Political assassination in Japan- जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या करण्यात आली. अशावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला जेव्हा ते देशाच्या पश्चिम भाग नारा येथे एका सभेला संबोधित करत होते. जनसभेदरम्यानच हल्लेखोरांनी त्यांना आवाज दिला आणि त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. खरंतर जापानमध्ये हायप्रोफाइल आणि राजकीय हत्यांचा जुना इतिहास आहे. त्याचसोबत यापूर्वीच्या सुद्धा काही पंतप्रधानांची सुद्धा हत्याच करण्यात आली होती. एकदा तर येथील टीबी डिबेटमध्ये सार्वजनिक आधारावर खुलेआम हत्या झाली जी संपूर्ण देशाने लाइव्ह पाहिली होती.
खरंतर जापानमध्ये पंतप्रधान असो किंवा बडा एखादा अधिकारी, सर्व नागरिकांप्रमाणेच ते सुद्धा ट्रेन किंवा मेट्रोच्या माध्यमातून प्रवास करतात. हे यापूर्वी पासूनचीच प्रथा आहे. अशातच त्यांच्यावर निशाण्यावर घेणे सुद्धा सोप्पे आहे. जापानमध्ये राजकीय हत्या कमी झाल्या आहेत पण ज्या झाल्या आहेत त्या सर्वांनी खळबळ उडवली होती. त्यांच्या निशाण्यातून जापानच्या सम्राटांना सुद्धा बचावले नव्हते.
जेव्हा मेट्रो स्थानकात पंतप्रधानांवर चाकू हल्ला करण्यात आला…
ही गोष्ट ०४ नोव्हेंबर १९२१ मधील आहे. तत्कालीन जापानचे पंतप्रधान तोक्यो मध्ये मेट्रोने प्रवास करण्यासाठी गेटच्या आतमध्ये आले होते तेव्हाच एका स्विचमॅनने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. ताकेशी हारा असे पंतप्रधानांचे नाव होते. तर चाकूहल्ला केलेला स्विचमॅन कोनिशी नाकोएदा हा त्यांच्यावर अशा कारणास्तव नाराज होता की, त्याला असे वाटत होते पंतप्रधान हे एका सर्वसाधारण घराण्यातील आहेत. त्यामुळेच ते देश चालवू शकत नाहीत. त्यांच्या सत्तेवेळी केवळ भ्रष्टाचारच नव्हे तर ते देश चालवण्यास ही असक्षम बनले.
दरम्यान, त्याची नाराजी सरकार आणि सैन्यात असलेल्या तणावामुळे होती. तेव्हा स्विचमॅनला वाटत होते की तो राष्ट्रवादी आहे आणि पीएम यांची हत्या करुन त्याने योग्यच केले. त्याला जन्मठेप सुनावण्यात आली पण नंतर १३ वर्षानंतर तो तुरुंगातून बाहेर पडला.
हे देखील वाचा- भारताविरोधात सतत गरळ ओकणाऱ्या अमेरिकन राजकारणी ‘इलहान ओमर’ नक्की कोण आहेत?
लॉयन पंतप्रधानांवर गोळीबार करण्यात आला तेव्हा…
१४ नोव्हेंबर १९३० मध्ये जापानचे लॉयन पंतप्रधान म्हणून संबोधले जामारे ओशाची हमागुची तोक्यो स्थानकाच्या गेटमधून आतमध्ये आले. त्यावेळी ते ट्रेनमध्ये चढणारच होते पण तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारा व्यक्ती हा पॅट्रियाटिक सोसायटीचा सदस्य अकियोकुशा होता. या सोसाटीला तामेगोसागोया नावाने ओळखले जात होते. ज्या व्यक्तीने हल्ला केला तो आपल्या दक्षिणपंथी विचारांचा असल्याचे ओळखले जात होते. त्याची संस्था सुद्धा त्याच विचारांची होती. असे मानले जाते की, याच संस्थेने त्याला पंतप्रधानांची हत्या करण्यास सांगितले होते.
हमागुची यांना सर्वश्रेष्ठ पंतप्रधान मानले जायचे. ते साहसी होते. ते असे निर्णय घ्यायचे की ज्यामध्ये जोखिम असायची त्यामुळेच त्यांना लॉयन म्हणून लोक संबोधित करु लागली होती. हल्लेखोर त्यांच्यावर अशा कारणास्तव नाराज होता की, पंतप्रधानांनी निशस्रीकरणाच्या संधीवर का सही केली होती. त्याला असे ही वाटत होते की, ते असतील तर देश आणि सेना कमकुवत पडेल. या हल्ल्यात पंतप्रधान बचावले पण त्यांना झालेल्या जखमांमधून ते कधीच वर आले नाहीत. आठ महिन्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आणि हल्लेखोराला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.(Political assassination in Japan)

सम्राट हिरोहितो यांच्यावर तीन वेळा झाला होता जीवघेणा हल्ला
१९२० आणि १९३० च्या दशकात जापानमध्ये दीर्घकाळापर्यंत सम्राट राहिलेले हिरोहितो यांच्यावर तीन वेळा जीवघेणा हल्ल्याचा कट रचला गेला होता. प्रत्येक वेळी ते त्यामधून बचावले. जेव्हा प्रिंन्स सार्जेंट होते तेव्हा २७ डिसेंबर १९२३ मध्ये आपल्या सैन्य वाहनाने जात होते. तेव्हा त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी ते खिडकीच्या येथून बाजूला झाले होते आणि त्यांच्या ऐवजी साथीदारावर हल्ला झाला होता. हा हल्ला दाइसुके नेंहे नावाच्या एका कम्युनिस्टने केला होता. तो जापान आणि कोरियातील लोकांच्या राजकीय हत्यांमुळे नाराज होता. त्याला नंतर फाशीची शिक्षा झाली होती.
त्यानंतर १९२६ मध्ये जेव्हा सम्राट हिरोहिती युवराज होते आणि त्यांचा विवाह प्रिंन्सेस नागाको हिच्यासोबत होणार होती. त्याच दिवशी त्यांच्या वडिलांची आणि त्यांचा हत्येचा कट रचला होता. लग्नात स्फोट घडवून आणत त्यांची हत्या करण्यात येणार होती. पण त्याबद्दल त्यांना कळले. कट रचलेल्या दोघांना नंतर मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली. परंतु राजाच्या आज्ञेनुसार त्यांची शिक्षा सुद्धा कमी करुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. दरम्यान याच्या सहा महिन्यानंतर एकाने आत्महत्या केली तर दुसरा ५ वर्षानंतर सुटल्यानंतर त्याला उत्तर कोरियातील सेनेने अटक केली.(Political assassination in Japan)
सम्राट यांच्यावर तिसरा हल्ला करण्याचा प्रयत्न १९३२ मध्ये झाला होता. तेव्हा कोरियाची स्वतंत्रता सेनानी ली बांग चांग ने त्यांच्या घोडागाडीवर हँन्डग्रेनेट फेकण्याचा प्रयत्न केला पण निशाणा चुकला. त्याला नंतर ताब्यात घेऊन फाशीवर चढवण्यात आले होते.
पंतप्रधानांना जेव्हा१२ नौसिक अधिकाऱ्यांनी घेरले तेव्हा…
ही घटना १५ मे १९३२ मधील आहे. जापानचे पंतप्रधान इनुकाई सुयोसी यांना नौसेनेच्या १२ अधिकाऱ्यांनी घेरले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. हा हल्ला ऐवढा नरसंहारक होता की त्यामुळे संपूर्ण जापान हादरले होते. हे काम त्यांनी देशात तख्तापालट किंवा अस्थिरता आणण्याच्या दृष्टीने केले होते. खरंतर ज्या ठिकाणी पंतप्रधानांवर गोळीबार करण्यात आला त्या कार्यक्रमात जापानच्या दौऱ्यावर आलेले चार्ली चॅप्लिन सुद्धा जापानच्या पीएम सोबत जाणार होते. सैन्याच्या अधिकाऱ्यांना असे वाटत होते की, चॅप्लिन हे अमेरिकन आहेत. त्यामुळे त्यांची हत्या केल्यास अमेरिका आणि जापानमध्ये युद्ध होईल. परंतु चॅप्लिन यांनी सौभाग्याने आपला कार्यक्रम बदलला होता. ते पंतप्रधानांच्या मुलासोहत सुमो पाहण्यासाठी गेले होते.