Home » पैशासाठी राजपुत्रही विकले जातात तेव्हा !

पैशासाठी राजपुत्रही विकले जातात तेव्हा !

by Team Gajawaja
0 comment
Prince Andrew
Share

ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांचे भाऊ असलेले प्रिन्स अँण्ड्रू पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. अनेक कारणांनी वादात सापडणारे प्रिन्स अँण्ड्रू यांची हेरगिरी होत असल्याचे प्रकरण पुढे आले आहे. एका चिनी गुप्तहेरासोबत मैत्री संपादन केल्याचा आरोप प्रिन्स अँण्ड्रू यांच्यावर होत आहे. राजघराण्यातील एका पार्टीसाठी हा चिनी गुप्तहेर उपस्थित राहिल्यामुळे एकच खळबळ उडाली. नंतर या गुप्तहेराला नेमके कोणी बोलावले याची चौकशी सुरु असतांना प्रिन्स अँण्ड्रू यांनी आपली हेरगिरी होत असल्याची तक्रार नोंदवली. यापूर्वीही प्रिन्स अँण्ड्रू अशाच प्रकारच्या घटनांमध्ये अडकले होते. यावेळी मात्र चिनी गुप्तहेराच्या सोबत दिसल्यामुळे प्रिन्स अँण्ड्रू यांच्यावर टिका होत आहे. ही टिका पाहता राजघराण्यानं सावध पवित्रा घेतला आहे. (Prince Andrew)

प्रिन्स अँण्ड्रू यांनी आता ख्रिसमस आणि नववर्षाच्या सगळ्या कार्यक्रमासाठी राजघराण्यातील कार्याक्रमापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ब्रिटनचे राजघराणे हेरांच्या चक्रव्यूहात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटनच्या राजाचे भाऊ असलेले प्रिन्स अँण्ड्रू यांच्यावर चिनी गुप्तहेरांनी पाळत ठेवल्याची माहिती पुढे आली आणि एकच खळबळ उडाली. या घटनेची चौकशी होत असतांनाच प्रिन्स अँण्ड्रू यांचेही त्या गुप्तहेरासोबत फोटो आढळल्यानं नेमकं कोण कोणाची हेरगिरी करत होते, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. या सर्वांत ब्रिटनचे माजी पंतप्रधान कॅमरुन यांचेही नाव आल्यानं ब्रिटनच्या राजघराण्यानं सावध पवित्रा घेतला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यावर प्रिन्स अँण्ड्रू हे एका चिनी गुप्तहेराच्या जवळ असल्याचाही आरोप झाला आहे. प्रिन्स अँड्र्यूची चिनी उद्योगपती यांग टेंगबो यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे स्पष्ट झाले. (International News)

यांग टेंगबो हे प्रिन्स अँण्ड्रू यांच्या ओळखीचा फायदा घेत अनेकवेळा राजघराण्यात वावरत होते, तसेच ब्रिटनच्या वरिष्ठ राजकीय मंडळींमध्येही त्यांचा वावर होता. प्रिन्स अँण्ड्रू यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. आता हेच यांग टेंगबो हे चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणांना आहे. यांग टेंगबो हे आतापर्यंत H6 या सांकेतिक नावाने ओळखले जात होते. त्यांचे नाव सांकेतिक ठेवावे असा आदेश देण्यात आला होता. मात्र, ब्रिटनच्या न्यायालयात या आदेशाविरोधात दाद मागण्यात आली. कारण यांग टेंगबो यांचा वावर ब्रिटनच्या उच्चपदस्थ अधिका-यांमध्ये कायम होता. त्यांनी कोणाशी संपर्क प्रस्थापित केला आहे, हे त्यांचे नाव उघड झाल्याशिवाय करता येणार नाही, असा दावा करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने त्यांचे नाव सार्वजनिक न करण्याचा आदेश उठवला. यानंतर यांगची ओळख सार्वजनिक करण्यात आली आणि एकापाठोपाठ एक गुप्तहेरी प्रकारांचा खुलासा होऊ लागला. यात प्रिन्स अँण्ड्रू यांचे नावही पुढे आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. प्रिन्स अँण्ड्रू यांच्यावर या प्रकरणात मोठी रक्कम घेतल्याचाही आरोप आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरु असून यात प्रिन्स अँण्ड्रू दोषी आढळले तर हा ब्रिटनच्या राजघराण्याला मोठा धक्का असणार आहे. सध्या ब्रिटनच्या राजघराण्याबाबत ब्रिटनच्या जनतेमध्येच अनेक वाद आहेत. (Prince Andrew)

=======

हे देखील वाचा : अरकान आर्मी आली कुठून ?

======

राजघराण्यावर होणा-या खर्चाबाबत ब्रिटनमध्ये नाराजी आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत असतांना ब्रिटनच्या शाही घराण्याला देण्यात येणा-या भत्त्यांमध्ये कमी करावी अशी मागणी आहे. अशातच प्रिन्स अँण्ड्रू यांचे नाव चिनी गुप्तहेरांसोबत जोडले गेल्यामुळे या मागणीत वाढ होणार आहे. दरम्यान, यांगसोबतच्या संबंधांच्या आरोपानंतर प्रिन्स अँण्ड्रू यांना राजघराण्यातील ख्रिसमस उत्सवापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रिन्स अँण्ड्रू हे ब्रिटनच्या माजी राणी एलिझाबेथचे तिसरे अपत्य आणि सध्याचे राजे चार्ल्स यांचे मधले भाऊ आहेत. त्यांना ड्यूक ऑफ यॉर्क म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे ज्या चिनी गुप्तहेरासोबत नाव जोडले गेले आहे, ते यांग टेंगबो हे यांग हे हॅम्प्टन ग्रुप इंटरनॅशनल या सल्लागार कंपनीचे संचालक आहेत. ही कंपनी ब्रिटीश कंपन्यांना त्यांच्या चीनमधील कामकाजासाठी सल्ला देण्याचे काम करते. प्रिन्स अँण्ड्रू यांनी चीनी व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी पॅलेस चायना नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या सर्व व्यवहारांची आता चौकशी होणार आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.