Home » जन्मदर वाढवण्यासाठी जपानमध्ये चक्क डेटिंग ॲप

जन्मदर वाढवण्यासाठी जपानमध्ये चक्क डेटिंग ॲप

by Team Gajawaja
0 comment
Japan
Share

जपान हा प्रगत देश सध्या वेगळ्याच संकटामधून जात आहे. जपानची लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे.  एवढी कमी होत आहे की, पुढच्या पन्नास वर्षांत जपानचे अस्तित्वच जगातून पुसले जाईल की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आता जपानी सरकारनं जे शक्य होईल, ते उपाय सुरु केले आहेत.  काहीही करुन जपानची लोकसंख्या वाढलीच पाहिजे, यासाठी जपान सरकार चक्क विवाह केंद्रच चालू करणार आहे.

जपानची लोकसंख्या कमी होत असल्यानं पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सरकारने अधिकाधिक लोकांनी अधिक मुले जन्मला घालावीत म्हणून आवाहन केले आहे.  एवढ्यावरच पंतप्रधान फुमियो किशिदा थांबले नाहीत तर त्यांनी चक्क डेटिंग ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  यामुळे तरुण वर्ग या ॲपचा फायदा घेईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Japan)

जपानची सभ्यता टिकवण्यासाठी अशा कुठल्याही उपायांचा आपण अवलंब करु शकतो, असेही पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सांगितले आहे. अर्थातच त्यांच्या या डेटींग ॲपच्या घोषणेवर जगभरातून विविध प्रतिक्रीया येत आहेत. जपानमध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे. (Latest International News)

याचा एवढा विपरीत परिणाम तेथील संस्कृतीवर झाला आहे की, काही गावांमध्ये तर मोजकेच नागरिक राहत आहेत.  या लोकसंख्या संकटावर कोरोनानं अधिक भर टाकली आहे. अनेक तरुण जपानच्या शहरात राहत आहेत.  नोकरीनिमित्त शहरात राहणा-या या तरुणांना करिअर करायचे आहे. त्यामुळे ते लग्न करण्यासाठी टाळाटाळ करतात.  यात मुलींचीही संख्या मोठी आहे.  शिवाय जपानमधील महागाईही या सर्वास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.(Political News)

जपानचा घटता लोकसंख्या दर यावर गेल्या अनेक वर्षापासून जपानचे सरकार विचारविनियम करीत आहे.  त्यासाठी त्यांनी अनेक घोषणाही केल्या.  शहर सोडून ग्रामिण भागात जाऊ इच्छिणा-या दाम्पत्यांला अनेक सुविधा दिल्या.  तसेच दोन मुले असणा-यांना सरकारी सुविधा दिल्या.  तसेच यापेक्षाही अधिक सुविधा दिल्यास, जास्त सुविधा देण्याचीही घोषणा केली. (Japan)

पण त्याचा फारसा परिणाम झाला नसल्यानं आता जपान सरकार अधिकृतपणे डेटिंग ॲप काढत आहे.  हे डेटिंग ॲप जे वापरणार आहेत त्यांना कायदेशीररित्या अविवाहित असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.  त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. ॲप वापरणा-याला लग्नासाठी तयार असल्याच्या पत्रावरही सही करावी लागणार आहे.(Latest International News)

तसेच जपानी नागरिकांना डेटिंग ॲपवर त्यांचे उत्पन्न जाहीर करणे बंधनकारक असेल. नागरिकांना त्यांचे वार्षिक वेतन सिद्ध करण्यासाठी कर प्रमाणपत्र देखील सादर करावे लागणार आहे.  थोडक्यात आता जपान सरकार विवाह केंद्र चालवणार आहे.  यातून जपानी तरुण-तरुणींचे लग्न करुन देण्यात येणार आहेत.  (Latest International News)

या डेटिंग ॲपसाठी जपान सरकारनं २०२३ च्या बजेटमध्ये २०० दशलक्ष येन आणि २०२४ च्या आर्थिक बजेटमध्ये ३०० दशलक्ष येनची तरतूद केलेली आहे.  अशाच ॲपच्या माध्यमातून जपानी तरुणांना विवाहाला प्रोत्साहनही देण्यात येणार आहे.  फेब्रुवारीमध्ये जपानमधील जाहीर झालेल्या जन्मदरामुळे अनेकांना धक्का बसला आहे.  सलग आठव्या वर्षी हा जन्मदर ५.१ टक्क्यांनी घसरला आहे. (Japan)

तर विवाहाची संख्याही ५.९ टक्क्यांनी घसरली आहे. जपानमध्ये लग्न होऊन अनेक वर्षे झाली तरी येथील बहुतांश जोडपी मूल नको या मतावर ठाम आहेत.  अशा जोडप्यांचेही प्रमाण वाढल्याने त्यांच्यासाठी मार्गदर्शन केंद्र खुले करण्यात आले आहे.  जपानी लोकांवर केलेल्या एका नवीन सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, ७० टक्के अविवाहित पुरुष आणि १८ ते ३४ वयोगटातील ६० टक्के अविवाहित महिलांना नातेसंबंधांमध्ये रस नाही. ३० टक्के अशी जोडपी देखील आहेत ज्यांना लग्नाला अनेक वर्षे उलटूनही मुले होत नाहीत.(Latest International News)

=============

हे देखील वाचा : जून महिन्यात प्रदर्शित होणार ‘या’ धमाकेदार वेब सीरिज

=============

यामुळे येथील सरकार अपत्यप्राप्तीसाठी रोख बक्षीस देत आहे. सध्या जपानमध्ये बाळाचा जन्म झाल्यास त्याच्या आईवडिलांना लाख रुपयांचे बक्षीस देते.  एकापेक्षा अधिक मुले झाली तर त्या टप्प्यात ही बक्षिसाची रक्कम वाढत जात आहे.  याशिवाय नोकरीमध्येही या दांम्पत्याला विशेष सवलत देण्यात येत आहे.  लोकसंख्या कमी झाल्यास एखाद्या देशाचे अस्तित्वच संपुष्ठात येण्याची ही जगातील पहिली घटना आहे.  अर्थातच युरोपातील अन्य देशही जपानच्या पाठोपाठ याच संकटाला सामोरे जात आहेत.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.