Pitru Paksha Born: लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात असे नेहमीच म्हटले जाते. त्यांच्या येण्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. मात्र विविध धर्मात-जातींमध्ये मुलं जन्म घेण्यासंदर्भातील काही प्रथा-परंपरा आहेत. काही वेळेस आपण असे ही ऐकतो की, मुलं ज्या वेळी जन्म घेते त्या वेळेला खुप महत्व असते आणि त्यावरुनच त्याचे भाग्य ठरले जाते. मात्र सध्या पितृपक्ष सुरु झाला आहे. तर श्राद्धच्या काळात कोणतेही शुभ करु नये असे सांगितले जाते. मात्र अशातच जर पितृपक्षात एखादे मुलं जन्मल्यास त्याचे भाग्य वाईट असते का? त्याच्या येण्याने परिवाराला त्रास होतो का? असे विविध प्रश्न तुमच्या मनात सुद्धा कधी ना कधी आले असतीलच ना? तर याच प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत.
खरंतर पितृपक्षात जन्मलेले मुलं हे परिवारासाठी किंवा स्वत:साठी भारी नसतात. पण ही मुलं अत्यंत शुभ आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठी काम करतात. तर आता पितृपक्षातील जन्मलेल्या मुलाचा स्वभाव ते त्याच्या भाग्याबद्दल ही अधिक पाहूयात.
पितृपक्षात जन्मलेल्या मुलाचे भाग्य
अशी मल आपल्या वयाच्या तुलनेत अधिक समजूतदार असतात. कमी वयातच त्यांना आपली जबाबदारी कळते आणि त्यांच्याकडे खुप ज्ञान असते. या काळात जन्मलेली मुलं आयुष्यात प्रगती करतात.
पितृपक्षात जन्म घेतलेल्या मुलाचे भविष्य
मुल ज्या वेळी जन्म घेते तो सुद्धा नकारात्मक मानला जात नाही. पितृपक्षात जन्म घेणारे मुलं जसे आपण पाहिले शुभ असते, तर शास्रात असे म्हटले आहे की, या मुलांवर पितरांची विशेष कृपा असते.
ही मुलं आपल्याच कुळात घेतात जन्म
असे मानले जाते की, या पक्षात जन्मलेली मुलं ही परिवाराच्या कुळातीलच पुर्वज असतात. त्याचसोबत त्यांचा जन्म एका विशिष्ट हेतूसाठी झालेला आहे. शास्रांमध्ये असे म्हटले जाते की, या पक्षात जन्मलेली मुलं खुप रचनात्मक असतात.(Pitru Paksha Born)
हे देखील वाचा- लहान मुलांमध्ये ऑटिज्मच्या कारणामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या, पालकांनी वेळीच लक्ष द्या
परिवाराशी अत्यंत जोडलेली असतात ही मुलं
पितृपक्षात जन्म घेतलेल्या मुलाला आपल्या परिवाराची अधिक ओढ असते. त्यांचा विचार अधिक व्यापक असतो. या मुलांना कमी वयातच खुप काही गोष्टी माहिती पडतात. याच कारणामुळे असे म्हटले जाते की, या पक्षातील मुलं खुप पुढे जातात.