याय समजला जातो.  

४. छोले 

छोले किंवा काबुली चणे हा देखील प्रोटीनचा एक उत्तम स्रोत समजला जातो. छोले जितके टेस्टी तितकेच पोषणतत्वांनी समृद्धही असतात. फक्त छोले करताना त्यामध्ये कमीतकमी तेल वापरा. वजन कमी करण्यासाठी डाएट करणाऱ्यांनी शक्यतो उकडलेले किंवा रोस्टेड चणे खायला हरकत नाही. 

Protein Rich Foods: 7 High Protein Veg Foods in India - Benefits

५. सुकामेवा 

सुकामेवा हे सुपरफूड समजले जाते. जर तुम्हाला प्रोटीनयुक्त शाकाहारी आहार घ्यायचा असेल, तर तुम्ही आहारामध्ये बदाम आणि काजू यांचा आवर्जून वापर करा. फक्त बदाम आणि काजू खारवलेले किंवा तळलेले नसावेत. रोस्टेड असतील तर चालतील. रोज रात्री पाण्यामध्ये २ बदाम भिजवून सकाळी उठल्यावर अनशापोटी खाल्ल्यास शरीरातील प्रोटीनची कमी भरून येण्यास मदत होते. (Protein Rich Veg Food)

प्रोटीन जरी शरीराला आवश्यक असलं, तरी त्याचे सेवन प्रमाणातच करायला हवं. वजन कमी करण्यासाठी अथवा अन्य कोणत्याही गैरसमजातून प्रोटीनचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.  

====

हे देखील वाचा: घरी बसून जाणून घ्या तुम्ही रोगी आहात की निरोगी! करा फक्त ‘या’ तीन गोष्टी…

====

प्रोटीनच्या अतिरेकी सेवनामुळे शरीरात कॅल्शियम आणि युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते. बहुधा मूत्रावाटे अतिरिक्त प्रोटीन शरीराबाहेर पडते, पण ते शरीराबाहेर न पडल्यास मूत्रपिंडात खडे होऊ शकतात. जास्तीचे प्रोटीन हाडांना मजबूत करण्याऐवजी कमजोर करते. शरीरात रेशिय सामग्री कमी होते आणि मलावरोधाचे दुखणे सुरू होते. त्यामुळे प्रोटीन डाएट करा पण जरा जपून!

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, त्यास आहारविषयक अथवा वैद्यकीय सल्ला समजू नये. आहार नियोजन करताना आरोग्यतज्ज्ञांचा व आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही उत्तम.)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.