आपण बऱ्याच वेळा ऐकतो की, ‘लेखणीची ताकद ही तलावारीपेक्षा अधिक असते’. कारण लहानशी लेखणी तुम्हाला आव्हान झेलण्याची आणि त्यावर मात करण्याची ही ताकद देते. तलवार आणि लेखणीची ताकद यामध्ये कधीच तुलना केली जाऊ शकत नाही. कारण लेखणीच्या माध्यमातून आपल्याला जी उद्दिष्ट गाठायची आहेत ती स्पष्ट केली जातात. याउलट तलावरीचा वापर हा युद्धात केला जातो. त्याने फक्त लोकांची मुंडकी कापली जातील. पण उद्दिष्ट साध्य होतीलच असे नाही. यामध्ये एका संघाचा विजय होऊ शकतो आणि अनेकांचे प्राण जातील. परंतु लेखणीने लिहिलेल्या पुस्ताकतून आपल्याला ज्ञान आणि शिक्षण संपादन करता येते. जे आपल्या सोबत चिरकाळ टिकून राहते.(Power Of Writing)
आपल्याला जेव्हा आपले आजी-आजोबा, आई-वडिल लहानपणी एखाद्या गोष्टीच्या माध्यमातून आपण काय शिकलो असे विचारयाचे ना? आणि आपण त्यांना लगेच उत्तर देत, त्याबद्दल आपल्याला काय वाटले हे सांगतो. कारण लेखकाने लिहिलेल्या किंवा एखाद्याने सांगितलेल्या गोष्टीवर आपण विचार करतोच. पण त्याच्या लिखाणाची ताकद आपल्याला आपला दृष्टीकोन बदलण्यास ही तितकाच भाग पाडते. प्रत्येकाच्या लेखणीतून निघालेला शब्द न शब्द हा बहुतांश वेळा पटेलच असे नाही. त्याचा प्रभाव मात्र आपल्या विचारांवर पडू शकतो. एखाद्याने असेच का लिहिले असेल? किंवा एखाद्या परिस्थिती संदर्भात अशा पद्धतीने लेखकाचा लिहिण्यामागील उद्देश काय असावा? असे विविध प्रश्न ही आपल्याला पडतात. त्यामुळे आपण त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यामागे लागतोच. पण त्याचवेळी आपल्या ज्ञानात ही तेवढीच अधिक भर पडत असते.
हे देखील वाचा- समकालीन मराठी साहित्यातील अजोड व्यक्तिमत्व – पु. शि. रेगे.
पुस्तक, मिळालेले ज्ञान हे आपल्याला आयुष्यात खुप काही शिकवून जातात. सोप्प्या शब्दांत बोलायचे झाले तर आयुष्य कसे जगायचे याचीच गणितं काही वेळा सोडवण्यास मदत करतात. मित्र-परिवारापेक्षा पुस्तक ही सर्वश्रेष्ठ साथीदार असल्याचे म्हणण्यास हरकत नाही. लेखणीच्या माध्यमातून लिहिलेली पुस्तक महत्वपूर्ण आणि योग्य मार्ग दाखवतात. लेखणीच्या माध्यमातून लिहिलेली एक चुक सुद्धा तुमचे आयुष्य उद्धवस्त करु शकते. लेखणीची धार ही ऐवढी मोठी आहे की, प्रत्येक शब्द न शब्द तुम्हाला तुमची प्रतिष्ठा कायम टिकून राहिल आणि समोरच्या व्यक्तीचे आयुष्य कसे कलाटणीस लागलेल याचा विचार करायला भाग पाडते.(Power Of Writing)
इतिहास हा पुरावा आहे की, लेखांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून संपूर्ण जग बदलले आहे. महात्मा गांधी, जॉन कीट, स्वामी विवेकानंद, विलियम वर्ड्सवर्थ यांनी आपल्या लेखणीतून एखादी जादू करावी तसे लिहिले आहे. लेखणीत लोकांच्या समस्या दूर करण्याची ताकद आहे. आपण पाहतो एखादे पुस्तक जेव्हा लिहिले जाते पण तेच पुस्तक जगभरातील कोणताही व्यक्ती वाचतो. त्यामधील विचार आणि ज्ञानाच्या आधारावर लेखनाने दिलेल्या न्यायामुळेच समाजात काही वेळा बदल घडून येतो.