भाद्रपदेच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात होते. या दरम्यान पितरांच्या शांतिसाठी पिंडदान, श्राद्ध आणि दान केले जाते. यंदा पितृपक्ष २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे. या दरम्यान व्यक्तीने आपल्या पूर्वजांची पूजा करावी. त्यांच्यासाठी केळीच्या पानावर जेवण दाखवावे. परिवारातील पितृदोष दूर होण्यासह पितरांचे आशीर्वाद यामुळे मिळतात. याच दरम्यान काही कामे करणे वर्ज्य असतात. ते केल्याने तुम्हाला पाप लागण्यासह पितृदोष अधिक वाढला जाऊ शकतो. तुम्हाला कष्ट-वेदना सहन कराव्या लागतात. (Pitru paksha)
पितृपक्षात पिंडदान आणि तर्पण व्यतिरिक्त अन्य काही उपाय आहेत जे केल्याने तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात. त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. त्याचसोबत परिवारावरील संकटे दूर होतात. व्यक्तीच्या आयुष्यात सुख-शांति मिळते. अशातच पितृ पक्षात कोणती कामे करू नयेत याच बद्दल आपण जाणून घेऊयात.
-श्राद्धादरम्यान कधीच शुभ कार्य करून नयेत. जसे की, लग्न ते गृहप्रवेश किंवा बाळाचे नामकरण.
-या दिवसात कोणतेही नव्या वस्तू खरेदी करू नयेत. त्याचसोबत तामसिक भोजन करू नये.
-श्राद्ध म्हणजेच पितृपक्षात लोखंडाची कढई किंवा अन्य भांड्यांत जेवण शिजवू नये.
-पितृपक्षात चुकूनही दाढी-मिश्या करू नयेत. यामुळे धनाची हानि होते. पितरांचा दोष लागतो. (Pitru paksha)
पितृपक्षात करा ही कामे
-पितृपक्ष सुरु होण्यासह संध्याकाळी तिळाचे तेल किंवा गाईचे तूप वापरून दक्षिण दिशेला दिवा लावावा. पितरांना नियमित रुपात तर्पण द्यावे.
-प्रत्येक दिवशी पितृ सुक्तातील पितृ गायत्रीचा जाप करावा.
-पितृपक्षात ब्राम्हण किंवा गरीबांना भोजन द्यावे
-श्राद्धाच्या दिवशी गाय,कुत्रा किंवा कावळ्यांना भोजन द्यावे. यामुळे लाभ होतो. पितृ प्रसन्न होतात.
पितृ सूक्त पाठ
उदिताम् अवर उत्परास उन्मध्यमाः पितरः सोम्यासः।
असुम् यऽ ईयुर-वृका ॠतज्ञास्ते नो ऽवन्तु पितरो हवेषु॥
अंगिरसो नः पितरो नवग्वा अथर्वनो भृगवः सोम्यासः।
तेषां वयम् सुमतो यज्ञियानाम् अपि भद्रे सौमनसे स्याम्॥
ये नः पूर्वे पितरः सोम्यासो ऽनूहिरे सोमपीथं वसिष्ठाः।
तेभिर यमः सरराणो हवीष्य उशन्न उशद्भिः प्रतिकामम् अत्तु॥
त्वं सोम प्र चिकितो मनीषा त्वं रजिष्ठम् अनु नेषि पंथाम्।
तव प्रणीती पितरो न देवेषु रत्नम् अभजन्त धीराः॥
त्वया हि नः पितरः सोम पूर्वे कर्माणि चक्रुः पवमान धीराः।
वन्वन् अवातः परिधीन् ऽरपोर्णु वीरेभिः अश्वैः मघवा भवा नः॥
त्वं सोम पितृभिः संविदानो ऽनु द्यावा-पृथिवीऽ आ ततन्थ।
तस्मै तऽ इन्दो हविषा विधेम वयं स्याम पतयो रयीणाम्॥
बर्हिषदः पितरः ऊत्य-र्वागिमा वो हव्या चकृमा जुषध्वम्।
तऽ आगत अवसा शन्तमे नाथा नः शंयोर ऽरपो दधात॥
आहं पितृन्त् सुविदत्रान् ऽअवित्सि नपातं च विक्रमणं च विष्णोः।
बर्हिषदो ये स्वधया सुतस्य भजन्त पित्वः तऽ इहागमिष्ठाः॥
उपहूताः पितरः सोम्यासो बर्हिष्येषु निधिषु प्रियेषु।
तऽ आ गमन्तु तऽ इह श्रुवन्तु अधि ब्रुवन्तु ते ऽवन्तु-अस्मान्॥
आ यन्तु नः पितरः सोम्यासो ऽग्निष्वात्ताः पथिभि-र्देवयानैः।
अस्मिन् यज्ञे स्वधया मदन्तो ऽधि ब्रुवन्तु ते ऽवन्तु-अस्मान्॥
अग्निष्वात्ताः पितर एह गच्छत सदःसदः सदत सु-प्रणीतयः।
अत्ता हवींषि प्रयतानि बर्हिष्य-था रयिम् सर्व-वीरं दधातन॥
येऽ अग्निष्वात्ता येऽ अनग्निष्वात्ता मध्ये दिवः स्वधया मादयन्ते।
तेभ्यः स्वराड-सुनीतिम् एताम् यथा-वशं तन्वं कल्पयाति॥
अग्निष्वात्तान् ॠतुमतो हवामहे नाराशं-से सोमपीथं यऽ आशुः।
ते नो विप्रासः सुहवा भवन्तु वयं स्याम पतयो रयीणाम्॥
आच्या जानु दक्षिणतो निषद्य इमम् यज्ञम् अभि गृणीत विश्वे।
मा हिंसिष्ट पितरः केन चिन्नो यद्व आगः पुरूषता कराम॥
आसीनासोऽ अरूणीनाम् उपस्थे रयिम् धत्त दाशुषे मर्त्याय।
पुत्रेभ्यः पितरः तस्य वस्वः प्रयच्छत तऽ इह ऊर्जम् दधात॥
हेही वाचा- गणपतीचे एकमेव मंदिर जेथे व्यक्तीरुपी गणेशाची होते पूजा
(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)