बाहेरून पूर्णपणे चमक धमक दिसणाऱ्या या बॉलिवूडच्या आभासी जगात शिरल्यानंतर त्याचे खरे रूप आपल्या समोर येते. अनेकदा बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल अतिशय धक्कादायक आणि भयाण वास्तव समोर येते. यात किती तथ्य असते आणि किती नाही हा तर नक्कीच वादाचा विषय आहे. मात्र जेव्हा मोठ्या, लोकप्रिय आणि दिग्ग्ज कलाकारांवर चुकीचे आणि गंभीर आरोप लागतात तेव्हा या ग्लॅमर इंडस्ट्रीचा विकृत चेहरा समोर येतो.
सध्या बॉलिवूड आणि मीडियामध्ये एक मुद्दा तुफान गाजत आहे, आणि तो म्हणजे मॉडेल, अभिनेत्री असलेल्या पूजा मिश्राने (Pooja Mishra) जेष्ठ अभिनेते असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर लावलेले गंभीर आरोप. ‘बिग बॉस’ या शोमधून लाइमलाईट्मध्ये आलेल्या पूजा मिश्राने शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबावर तिचे करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा मोठा आरोप केला आहे. इतकेच नाही तर पूजाने सिन्हा कुटुंबीयांनी तिच्यासोबत ‘सेक्स स्कॅम’ केल्याचा देखील सनसनीखेच दावा केला आहे. पूजाने सांगितले की, शत्रुघ्न सिन्हा तिला बेशुद्ध करून व्यवसाय करायचे. त्यांनी पूजाचे कौमार्य विकून स्वतःच्या मुलीला सोनाक्षीला अभिनेत्री बनवल्याचे धक्कादायक विधान केले आहे.
पूजाने (Pooja Mishra) सांगितले की, “बॉलीवूडमधील एका कुटुंबाने माझे करिअरच नाही तर वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त केले. मी शत्रुघ्न सिन्हा यांच्या विषयी बोलत आहे. मागील १७ वर्षांपासून मी हे सहन करत आहे. माझ्या जागी दुसरे कोणी असते तर त्या व्यक्तीने आत्महत्याच केली असती. माझे वडील पद्माकर मिश्रा हे आयकर अधिकारी होते. शत्रुघ्न सिन्हा माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र होते. वडील आयकर आयुक्त असल्याने त्यांनी शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या संपूर्ण मित्र मंडळींसाठी १००-१०० कोटींची मदत केली होती. मागील दोन दशकांपासून सिन्हा कुटुंब मला त्रास देत आहे. माझे वडील मुंबईमध्ये नोकरी करत असताना, पूनम सिन्हा यांनी त्यांचे ब्रेनवॉश करत त्यांना सांगितले की, बॉलिवूडमध्ये फक्त वेश्या व्यवसाय करणारेच काम करतात.”
पूजा मिश्रा (Pooja Mishra) पुढे म्हणाली की, “आज त्यांचीच मुलगी सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमध्ये काम करत आहे. पण माझे करिअर संपवण्यासाठी त्यांनी माझ्या वडिलांना असे घाणेरडे कारण दिले होते. २००५ मध्ये माझे वडील निवृत्त होऊन पुण्यात आले होते. मी व्हिडिओकॉनच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायचे, तेव्हा पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा माझ्यावर काळी जादू करायचे. त्यांच्या मनात नेहमीच मी त्यांच्यापेक्षा अधिक प्रसिद्ध होऊ नये ही असुरक्षितता होती. आज जेव्हा मी मागे पाहते तेव्हा लक्षात येते की या लोकांनी माझे जवळपास ३५ चित्रपट चोरले. या सगळ्याला फक्त तेच जबाबदार आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी या लोकांनी मला त्रास दिला आणि हे सर्व आम्ही नाही तर सलमान खान, शाहरुख खानने केले आहे असे ते मला सांगायचे.”
======
हे देखील वाचा – उर्फी जावेद पूर्ण कपड्यांमध्ये दिसल्यामुळे नेटकऱ्यांना बसला मोठा धक्का
======
पुढे पूजा (Pooja Mishra) म्हणाली की, “सिन्हा परिवाराने माझे स्पॉनर्स चोरले. मी लोखंडवाला भागात राहायचे तेव्हा मी परदेशातून शॉपिंग करून आली की, या कुटुंबातील लोकं माझ्या घरात घुसायचे आणि मी खरेदी केलेल्या वस्तू चोरून सोनाक्षीला द्यायचे. त्यांनी माझे मीडिया कॉन्टॅक्ट देखील टर्मिनेट केले. फॅशन डिझायनर होणारी सोनाक्षी अचानक कशी बॉलिवूडमध्ये आली? एवढ्या वर्षांमध्ये सलमान खानने मला बिग बॉसमध्ये पुन्हा का नाही बोलावले तर याचे कारण सिन्हा परिवार आहे. माझे सलमानवर खूप प्रेम आहे, मात्र सिन्हा कुटुंबाने मला इथंही त्रास दिला.” (Pooja Mishra)