Home » असा वाचवा सॅनिटायझरपासून स्मार्टफोन

असा वाचवा सॅनिटायझरपासून स्मार्टफोन

by Correspondent
0 comment
Mobile Use Causes
Share

जगभरात सॅनिटायझरचा वापर अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे आलेल्या साथीमुळे हॅण्ड सॅनिटायझर आता जणूकाही मूलभूत गरज बनली आहेत. प्रत्येक जण सॅनिटायझरचा वापर करुन कोरोना व्हायरसपासून बचाव करत आहे. लोक फक्त हातांसाठीच नाही तर सर्वाधिक हाताळली जाणारी वस्तू म्हणजेच मोबाईल फोन स्वच्छ करण्यासाठीही सॅनिटायझरचा वापर करत आहेत. परंतु आता याचे गंभीर परिणाम समोर आले आहेत.

स्क्रीन, लेन्सवर परिणाम
कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी लोक मास्कसह सॅनिटायझरचाही वापर करत आहेत. त्याचवेळी आपल्या हातात असणारा मोबाईल फोनही व्हायरसचा वाहक बनू नये यासाठी अनेक जण यावरही सॅनिटायझर लावत आहेत. परंतु यामुळे मोबाईल फोनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

अनेक जणांनी मोबाईल फोनमध्ये बिघाड झाल्याबाबत तक्रार केली आहे. फोन स्वच्छ करण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर हे बिघाडाचं कारण समजलं जात आहे. मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात अशा तक्रारी आल्या आहेत, ज्यात फोनच्या स्क्रीनपासून ईअरफोन जॅक आणि कॅमेऱ्याचे लेन्समध्येही बिघाड झाला आहे.सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असतं, ज्यामुळे व्हायरसचा खात्मा होण्यास मदत होते. पण मोबाईल फोनवर सॅनिटायझर लावल्यामुळे स्पीकर आणि मायक्रोफोनच्या ठिकाणाहून सॅनिटायझर हेडसेटच्या आत पोहोचतं आणि आतील सर्किट आणि चिपचं नुकसान होतं.

फोनची स्वच्छताही गरजेची
फोन स्वच्छ करणंही तेवढंच गरजेचं आहे, कारण तो सातत्याने आपल्या हातात असतो आणि बऱ्याचदा धोकादायक व्हायरस आणि जिवाणूंचा वाहक बनतो. अशा परिस्थितीत काळजीपूर्वक आणि सतर्कतेने फोन स्वच्छ करणं गरेजचं आहे.यासाठी एक छोटं कापड घेऊन त्यावर एक थेंब सॅनिटायझर टाकून त्यानेच फोनची स्क्रीन आणि बॅक पॅनल स्वच्छ करावा. मात्र हे कापड कधीच मायक्रोफोन, स्पीकर किंवा चार्जिंग/ईयरफोन जॅकजवळ नेऊ नये.

याशिवाय मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन मेडिकल वाईप्सवर आणू शकता. या वाईप्समध्ये सॅनिटायझरसारखे घटक असतात. सामान्यत: याचा वापर हातांच्या स्वच्छतेसाठी केला जातो. पण सतर्कतेसह फोनच्या स्वच्छतेसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. शिवाय ही सोपी पद्धतही आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.