काश्मिरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. याच काश्मिरच्या सौंदर्यात भर घालणा-या आणि काश्मिरची ओळख असलेल्या चिनार वृक्षांना वाचवण्याची आता वेळ आली आहे. कारण काश्मिरची ओळख असलेल्या या चिनार वृक्षांची लाकूड आणि अन्य कारणासाठी मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. त्यामुळे काश्मिरमध्ये या चिनार वृक्षांच्या संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी जिओ टॅग आणि क्यूआर कोडद्वारे चिनार वृक्षाची संपूर्ण माहिती एकत्रीत करण्यात येत आहे. मोठ्याप्रमाणात होत असलेल्या शहरीकरणासाठी चिनार वृक्षांच्या लाकडांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे या वृक्षांना वाचवण्यासाठी श्रीनगरच्या संशोधन वन विभागानं हा प्रकल्प सुरु केला आहे. (Jammu And Kashmir)
हिरव्यागार पानांनी बहरलेले डेरेदार असे चिनार वृक्षाचे झाड हे काश्मिरच्या सौंदर्यात जसे महत्त्वाचे आहे, तसेच तेथील संस्कृतिचाही एक भाग म्हणून या वृक्षाकडे बघण्यात येते. काश्मिरच्या लोकगितांमध्येही या चिनार वृक्षांचा उल्लेख आहे. तसेच अनेक साहित्यिकांनी या चिनार वृक्षावर साहित्य लिहिले आहे. आता याच चिनार वृक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काश्मिरमधील अनेक चिनार वृक्षांचे वय हे 300 ते 700 वर्षांपर्यंतही आहे. प्रत्येक ऋतुमध्ये वेगळ्या रंगात दिसणा-या या चिनार वृक्षानं काश्मिरचा इतिहास ख-याअर्थांनं जवळून पाहिला आहे. अगदी अतिरेक्यांनी रक्तरंजित केलेला काश्मिरही चिनार वृक्षांनी पाहिला आहे. आता त्याच चिनार वृक्षांना वाचवण्यासाठी येथील वनविभागानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली आहे. (Social News)
काश्मिरची ओळख असलेल्या या चिनार वृक्षासाठी खो-यात 15 मार्च हा चिनार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यासाठी स्थानिक प्रशासनासह अन्य सहकारी संस्थाही मोठ्याप्रमाणात कार्यक्रम करते. याचीच तयारी म्हणून आता काश्मिरमधील सर्वच चिनार वृक्षांची नोंदणी कऱण्यात येणार आहे. चिनार वृक्षांच्या संवर्धनासाठी हाती घेतलेला हा व्यापक उपक्रम आहे. यासाठी या चिनार वृक्षाची संपूर्ण माहिती QR कोडद्वारे उपलब्ध होणार आहे. वन विभागाने जम्मू आणि काश्मीर वन संशोधन संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरु केला आहे. या सर्वेक्षणात केवळ चिनार झाडांची संख्याच निश्चित केली जाणार नाही तर चिनार ट्री रेकॉर्ड फॉर्म अंतर्गत प्रत्येक झाडाची महत्त्वाची माहिती देखील नोंदवली जाणार आहे. या प्रक्रियेद्वारे संपूर्ण प्रदेशातील चिनार वृक्षांचे अचूक स्थान मॅप केले जाते. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनासाठी एक व्यापक डेटाबेस उपलब्ध होत आहे. (Jammu And Kashmir)
यातून आता काश्मिर खो-यातील प्रत्येक झाडावर क्यूआर कोड लावण्यात येत आहे. हे क्यूआर कोड स्कॅन केल्यावर त्या चिनार वृक्षाचे वय किती आहे हे समजणार आहे. तसेच त्याच्या वाढी बद्दलची माहिती, आणि हवामानानुसार होणारे बदल यांचीही माहिती उपलब्ध होणार आहे. वनखात्यानं यासाठी 10 हजार चिनार वृक्षांना क्यआर कोड लावण्याचे उद्दीष्ट समोर ठेवले आहे. याच उपक्रमाअंतर्गत काश्मिर खो-यात चिनार झाडे लावलीही जाणार आहेत. काश्मिरच्या खो-यात आत्तापर्यंत केलेल्या चिनार वृक्षांच्या गणनेनुसार 35 हजाराहून अधिक चिनार वृक्ष आहेत. आता दरवर्षी यात वाढ कऱण्याचा वन विभागाचा मानस आहे. मुख्य म्हणजे काश्मिर खो-यातील जी चिनारची झाडे आहेत, त्यापैकी अनेकांचे वय हे 300 वर्षाहून अधिक आहे. त्यामुळेच या झाडांना जोपासण्याची अधिक गरज आहे. शिवाय नवीन चिनार झाडे लावून भविष्यातील काश्मिरची ओळख जपण्याचा प्रयत्नही वन विभागातर्फे कऱण्यात येत आहे. (Social News)
================
हे देखील वाचा : Trump And Musk : ट्रम्प आणि मस्क कट्टर विरोधक ते पक्के मित्र !
Saif Ali Khan : पतौडी कुटुंबाचा शेवटचा नवाब
================
काश्मिर खो-यात चिनार वृक्ष कोणी आणले याबद्दल वाद आहेत. काही जाणकारांच्या मते काश्मिर खो-यात पहिल्यापासून चिनार वृक्ष होते. त्यासाठी पौराणिक ग्रंथाचा आधार दिला जातो. मात्र काही इतिहासकार इराणच्या हमदान प्रदेशातील इस्लामिक धर्मोपदेशक मीर सय्यद अली हमदानी आणि सय्यद कासिम शाह हमदानी यांनी चिनार वृक्ष काश्मीरमध्ये आणल्याचे सांगतात. या वृक्षाचा डेरेदार आकार पाहून मुघल राजवटीत काश्मीरमध्ये चिनार वृक्षांची अधिक लागवड करण्यात आली. चिनार म्हणजे स्थानिक भाषेत ज्वाला असे नाव होते. मुघल सम्राट जहांगीरने हे नाव दिल्याचीही माहिती सांगण्यात येते. मात्र काळाच्या ओघात याच चिनार वृक्षाचा वाढत्या शहरीकरणाखाली बळी देण्यात येत आहे. त्याला वाचवण्यासाठी आता वनविभाग आणि काश्मिरी जनतेचा एकत्रितपणे प्रयत्न करीत आहे. (Jammu And Kashmir)
सई बने