Home » Pregnancy Tourism : भारतातील असं गाव जिथे परदेशी महिला चक्क प्रेग्नन्ट व्हायला येतात !

Pregnancy Tourism : भारतातील असं गाव जिथे परदेशी महिला चक्क प्रेग्नन्ट व्हायला येतात !

by Team Gajawaja
0 comment
Share

प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो असं म्हणतात. मुळातच कुठेतरी फिरायला जाणं, नवनवीन गोष्टी explore करणं हे कोणाला आवडत नाही? सर्वांनाच आवडतं ! त्यातही परदेशी लोकांना भारतीयांबद्दल, भारताबद्दल खूपच आकर्षण असल्याचं पाहायला मिळतं. आपला इतिहास, इथली वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती, विविध जातीधर्मातील एकता, या सगळ्या गोष्टी त्यांना आकर्षित करतात. एकूणच काय तर फॉरेनर्सच्या दृष्टीने भारताचं टुरिझम हा attraction पॉईंट आहे असं म्हणायला हरकत नाही. तसं आपल्या भारतात अनेक गोष्टी पाहायला मिळतात. पण तुम्हला माहीतेय का भारतात असं एक गाव आहे जिथे फॉरेनर महिला चक्क प्रेग्नेंट होण्यासाठी येतात. ‘Pregnancy Tourism’ या नावाने हा प्रकार हल्ली फेमस झालाय. पण हा प्रकार नेमका काय आहे ? आणि इथे येण्याला या महिला का पसंती देत आहेत ? जाणून घेऊ.(Marathi News)

तर लडाखच्या राजधानी लेहपासून काही किलोमीटर अंतरावर बियामा, गारकोन, दारचिक, दाह आणि हानी ही गावं आहेत. यांना आर्य व्हॅली म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या व्हॅलीत ब्रोक्पा जमातीचे लोक राहतात. हे लोक स्वतःबद्दल सांगताना जगातील शेवटचे शुद्ध आर्य असल्याचा दावा करतात. आता शुद्ध आर्य म्हणजे काय? तर त्यांच्यात मूळ आर्यांचा अंश असल्याचं ते सांगतात. आता आर्य भारतीय होते की बाहेरून इथे आले हा वादाचा मुद्दा आहे. हा पण अश्या मुल जातींना, शुद्ध जातींना मास्टर रेस असं म्हटलं जायचं. या वंशाच्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ते उंच, गोरे, निळे डोळे आणि मजबूज जबडे हा निकष सांगतात. त्याचबरोबर ते अधिक हुशार असल्याचंही म्हणतात.(Pregnancy Tourism)

पण सध्या आपल्याला ब्रोक्पा जमातीच्या लोकांबद्दल जाणून घ्यायचंय. तर हे लोक अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज आहेत, असं मानलं जातं. अलेक्झांडर द ग्रेट जेव्हा भारत सोडून जात होता तेव्हा त्याचं काही सैन्य भारतात राहिलं होत आणि त्यांचे वंशज अजूनही भारतात आहेत. तेच हे ब्रोक्पा ! तर अलेक्झांडरच्या सैन्याची उत्तम शरीरयष्टी, शारिरीक रचना या गोष्टी आपल्याही बाळामध्ये असाव्या आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मास्टर रेसचे सर्व गुण आपल्या बाळात यावेत यासाठी परदेशी खासकरून युरोपीय महिला या आर्य व्हॅलीमध्ये येतात आणि स्थानिक पुरुषांच्या सहाय्याने गरोदर होतात. गरोदर झाल्यानंतर त्या पुन्हा आपल्या देशात निघून जातात. (Marathi News)

आता ही गोष्ट फार पूर्वीपासून होत असल्याचं सांगितलं जातं. पण हल्ली इंटरनेटच्या जमान्यात ट्रॅव्हल vlog या गोष्टीमुळे ही इंटरेस्टिंग गोष्ट प्रकाशात आली. आणि त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला. दरम्यान 2007 मध्ये चित्रपट निर्माते संजीव सिवन यांची 30 मिनिटांची डॉक्युमेंटरी अचतुंग बेबी- इन सर्च ऑफ प्युरिटी प्रदर्शित झाली होती. यात एका जर्मन महिलेने कॅमेऱ्यात कबूल केलं होतं की, शुद्ध आर्यन स्पर्म्सच्या शोधात ती लडाखमध्ये आली होती. डॉक्युमेंटरीमध्ये ती महिला असंही म्हणाली की, मुलाला जन्म देण्यासाठी एवढ्या लांबचा प्रवास करणारी ती पहिली जर्मन महिला नाही किंवा शेवटचीही नाही.या .’Pregnancy Tourism’ मागे एक मोठी यंत्रणा काम करत असल्याचं तिने सांगितलं. शिवाय या कामासाठी त्या महिला ब्रोक्पा पुरुषांना पैसेही देतात. त्यामुळे यात काहीच गैर नाही असं त्या महिलांचं म्हणणं आहे.(Pregnancy Tourism)

================

हे देखील वाचा : Tirupati Balaji तिरुपती बालाजी मंदिरातील पुजाऱ्यांना महिन्याला किती वेतन मिळते?

================

आता हे ब्रोक्पा जमातीतील लोक खरंच अलेक्झांडरच्या सैन्याचे वंशज आहेत का ? किंवा ते सुद्धा आर्य आहेत का ? याबद्दल कुठलाही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. पण तरीही या महिला इथे निव्वळ त्यांच्यासारखं बाळ आपल्याला व्हावं या आशेने येतात. त्यामुळे थोडक्यता काय अंधश्रद्धा या केवळ भारतातच आहेत असं नाही. त्या पाश्चात्य देशातही आहेत हे यावरून सिद्ध होत. आता तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की हे प्रेग्नन्सी टुरिझम हा लोकांनी तयार केलेला प्रकार आहे. पण हे सगळं खरं खोटं काहीही असलं तरी भारतात अश्या गोष्टीही फेमस आहेत हे ऐकून नवल वाटलं आणि म्ह्णूनच तुम्हाला हि माहिती share करावीशी वाटली इतकच!


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.