Home » चामुंडा माता मंदिराच्या यात्रेसाठी तयारी सुरु 

चामुंडा माता मंदिराच्या यात्रेसाठी तयारी सुरु 

by Team Gajawaja
0 comment
Chamunda Mata Temple
Share

सर्वत्र गणपती बाप्पांच्या आगमनाची आणि पुजेची तयारी सुरु आहे.  गणेशाची आराधना केल्यावर मातेची आराधना केली जाते.  नवरात्रात नवदुर्गांची आराधना होते.  भारतातील प्रसिद्ध नवदुर्गांच्या देवी मंदिरांमध्येही नवरात्रीसाठी तयारी सुरु झाली आहे.  यामध्ये राजस्थानच्या जोधपूरमधील मेहरानगड किल्ल्यातील चामुंडा माता मंदिराचाही समावेश आहे. (Chamunda Mata Temple)

जोधपूरच्या मेहरानगड किल्ल्यात असलेले चामुंडा माता मंदिर हे सर्वात जुन्या मंदिरापैकी एक मंदिर आहे. मुळात मेहरानगड किल्ला अतिशय प्रेक्षणिय आहे. हा किल्ला बघण्यासाठी देशविदेशातील पर्यटकांची गर्दी असते.  यासोबतच अंतिम भागात असलेले चामुंडा माता मंदिरात (Chamunda Mata Temple) देवीच्या भक्तांची सदैव गर्दी असते.  चामुंडा देवी ही जोधपूरच्या नागरिकांची मुख्य देवता मानली जाते.  य़ाशिवाय चामुंडा देवी इष्ट देवता म्हणूनही ओळखली जाते.  

चामुंडा देवी राजघराण्याची ज्येष्ठ देवी मानली जाते.  या मंदिरात भक्तांची वर्षाचे बारा महिनेही गर्दी असतेच.  मात्र दसरा आणि नवरात्रीच्या सणांमध्ये या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भक्तांची अक्षरशः झुंबड उडते.  चामुंडा माता देवीवर महाराणा राव जोधाची अत्यंत श्रद्धा होती.  राव जोधानं ही चामुंडा मातेची मूर्ती 1460 मध्ये मेहरानगड किल्ल्यावर आणली.  देवीसाठी भव्य मंदिर उभारले.  या मंदिरात चामुंडा (Chamunda Mata Temple) देवीची मुर्ती प्रस्थापित करण्यात आली.  यासाठी मंदिर आणि संपूर्ण किल्ल्यात खूप दिवस उत्सव साजरा झाल्याचे सांगण्यात येते.  तेव्हापासून हे मंदिर भक्तांबरोबरच इतिहास आणि कलाप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र झाले.  कारण  महाराणा राव जोधा यांनी बांधलेले हे चामुंडा मातेचे मंदिर वास्तुशास्त्राचा अजोड नमुना मानण्यात येते. 

या मंदिराबाबत युद्धातला किस्सा नेहमी सांगण्यात येतो. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तेव्हा चामुंडा मातेनं चमत्कार केला, असं देवीचे भक्त अभिमानं सांगतात. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानी लष्कराने सर्वप्रथम जोधपूर शहराला आपले लक्ष्य बनवले होतेपाकिस्तानी हवाई दलाने जोधपूर शहरातील मेहरानगड किल्ल्यावर बॉम्बफेक केली.  परंतू मातेच्या आशीर्वादाने मेहरानगड किल्ल्यावर एकच बॉम्ब फुटला आणि बाकीचा एकही बॉम्ब फुटला नाही. एक बॉम्ब स्फोट झाला तरी मेहरानगड किल्ल्याचे काहीच नुकसान झाले नाही.  यावेळी माता चामुंडा देवी यांनी गरुड बनून जोधपूरच्या नागरिकांचे प्राण वाचवले होते, अशीही जोधपूर शहरातील लोकांची श्रद्धा आहे.  तेव्हापासून अनेक स्थानिक पहाटे मंदिरात येऊन देवीचे नियमीत दर्शन करतात.  (Chamunda Mata Temple) 

हा सर्वच परिसर निसर्गसंपन्न आहे.  मंदिर एका टेकडीवर आहे.  मंदिरात जातांना अनेक पाय-या चढाव्या लागतात.  लाल दगडातील हे सर्व बांधकाम आहे.  मंदिराला बांधून अनेक वर्ष झाली तरी हे सर्व बांधकाम अद्यापही भक्कम आहे.  या चामुंडा माता मंदिरच्या मार्गावरच कालिका मातेचेही मंदिर आहे.  या कालिका माता मंदिराला भेट दिल्यावरच देवीचे भक्त चामुंडा माता मंदिराला भेट देतात.  मुख्य म्हणजे, या मंदिरात जाण्यासाठी अनेक स्थानिक पहाटेच्यावेळी येतात.  या मंदिर परिसरातून सूर्योदय बघण्यासाठी गर्दी होते.  मुख्यतः नवरात्रीच्या दिवसात देवीची पहाटेची आरती आणि सूर्योदय यासाठी भक्तांची गर्दी होते.  (Chamunda Mata Temple)

मेहरानगड किल्ल्याच्या दक्षिण भागात हे चामुंडा माता मंदिर (Chamunda Mata Temple) आहे. जोधपूर शहराचे संस्थापक असलेले महाराणा राव जोधा यांनी आपल्या शहरातील नागरिकांसाठी या देवीच्या मंदिराची स्थापना केली.  मेहरानगड किल्ल्यातील उंच भागाची या देवीच्या मंदिरासाठी त्यांनी निवड केली.  येथून देवीची छाया सर्व शहरावर राहील असे राव जोधा यांचे मत होते.  त्यानुसारच या चामुंडा देवीचा जोधपूर शहरावर कायमचा आशीर्वाद असल्याचे बोलले जाते.   ही देवीची मुळ मुर्ती असून राव जोधा यांनी  मंडोरच्या जुन्या राजधानीतून  मुर्ती आणली.   

==========

हे देखील वाचा :  जेव्हा हॉलिवूड सिंगर शकीराचा झाला होता घटस्फोट…

=========

मात्र या मंदिरामागेही एक कथा सांगण्यात येते. हे चामुंडा माता मंदिर (Chamunda Mata Temple) महाराणा राव जोधा यांनी किल्ला बांधताना बांधले. हा किल्ला बांधण्यासाठी राव जोधा यांनी निवडलेली टेकडी हरमीत भट्ट यांच्या ताब्यात होती.  किल्ल्यासाठी भट्ट यांना त्या भागातून बाहेर काढण्यात आले.  तेव्हा त्यांनी राव जोधा यांना शाप दिला,  त्यामुळे या किल्ल्यात कायम पाण्याची कमतरता जाणवली.  भट्ट यांनी शाप दिल्यावर राव जोधा यांना काळजी वाटू लागली.  किल्ल्यात हजारो नागरिक रहाणार होते.  त्यांच्यासाठी पाणी नसेल तर किल्ला ओसाड पडेल हे राव जोधा जाणून होते.  त्यामुळे हा शाप सत्यात येऊ नये, आणि तसे झाल्यावर सामान्य नागरिकांना त्याची झळ बसू नये, यासाठी राव जोधा आई चामुंडाच्या चरणी लीन झाला.  राव जोधाची माता चामुंडाप्रती श्रद्धा होती.  मातेचे मंदिर किल्ल्यात झाले तर भट्ट यांचा शाप बाधणार नाही, असे त्यांना वाटले.  शाप टाळण्यासाठी आणि त्यापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी किल्ल्याच्या आत चामुंडा मातेचे मंदिर बांधण्यात आले. त्यापासूनच देवी चामुंडा ही राजपूतांची मुख्य देवी असल्याचे मानण्यात येते.  पहाटेपासून या मंदिरात भक्तांची गर्दी असते.  सायंकाळी पाच वाजता भक्तांसाठी मंदिर बंद करण्यात येते.  श्रावणात या मंदिरात होम करण्यात येतात.  आता येत्या नवरात्रौत्सवासाठी मंदिरात जोरदार तयारी सुरु आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.