Home » अखेर देसी गर्लने जाहीर केले तिच्या मुलीचे नाव, दोन्ही संस्कृतींचा दिसला संगम 

अखेर देसी गर्लने जाहीर केले तिच्या मुलीचे नाव, दोन्ही संस्कृतींचा दिसला संगम 

by Team Gajawaja
0 comment
priyanka chopra baby name
Share

कोणत्याही अभिनेत्रीचे लग्न झाले की तिच्या फॅन्समध्ये आणि मीडियामध्ये चर्चा रंगते ती तिच्या आई होण्यावरून. मग कलाकारांना मुलं झाली की, त्या मुलांचे फोटो किंवा त्यांचे काय नाव आहे? यावरून चर्चा रंगते. आपण नेहमीच बघतो की, कलाकारांपेक्षा अधिक लाईमलाइट त्यांच्या मुलांना मिळते. बॉलिवूडमध्ये आधीपासूनच करीना कपूर खान, अनुष्का शर्मा आदी अभिनेत्रींच्या मुलांना तुफान मीडिया फुटेज मिळत असते. आता या यादीमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लच्या मुलीचा देखील समावेश झाला आहे. यावर्षीच्या सुरुवातीलाच प्रियांका चोप्रा सरोगसीचा माध्यमातून एका मुलीची आई झाली. आता बाळाच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी प्रियांकाने तिच्या मुलीच्या नावाचा (priyanka chopra baby name) खुलासा केला आहे.

प्रियांका चोप्राने हॉलिवूड स्टार असणाऱ्या निक जोनाससोबत लग्न केले आणि ती परदेशात स्थायिक झाली. लग्नानंतर सर्वांनाच ज्या गोष्टीची आतुरता असते ती गूड न्यूज प्रियांकाने या वर्षाच्या सुरुवातीला दिली. २०२२चे अतिशय आनंदाने स्वागत केले. प्रियांका आणि निकने अजूनही त्यांच्या मुलीचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नसला तरी तिच्याबद्दल लोकांमध्ये तुफान क्रेझ आहे. (priyanka chopra baby name)

नुकतेच प्रियांकाने तिच्या मुलीचे नाव (priyanka chopra baby name) जाहीर करत जन्माची तारीखही सर्वांना सांगितली आहे. प्रियांका आणि निक या दोघांनाही मुलीच्या नावात त्यांचे नाव पाहिजे होते. यासाठी तिने अनेक दिवस नावावर विचार केला आणि अखेर त्यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास असे ठेवले आहे. यासोबतच मालतीचा जन्म १५ जानेवारीला रात्री ८ वाजता कॅलिफोर्नियामध्ये झाला. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही धर्मांनुसार नावाचे एक छान कॉम्बिनेशन करत त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव ठेवले (priyanka chopra baby name) आहे. ‘मालती’ हे नाव संस्कृतमधून घेण्यात आले असून, त्याचा अर्थ ‘लहान सुगंधित फुल’ तर ‘मेरी’ हे नाव लॅटिन भाषेतील स्टेला मॅरीसमधून घेण्यात आले आहे. या नावाचा अर्थ समुद्राचा तारा असा आहे.

=========

हे देखील वाचा – चंद्रमुखी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

=========

तत्पूर्वी प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून ती आई झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली होती. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “आम्ही सरोगसीच्याद्वारे आमच्या बाळाचे स्वागत केले असून, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला आमच्या प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.” प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत २०१८ साली लग्न केले. प्रियांका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी असल्याने त्यांच्या लग्नात वयातील अंतराची चर्चा रंगली होती. (priyanka chopra baby name)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.