आपल्या सर्वांना माहिती आहे की दररोजच्या दिवसात आपल्याला काही ना काही गोष्टींचा वापर करावा लागतो. जसे की, साबण, एनर्जी ड्रिंक्स, चॉकलेट, दूध. परंतु तुम्हाला हे ऐकून हैराण व्हायला होईल की, असे काही प्रोडक्ट्स आहेत जे भारतात खुल्या पद्धतीने विक्री तर केले जातात. पण तेच प्रोडक्ट्स परदेशात आरोग्यासंबंधितच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव बॅन आहेत. म्हणजेच ते प्रोडक्ट परदेशात वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र अखेर असे का आणि कोणत्या कारणास्तव त्या प्रोडक्ट्सवर बंदी घालण्यात आली आहे याच बद्दल अधिक जाणून घेऊयात.(Products banned in abroad)
लाइफबॉय साबण
परदेशात बंदी असलेल्या प्रोडक्ट्सच्या लिस्टमधअये सर्वात प्रथम क्रमांक म्हणजे लाइफबॉय साबणाचा. पण भारतातील प्रत्येक घराघरांमध्ये लाइफबॉयचा वापर केला जातो. पण हाच साबण त्वचेसाठी धोकादायक मानला गेला आहे. परदेशात याचा वापर काही विशिष्ट जनावरांना अंघोळ घालण्यासाठी केला जातो. दरम्यान भारतात हा साबण मोठ्या प्रमाणात विक्री केला जातो. या साबणाने लोक जनावरांना नव्हे तर स्वत: अंघोळ करतात.
किंडर जॉय चॉकलेट
लहान मुलांचे सर्वाधिक आवडते चॉकलेट म्हणजे किंडर जॉय. पण डब्लूएचओने एका अधिकृत विधानात असे म्हटले होते की, ते आरोग्यासाठी उत्तम नाही. यामध्ये साल्मोनेला नावाच्या विषासंबंधित त्याचा थेट संबंध डब्लूएचओने जोडला होता. काही देशांचे असे मानणे होते की, या चॉकलेटसोबत जे खेळणं दिलं जाते ते लहान मुलं चुकून गळू सु्द्धा शकतात. अमेरिकेत हे प्रोडक्ट इंम्पोर्ट करण्यावर पूर्णपणे बंदी आहे.

जेली कँन्डी
चॉलकेट नंतर मुलांना आवडणारी ही दुसरी गोष्ट आहे. मुलं या सोबत खेळतच नाही तर त्या खातात सुद्धा. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात जेली कँन्डी पूर्णपणे बॅन आहेत. या देशातील हेल्थ ऑर्गेनाइजेशनला असे वाटते की, ते खाल्ल्याने लहान मुलांमध्ये एकटेपणाचा धोका वाढतो. या संदर्भातील काही प्रकरणे सुद्धा समोर आली आहेत. त्यामुळेच त्यावर बंदी घातली गेली आहे. पण भारतात ही कँन्डी अगदी सहज विक्री केली जाते.(Products banned in abroad)
किटकनाशक
परदेशात कार्बेरिल, मॅलाशियन, एसेफेट, डायमेथोएट, क्लोराइपीफॉस, लिंडेन, क्विनालफॉस, फॉस्फॅमिडोन, कार्बेन्डाजिम सारखे जवळजवळ ६० अशी किटकनाशके आहेत ज्यावर पूर्णपणे बंदी आहे. मात्र भारतात ती सहज विक्री केली जातात. उत्तम शेती, अधिक उत्पादन आणि शेताला किडकांपासून बचाव करण्यासाठी याचा वापर शेतकऱ्यांकडून अधिक केला जातो.
हे देखील वाचा- मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल जाणून घेण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर वाचा
रेड बुल
फ्रांन्स आणि डेन्मार्क मध्ये अधिकृत रुपात रेड बुलवर बंदी घालण्यात आली आहे.लिथुआनियात १८ वर्षाखालील मुलांसाठी हे ड्रिंक पिण्यास बंदी आहे. एका परिक्षणादरम्यान, असे आढळून आले की, हे ड्रिंक पिणाऱ्यांमध्ये हृदयासंबंधित समस्या, तणाव आणि हायपरटेंन्शची समस्या उद्भवते. त्याचसोबत जे आजारांचा सामना करत आहेत त्यांच्यामध्ये तर अधिक वाढ होते.