पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. येथे एका खास कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते अनेक योजनांचे भूमीपूजन आणि उद्घाटन झाले. या दरम्यान पीएम मोदी यांनी नंद्याल जिल्ह्यातील श्रीशैलममध्ये स्थित श्री भ्रामराम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानमचे दर्शन घेतले आणि यथासांग पूजा विधी केला. आंध्र प्रदेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचे स्वागत राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले. यादरम्यान मोदींनी नंद्याल जिल्ह्यातील श्रीशैलम इथं स्थित भ्रामराम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम या तीर्थक्षेत्राला भेट देत मंदिरात पूजा केली. मोदींनी भेट दिल्यामुळे हे मंदिर कमालीचे चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर देखील हे मंदिर आज ट्रेंडिंगमध्ये आले आहे. (Temple)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील ज्या श्रीशैलम मंदिरात पूजा केली, त्या मंदिराला खास महत्व आहे. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि ५२ शक्तीपाठांपैकी एक आहे. या मंदिराचे अनोखे वैशिष्ट्ये म्हणजे हे एकमेव मंदिर आहे ज्यात ज्योतिर्लिंग आणि एक शक्तीपीठ दोन्ही आहे. या मंदिरात शिवाची आराधना करणार्या भक्ताला अश्वमेध यज्ञात जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य या मंदिरातही मिळते, असे मानले जाते. याच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे हे मंदीर संपूर्ण देशातील वेगळे मंदिर आहे. जाणून घेऊया याच मंदिराबद्दल. (Shrishailm Temple)
आंध्र प्रदेश राज्यातील, कुर्नुल जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठी, श्रीशैलम पर्वतावर, भारताच्या प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणारे ज्योतिर्लिंग म्हणजेच “मल्लिकार्जुन”. श्रीशैलम पर्वतावर असणाऱ्या या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला “श्रीशैलम मल्लिकार्जुन” म्हणूनही ओळखले जाते. आंध्र प्रदेशातील हे निसर्गरम्य मंदिर “दक्षिणेचे कैलाश” म्हणूनही ओळखले जाते आणि हे भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रमुख देवता माता पार्वती (मलिका) आणि भगवान शिव (अर्जुन) आहेत. (Narendra Modi)
असे मानले जाते की, या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व संकटे दूर होतात. श्रीशैलम पर्वत हा नल्ला मल्ल नावाच्या जंगलाच्या मध्यभागी आहे. म्हणजे याचा अर्थ सुंदर आणि उदात्त असा होतो. या पर्वताच्या शिखरावर भगवान शंकर मल्लिकार्जुन लिंगाच्या रूपात विराजमान आहेत. या मंदिराच्या प्रमुख देवता माता पार्वती (मलिका) आणि भगवान शंकर (अर्जुन) आहेत. उत्कृष्ट वास्तुकला आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामांसाठी हे मंदिर ओळखले जाते. या मंदिरात इतर हिंदू देवी देवतांना समर्पित अशी लहान मंदिरे देखील आहे.
पौराणिक कथेनुसार मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचा इतिहास सातवाहन वंशाच्या शिलालेखांवरून दिसून येतो. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे मंदिर हे दुसऱ्या शतकापासूनच अस्तित्वात असल्याने सांगितले जाते. विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर याने या सुंदर मंदिराला आधुनिकतेने सर्वप्रथम जोडले असे सांगितले जाते आणि तसा पुरावा देखील उपलब्ध आहे. या ज्योतिर्लिंगाच्या उभारणीमध्ये अनेक मोठमोठ्या राजे सम्राटांचे योगदान आहे. पल्लव, चालुक्य, काकतीय, रेड्डी आदी राजांनी या मंदिराची विकास कामे करून घेतली असे सांगितले जाते. (Todays Marathi Headline)
========
Diwali 2025: लक्ष्मीपूजन जाणून घ्या योग्य पद्धत आणि शुभ मुहूर्त, देवी लक्ष्मीला कसे कराल प्रसन्न!
========
श्रीशैलम मंदिराचा मुख्य मंडप आणि दक्षिण गोपुरम हे विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर यांनी बांधले. विजयनगरच्या राजांनी या ठिकाणी गोपूर बांधले होते. त्याचे शिखर सोन्याचे होते. तसेच या ठिकाणी तलाव, मंदिर देखील बांधले. सन १६६७ मध्ये कर्नाटक स्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी मंदिराच्या उजव्या बाजूला एक गोपूर बांधले व त्या ठिकाणी अन्नछत्र देखील सुरू केले होते.
कर्नुल पासून जवळपास १८० किलोमीटर अंतरावर असलेले हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचा परिसर हा जवळपास २ हेक्टर मध्ये पसरलेला आहे. हा मंदिर परिसर २८ फूट लांब आणि ६०० फूट उंच भिंतींनी वेढलेला असा आहे. ज्यामध्ये श्रीमल्लिकार्जुन आणि माता भ्रमरंबा यांची मुख्य मंदिरे आहेत. विजयनगरच्या स्थापत्य कलेच्या उत्कृष्ट नमुन्यांपैकी एक असलेल्या या मंदिराला प्रशस्त अंगण आणि उंच खांब द्रविड शैलीत बांधले गेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर अनेक शिल्पकला दिसून येतात. अर्धनारीश्वर, सहस्रलिंगेश्वर, उमा महेश्वर, वृद्ध मल्लिकार्जुन आणि ब्रम्हा मंदिर यांच्यासारखे अनेक मंदिरेही या परिसरात दिसून येतात. (Marathi News)
मल्लिकार्जुन मंदिराची वास्तूकला मंदिर परिसर एकूण ०२ हेक्टरमध्ये व्यापलेला आहे आणि गोपुरम म्हणून ओळखले जाणारे चार गेटवे टॉवर आहेत . मंदिरात असंख्य तीर्थस्थाने असून त्यात मल्लिकार्जुन आणि भ्रमरंबा सर्वात प्रमुख आहेत. मंदिर संकुलात अनेक सभागृहे आहेत. त्यातील सर्वात उल्लेखनीय म्हणजे विजयनगर काळात बांधलेला मुखमंडप. (Latest Marathi News)
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मध्यवर्ती मंडपममध्ये अनेक खांब आहेत, ज्यामध्ये नाडीकेश्वराची मोठी मूर्ती आहे. मंदिर १८३ मीटर बाय १५२ मीटर आणि८.५ मीटर उंच भिंतींनी वेढलेले आहे. हद्दीत अनेक शिल्पे आहेत. मुखमंडप, गाभाऱ्याकडे जाणारा सभामंडप इथे अत्यंत क्लिष्टपणे कोरीव काम केलेले खांब आहेत. मल्लिकार्जुन मंदिर सर्वात जुने मानले जाते, ते ७ व्या शतकातील आहे.
जवळपास २ हेक्टर मध्ये पसरलेला मंदिराचा हा परिसर आहे. यामध्ये ४ गेटवे टॉवर्स आहेत. ज्यांना आपण “गोपुरम” असे म्हणतो. या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक मंदिरे बांधली गेली आहेत. ज्यामध्ये मल्लिकार्जुन आणि भ्रमरंबा ही सर्वात महत्त्वाची मंदिरे आहेत. विजयनगर काळात बांधलेला हा गोपूर अतिशय उत्कृष्ट आणि पाहण्यासारखा आहे. ज्याचा शिखर त्यावेळी सोन्याचा बनवला गेला होता. मंदिराच्या मध्यभागी अनेक मंडपम खांब आहेत आणि यामध्ये नाडीकेश्वराची एक विशाल अशी मूर्ती आहे. (Top Marathi Stories)
श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर कथा
शिव पुराणानुसार श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराची कथा भगवान भोलेनाथच्या कुटुंबाशी संबंधित आहे. असे मानले जाते की भगवान शिवाचा धाकटा मुलगा गणेश हे कार्तिकेयच्या आधी लग्न करू इच्छित होते. यावर उपाय म्हणून भोलेनाथ आणि माता पार्वती यांनी दोघांसमोर एक अट ठेवली की जो कोणी पृथ्वीची प्रथम प्रदक्षिणा लावले त्याचे प्रथम लग्न लावण्यात येईल. हे ऐकून कार्तिकेय प्रदक्षिणा घालू लागला परंतु गणेशजी बुद्धीने हुशार असल्याने त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांची प्रदक्षिणा केली आणि त्यांना पृथ्वीसारखे असल्याचे सांगितले. (Top Marathi Trending Headline)
जेव्हा कार्तिकेयला ही बातमी कळली तेव्हा तो संतापला आणि क्रंच डोंगरावर गेला. जेव्हा त्यांना समजावण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले, तेव्हा पार्वती देवी त्यांना आणण्यासाठी गेल्या परंतु त्यांना पाहून ते तिथून पळून गेले. यामुळे निराश होऊन पार्वती तिथे बसल्या आणि भगवान भोलेनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपाने प्रगत झाले. हे ठिकाण श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर म्हणून दृश्यमान झाले. (Marathi News)
श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर शक्तीपीठ
शक्तीपीठ म्हणजे सती देवीचे अवशेष ज्या ठिकाणी पडले. पौराणिक कथा सांगते की देवी सतीचे वडील राजा दक्ष यांच्याकडून भगवान भोलेनाथचा अपमान सहन न झाल्यामुळे देवीने आत्मदहन केले. भगवान शिवाने देवी सतीचे जळलेले शरीर उंचावले आणि तांडव केले आणि या काळात त्यांच्या शरीराचे अवयव ज्या-ज्या ठिकाणी पडले ते शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. श्रीशैलम हे त्याच्या वरच्या ओठांचा परिणाम मल्लिकार्जुन मंदिरात पडल्याचा विश्वास आहे. श्रीशैलम श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिर हे १८ महाशक्ती पीठांपैकी एक आहे. (top Marathi Headline)
या देवस्थानाचे एक प्रमुख वैशिट्य म्हणजे दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या काळात साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्थळी भेट देऊन काही काळ वास्तव्य केले होते व या प्रसंगाचे उल्लेख अनेक ऐतिहासिक पुस्तकांमध्ये आहेत असे इतिहासकार सांगतात.
शिवराय ज्या वेळी या स्थळी आले त्यावेळी या स्थळाचे अवणर्नीय दृश्य पाहून साक्षात कैलास पर्वतचाच भास झाला आणि या देवस्थानास आपल्या देहाचे अपर्ण करून जीवितसार्थक करावे असे त्यांना वाटले मात्र त्यांनी आपली तलवार उपासल्यावर भवानी मातेचे दर्शन त्यांना झाले आणि त्यांना सांगितले की देशाच्या व जनतेच्या रक्षणासाठी आपला जन्म झाला असून आपल्याला यापुढेही मोठे कार्य करायचे आहे. (Top Marathi News)
भवानी मातेचा उपदेश ऐकल्यावर त्यांनी या रम्य स्थळी कायमचे राहून तपस्वीवृत्तीत पुढील काळ व्यतीत करावा अशी इच्छा व्यक्त केली आणि लोकांस म्हणाले आमचे सर्व मनोरथ जगदंबेच्या कृपेने पूर्ण झाले असून आता सर्व गोष्टींतून निवृत्त होऊन याच स्थळी मोक्षसाधनेत उरलेले दिवस घालवावेत असे मला वाटत आहे तेव्हा तुम्ही ही मोहीम पूर्ण करून रायगडास जावे आणि संभाजी राजेंना गादीवर बसवून त्यांचे नावे राज्यकारभार चालवावा. (Marathi Latest Headline)
महाराजांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला मात्र महाराज या ठिकाणी ध्यानधारणेस बसले आणि तब्बल नऊ दिवस त्यांनी या स्थळी ध्यान केले. ध्यानातून बाहेर आल्यावर रघुनाथपंत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत व अशा प्रकारे अनेकांनी हट्ट केल्याने महाराजांनी पुन्हा एकदा क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचा विचार केला आणि या ठिकाणी खूप दान धर्म करून एक घाट बांधला आणि त्याचे नाव श्रीगंगेश असे ठेवले. (Top Trending News)
===================
हे देखील वाचा:
Diwali 2025: दिवाळीचे ५ दिवस प्रत्येक दिवस सांगतो शुभत्व, प्रेम आणि नव्या सुरुवातीचा अर्थ!
Dhanteras : धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजन का केले जाते?
=================
तपस्वी लोकांना तप करण्यासाठी गुहांची निर्मिती केली, धमर्शाळा आणि मठ बांधले, मंदिराच्या उजव्या दिशेस एका गोपुराची निर्मिती केली ज्यास आजही श्री शिवाजी गोपुरम या नावाने ओळखले जाते व या ठिकाणी महाराज आणि भ्रमराम्ब्रा देवीची भव्य मूर्ती आहे. येथे ठिकाणीच श्री शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र आणि ध्यान केंद्राची नव्याने स्थापना करण्यात आली आहे आणि या परिसरातील सर्व नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतात व जागोजागी महाराजांची चित्रे आणि नावे दिसून येतात. (Top Stories)
या मंदिरा व्यतिरिक्त श्रीशैलम वन्यजीव अभयारण्य देखील आहे. यामध्ये बिबट्या, वाघ, हरणांच्या अनेक प्रजातींसह विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांची घरे देखील आहेत. निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे अभयारण्य एक केंद्रबिंदू ठरले आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics