Home » Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती पगार मिळतो, त्यांची संपत्ती किती आहे?

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती पगार मिळतो, त्यांची संपत्ती किती आहे?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Narendra Modi
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील पावरफुल नेता अशी त्यांची ख्याती आहे. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. संपूर्ण जगामध्ये त्यांचा मोठा दबदबा पाहायला मिळतो. आज मोदींनी जी ओळख, जो रुतबा मिळवला आहे तो पाहून साहजिकच आपल्याला अभिमान वाटतो. मात्र सोबतच मोदी एवढ्या मोठ्या पातळीवर काम करत देशाचे प्रतिनिधित्व करतात म्हटल्यावर त्यांचा पगार, त्यांची संपत्ती याबद्दल देखील सर्रास चर्चा होताना दिसतात. आज जाणून घेऊया मोदींची नेमकी संपत्ती किती आहे. (Narendra Modi)

भारताच्या पंतप्रधानांचा पगार वर्षाला सुमारे २० लाख रुपये आहे. पंतप्रधानांना दरमहा १.६६ लाख रुपये पगार म्हणून मिळतो. मूळ वेतनाव्यतिरिक्त, पंतप्रधानांना मिळणाऱ्या पगारामध्ये दैनिक भत्ता, खासदार भत्ता आणि इतर अनेक भत्ते समाविष्ट असतात. या वेतनामध्ये मूळ वेतन ५०,००० रुपये असते, खर्च भत्ता ३,००० रुपये, संसदीय भत्ता ४५,००० रुपये आणि २,००० रुपये दैनिक भत्ता समाविष्ट आहे. (Marathi News)

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, त्यांनी २०१४ मध्ये १.६६ कोटी रुपयांच्या तुलनेत २०१९ मध्ये २.५१ कोटी रुपयांची मालमत्ता घोषित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुंतवणुकीत २.६७ लाख रुपयांचे सोन्याचा समावेश आहे. त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. याशिवाय त्यांनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये ९.१२ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. NSC मधील ही गुंतवणूक २०१९ मध्ये ७.६१ लाखांवरून अंदाजे २ लाखांनी वाढली आहे. (Todays Marathi Headline)

Narendra Modi

याव्यतिरिक्त, २०२४ च्या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांकडे बँकेत २.८५ कोटी रुपये मुदत ठेवी (FDs) आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही जमीन किंवा शेअर्स नाहीत किंवा त्यांची म्युच्युअल फंडात गुंतवणूकही नाही हे विशेष. मोदींकडे ५२,९२० रुपये रोख आहेत. एका अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणत्याही प्रकारचे बाँड, (Bond) स्टॉक (Stock) किंवा म्युच्युअल फंड (MF) मध्ये कोणतीही गुंतवणूक नाही. याशिवाय त्यांच्याकडे स्वत:चे कोणतेही वाहन नाही. (TOp Marathi Headline)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती मागील १८ वर्षांमध्ये खूपच मर्यादित स्वरूपात वाढलेली असल्याचे दिसते. २००७ मध्ये त्यांची संपत्ती ४२.५६ लाख होती. २०१२ साली ही संपत्ती वाढून १.३३ कोटी इतकी झाली तर २०१४ साली १.२६ कोटी होती. २०१७ साली मोदींची संपत्ती २.०० कोटी झाली. तर २०२४ साली त्यांची संपत्ती ३.२ कोटीं इतकी होती. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये जवळपास ५१ लाखांची वाढ झाली आहे. (Top Trending News)

२०१८-२०१९ साली त्यांचे उत्पन्न ११.१४ लाख रुपये होते.
२०१९-२०२० साली त्यांचे उत्पन्न वाढून १७.२० लाख रुपये झाले.
२०२०-२०२१ साली मोदीजींचे उत्पन्न १७.०७ लाख रुपये असल्याची नोंद करण्यात आली होती. (Top Stories)
२०२१-२०२२ साली त्यांचे उत्पन्न कमी होऊन १५.४१ लाख रुपये झाले.
२०२२-२०२३ साली पुन्हा त्यांचे उत्पन्न वाढून २३.५६ लाख रुपये झाले.

पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या वेळेस सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी गुजरात विद्यापीठातून एमएची पदवी घेतल्याचे जाहीर केले आहे. मोदीजी हे दिल्ली विद्यापीठातून कला शाखेचे पदवीधर आहेत. प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले आहे की, त्यांनी १९६७ मध्ये गुजरात बोर्डातून एसएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. मोदींनी जाहीर केले की, त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नाही आणि त्यांच्याकडे सरकारी थकबाकी नाही. (Latest Marathi Headline)

============

हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता मंदीच्या उंबरठ्यावर !

George Soros : ट्रम्पची तलवार आता सोरोसच्या दिशेनं !

==============

पंतप्रधानांना कोणत्या सुविधा मिळतात?
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना सरकारी घर मिळते. ज्याचे कोणतेही भाडे आकारले जात नाही. ७ लोककल्याण मार्गावर हे सरकारी घर आहे. याशिवाय पंतप्रधानांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) कडून सुरक्षा दिली जाते. याशिवाय अधिकृत दौऱ्यांसाठी एअर इंडिया वन हे एक विशेष विमान देखील मिळते. यातून पंतप्रधान आपला प्रवास करतात. पंतप्रधान फक्त मर्सिडीज-बेंझ S650 या गाडीनेच प्रवास करतात. ही पूर्णता बुलेट प्रुफ गाडी असते. पंतप्रधानांच्या गाडीवर एके-47 रायफलने हल्ला झाला तरी गाडीचे नुकसान होत नाही. पंतप्रधान निवृत्त झाल्यानंतर, त्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी मोफत निवास, वीज, पाणी आणि अगदी SPG संरक्षण दिले जाते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.