Home » Cooler : मेटल की प्लास्टिक नक्की कोणते कुलर घेणे आहे फायदेशीर?

Cooler : मेटल की प्लास्टिक नक्की कोणते कुलर घेणे आहे फायदेशीर?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Cooler
Share

उन्हाचा तडाखा जस जसा वाढत आहे, तस तशी फॅनची मागणी देखील कमालीची वाढत आहे. ऊन इतके जास्त आहे की, फॅन देखत ही उष्णता कमी करण्यास आणि आपल्या शरीराला थंडावा देण्यास असमर्थ ठरत आहे. मे महिन्याची सुरुवात झाली आहे, आणि उष्णतेच्या लाटा देखील वाढू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी तर रस्ते तर माणसांशिवाय अगदी ओस पडायला लागले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ ते ४९ अंशांपर्यंत पोहोचत आहे. ही गर्मी फॅनमुळे कमी होत नाही, आणि एसी लावणे आरोग्यासाठी आणि आपल्या खिशाला सतत लावणे शक्य नसते. अशा परिस्थितीत घरांमध्ये थंडावा टिकवण्यासाठी कूलरची मागणी खूप वाढली आहे. (Cooler)

फॅन आणि एसी या दोन गोष्टींमधला खिशाला परवडणारा आणि थंडावा देणारा पर्याय म्हणजे कुलर. कुलरचे महत्व आणि कुलरमुळे मिळणारा थंडावा सगळ्यांनाच भावत आहे. त्यामुळे कुलरची मागणी खूपच वाढली आहे. आपणही कुलर घेण्याच्या विचाराने जेव्हा दुकानात जातो, तेव्हा आपल्याला कुलरमध्ये अनेक ऑप्शन पाहायला मिळतात. विविध आकारांचे, विविध रंगाचे, लहान मोठे, पाण्याचे कुलर, साधे कुलर, प्लास्टिकचे कुलर, मेटलचे कुलर आदी अनेक पर्याय यात आहे. मात्र बहुतकरून ग्राहकांचा गोंधळ उडतो तो प्लॅस्टिकच्या आणि मेटलच्या कुलरमध्ये नक्की कोणता कुलर घेणे फायदेशीर असते? चला जाणून घेऊया. (Summer News)

प्लास्टिक एअर कूलर
प्लॅस्टिकचे कुलर हे वजनाला हलके असतात. त्यामुळे हे कुलर इकडून तिकडे हलवायला सोपे असतात. त्यामुळे ते घराच्या किंवा ऑफिसच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वापरण्यासाठी उत्तम आहे. तसंच किंमतीच्या बाबतीत प्लास्टिकचे कुलर अधिक परवडणारे असतात. प्लॅस्टिक एअर कूलर डिझाईन्स, रंग आणि आकारांच्या आधारे वेगवेगळ्या पर्यायात उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीचे त्यांच्या घराला शोभेल असे कूलर निवडणे सोपे जाते. प्लॅस्टिक कुलरमधून विद्युत प्रवाह जात नसल्याने लहान मुले किंवा पाळीव प्राणी असलेल्या घरांमध्ये हे कुलर वापरणे अधिक चांगले आणि सुरक्षित आहे. (Marathi Latest News)

Cooler

प्लॅस्टिक एअर कूलरला ऑपरेट करण्यासाठी कमी वीज लागते, ज्यामुळे कमी वीज बिल येऊ शकते. प्लास्टिकच्या कुलरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते इन्व्हर्टरवरही सहज चालतात. अनेक ग्रामीण भागांमध्ये जिथे लाईट जाण्याची समस्या असते, तिथे प्लास्टिकचे कूलर खूप उपयोगी ठरत आहेत. असे असले तरी प्लॅस्टिक एअर कुलरचे काही तोटेही आहेत. (Marathi Top News)

कुलर घेण्याचा सर्वत मोठा आणि महत्वाचा उद्देश म्हणजे थंडावा मिळणे. प्लास्टिकचे कुलर इथेच कमी पडते. मेटलच्या तुलनेत प्लस्टिकचे एअर कुलर कूलिंग देत नाहीत. तसंच ते फार काळ टिकत नाहीत. उष्णतेमध्ये प्लास्टिकच्या कुलरचे पाते लवकर खराब व्हायला लागतात. दुपारच्या वेळी जेव्हा थेट सूर्यप्रकाश कुलरवर पडतो, तेव्हा काही स्वस्त ब्रँडच्या कुलरची बॉडी गरम होऊन नरम पडते. (Marathi Trending News)

==========

हे देखील वाचा : Sindoor : सिंदूर लावण्याचे धार्मिक फायदे

========== 

मेटल एअर कूलर
जर तुम्हाला जास्त चांगले कुलिंग हवं असेल तर मेटल एअर कुलर हा एक उत्तम पर्याय आहे. मेटल कुलर हे प्लॅस्टिक कुलरपेक्षा महाग असतात. असे असले तरी त्याचे फायदे देखील अनेक असतात. मेटल एअर कूलर मोठ्या प्रमाणात आणि मोठा परिसर थंड करण्यास सक्षम आहेत. मेटल कूलरमध्ये मजबूत मोटर आणि पंखा असतो, जो जास्त हवा फेकण्याचे काम करतो. मेटल एअर कूलर प्लॅस्टिक कूलरपेक्षा अत्यंत टिकाऊ असतात. प्लास्टिकच्या एअर कूलरपेक्षा मेटल कूलर जास्त काळ टिकू शकतात. (Social News)

Cooler

मेटल एअर कूलर हे प्लॅस्टिक एअर कूलरपेक्षाअधिक मोठे आणि वजनाने अधिक असतात. ज्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे ठेवणे अवघड असते. एकूणच काय तर जरी मेटल कुलर हे जास्त महाग असले तरी ते अधिक टिकाऊ आणि अधिक थंडावा देणारे आहेत. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने देखील हेच कुलर चांगले त्यामुळे एकदाच खर्च करून मेटल कुलर घेण्यास काहीही हरकत नाही. (Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.