एखादे घर, जमीन किंवा प्लॉट खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकालाच वाटत राहते की, आपले स्वत:चे एक घर असावे. अशातच लोक गुंतवूक करण्याच्या उद्देशाने प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवतात. खरंतर प्रॉपर्टी मार्केट हे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी काही गोष्टींची सुद्धा काळजी घ्यावी लागते. एखाद्या ठिकाणी वेगाने होणाऱ्या जमिनीच्या रजिस्ट्रेशनदरम्यान फसवणूक होण्याची शक्यता ही अधिक असते. तुम्ही पाहिले असेल की, एका जमिनीवर एकापेक्षा अधिक जणांचा अधिकार असतो. अशातच जमिनीचा वाद असेल तर तुम्ही गुंतवलेले पैसे आणि प्रॉपर्टी हातातून निसटते. यामुळे अत्यंत गरजेचे आहे की, एखादी जमीन खरेदी करण्यापूर्वी त्याची संपूर्ण चौकशी करावी. (Property ownership)
सर्वात प्रथम जमीन खरेदीसाठी तुम्ही जमीन मालकाची माहिती मिळवा. मात्र आता महसूल विभागाने हाच डेटा ऑनलाईन ही केला आहे. याचा फायदा असा होतो की, लोकांना आता जमिनीचा मालक नक्की कोण हे समजणे फार सोप्पे होते. तसेच या ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही जमिनीचा नकाशा आणि जमिनी संदर्भातील अन्य माहितीचा रेकॉर्ड सहज मिळवू शकता.
जमीनीसंदर्भातील कोणतीही माहिती तुम्ही महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरुन पाहू शकता. या प्रक्रियेत आधी तुम्हाला सतत महसूल विभागाच्या कार्यालयाला भेट द्यावी लागायची. मात्र आता घरबसल्या सर्वकाही माहिती तुमच्या समोर येते.
कसा शोधून काढाल जमीनीचा मालक?
-सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या राज्यातील महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
-येथे तुमच्या रस्त्याचे नाव निवडा
-आता जिल्ह्याचे नाव निवडा
-आता गावाचे नाव निवडा, जेथील जमीनीबद्दल तुम्हाला माहिती हवीयं
-जमीनी संदर्भातील ऑप्शनपैकी खातेदाराच्या नावाने सर्च करण्याचा ऑप्शन निवडा
-आता जमीन मालकाच्या नावाचे पहिले अक्षर निवडा आणि सर्च बटणावर क्लिक करा
-समोर आलेल्या लिस्टमदील जमीन मालकाचे नाव निवडा
-आता Captcha Code Verify करा
-वेरिफाय झाल्यानंतर तुमच्या समोर काही ऑप्शन्स येतील
-यामध्ये तुम्हाला मालकाची किती जमीन आहे आणि त्या संदर्भातील सर्व माहिती मिळेल (Property ownership)
हेही वाचा- व्यवसाय वृद्धिसाठी ‘हे’ उपाय करा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखादी प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करता तेव्हा त्याचे लिंक डॉक्युमेंट्स तपासून पहा. म्हणजेच प्रॉपर्टी किती वेळ खरेदी-विक्री केली आहे. यामुळे तुम्हाला आधी कितीवेळा या जमीनीसंदर्भात रजिस्ट्रेशन झाले आहे हे कळेल. मात्र यावेळी ज्याने कोणी ती प्रॉपर्टी खरेदी केली आहे त्याच्याकडून जुन्या रजिस्ट्रेशनची कॉपी जरूर घ्या. त्यानंतर पुन्हा तपासून पहा की, सर्व रजिस्ट्रेशन माहिती ही एकमेकांना लिंक आहे की नाही. जो प्रॉपर्टी तुम्हाला विक्री करत आहे त्याचे आयडेंटी प्रुफ सुद्धा पहा आणि ते कागदपत्रांसोबत जुळतायत का हे वेरिफाय करा. प्रॉपर्टी विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी घ्या.