ब्रिटिश राजघराण्यातील प्रिंन्स हॅरीने केलेल्या काही खुलास्यांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.आता प्रिंन्सने असा खुलासा केला आहे की, ज्यामुळे पुन्हा एकदा अफवा पसरु लागल्या आहेत. ही अफवा आहे प्रिंन्सच्या खऱ्या वडिलांबद्दलची. प्रिंन्स हॅरीने दावा केला आहे की, या अफवाला शह देणारे स्वत: किंग चार्ल्स आहेत. (Prince Harry Real Father)
प्रिंन्स हॅरीने आपल्या आत्मकथन स्पेयरमध्ये खुलासा केला आहे की, किंग चार्ल्स नेहमीच मजेत-मजेत असे म्हणायचे की, ते प्रिंन्स हॅरीचे खरे वडिल नाहीत. द सन मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट्सनुसार, हॅरीने असे लिहिले आहे की, किंग चार्ल्स यांना भंकस करण्याची खुप सवय होती. ते रात्री उशिरा पर्यंत हसत रहायचे. हॅरीने असे म्हटले की, ही एक भयंकर भंकर होती. मात्र जेव्हा त्यांच्या या बोलण्यावरुन अफवा निर्माण झाल्यानंतर त्यांचे खरे वडिल किंग्स नव्हे तर आईचे माजी प्रियकर मेजर जेम्स हॅविट आहेत.
प्रिंन्सचे आयुष्य चवाट्यावर आले
प्रिंन्स हॅरी लिहितात की, बहुतांश लोकांना वाचण्यास मजा येते की, प्रिंन्स हॅरी हा किंग्स चार्ल्सचा खरा मुलगा नाही. मात्र यामुळे माझे आयुष्य चवाट्याव र आले होते. हॅरी असे म्हणतो की, चार्ल्स या गोष्टीची भंकस अशा कारणास्तव करायचे की, प्रिंन्स हॅरी आणि मेजर जेम्स हॅविट याचे केस एकसमान दिसायचे. प्रिंन्स हॅरीने दावा केला आहे की, त्याची आई आणि हॅविट यांची भेट त्याच्या जन्माच्या खुप काळांतर झाली होती. (Prince Harry Real Father)
कोण होते जेम्स हॅविट
जेम्स हॅविट ब्रिटिश आर्मी मधील केविलरी अधिकारी होते. ते १९८६ मध्ये राजकुमारी डायना हिला एका पार्टीत भेटले होते. डायनाचे सुरक्षा अधिकारी राहिलेले केन यांनी आपल्या पुस्तकात असे म्हटले आहे की, जेम्स हॅविट यांनी जेव्हा डायना यांना सांगितले की, ते राइडिंग इंस्ट्रक्टर आहेत तेव्हा त्यांनी असे म्हटले होते की त्यांना घोड्यांची भीती वाटते. मात्र हॅविट यांनी त्यांची भीती दूर करण्यास मदत करतील.
चार्ल्सच्या अफेअरमुळे दुखावली डायना
राजकुमारी डायनाची जेव्हा जेम्स हॅविट सोबत भेट झाली तेव्हा किंग्स चार्ल्सच्या अफेअरमुळे दुखवली होती. त्यावेळी चार्ल्सचे कॅमिला यांच्यासोबत अफेअर सुरु होते. त्यांनी राजकुमारी डायनाच्या मृत्यूनंतर हे पब्लिकली सांगितले. तर राजकुमारी डायनाने १९९५ मध्ये एका टीव्ही इंटरव्यूमध्ये जेम्स हॅविट सोबतचे आपले नाते पब्लिकली सांगतिले होते. दरम्यान तो पर्यंत हॅविट सोबत त्यांचे नाते संपुष्टात आले होते.
हे देखील वाचा- आत्मचरित्राच्या प्रसिद्धीच्या आधीच ब्रिटीश राजघराण्यात आग
१९९६ मध्ये चार्ल्स आणि डायना यांचा घटस्फोट
वेगवेगळे अफेअर असल्यानंतर ही १९९६ मध्ये चार वर्षापर्यंत वेगळे राहण्यानंतर ही राजकुमारी डायनाने प्रिंन्स चार्ल्सशी घोटस्फोट घेतला होता. यापूर्वी १९९२ मध्ये ब्रिटेनचे तत्कालीन पीएम यांनी घोषणा केली होती की, वेल्सचे राजकुमार आणि राजकुमारी यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. १९९७ मध्ये एका रस्ते अपघातात राजकुमारी डायनाचे निधन झाले होते.