जेथे एका बाजूला संपूर्ण जग देशातील आपल्या सीमांवरुन वाद घालत आहेत. रशिया असो किंवा भारत-चीन प्रत्येक ठिकाणी वाद सुरु आहे. अशातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये सुद्धा सीमा वाद सुरु झाला आङे. भारताने तर या वादावरुन पुन्हा एकदा चीन आणि दोन वेळेस पाकिस्तानशी युद्ध ही केले. युक्रेन आणि रशिया मध्ये अद्याप युद्ध सुरु आहे. मात्र या सर्वानंतर ही जगात असे एक बेट आहे जे प्रत्येक ६ महिन्यानंतर आपला देश बदलतात. ही कोणती कथा नसून हे खरं आहे. या अनोख्या बेटावर ६ महिने एका देशाचे शासन तर पुढील ६ महिने दुसऱ्या देशाचे शासन. (Pheasant Island)
कोणते आहे हे बेट?
पृथ्वीवर लहान मोठी बेट आहेत. जी आपले लोकशन, सौंदर्य आणि अन्य काही खास नियमांच्या कारणास्तव प्रसिद्ध आहे. दरम्यान, काही बेटांवर काहीच नाही. जेथे कोणीही राहत नाही. पण फीजैंट बेट हे फार अनोखे आहे. हे जगातील असे एकमेव बेट आहे जे दोन देशांच्या ताब्यात राहते. दोन्ही ही देश ६-६ महिने यावर शासन करतात. The Tim Travller नावाच्या युट्युब चॅनलवर याबद्दल संपूर्ण माहिती दिली गेली आहे.
खरंतर हे बेट फ्रांन्स आणि स्पेनच्या दरम्यान आहे. वर्ष १६५९ मध्ये बेटासंबंधित एक करार झाला होता. त्यानुसार ६ महिने यावर फ्रांन्स तर ६ महिने स्पेनचे शासन होते. सर्वात मोठी गोष्ट अशी की, फ्रांन्स आणि स्पेन दरम्यान, या बेटासंबंधित कोणतेही युद्ध झालेले नाही. अगदी शांतप्रिय पद्धतीने फ्रांन्स आणि स्पेन प्रत्येक ६ महिने या बेटावर आपले शासन करते. (Pheasant Island)
हे देखील वाचा- काश्मिरमध्ये पुन्हा एकदा पूर्वीची रौनक…
का झाला होता करार?
वर्ष १६५९ मध्ये फ्रांन्स आणि स्पेनच्या दरम्यान या बेटासंबंधित जो करार झाला होता त्याका पायनीस कराराच्या नावाने ओळखले जाते. खरंतर हे बेट २०० मीटर लांब आणि जवळजवळ ४० मीटर रुंद आहे. एका नदीच्या मधोमध येणाऱ्या या बेटावर नक्की कोणाचे शासन असणार याचा विचार केला जात होता. त्यानंतर फ्रांन्स आणि स्पेनने आपल्या एकमेकांच्या सहमतीने या बेटासंदर्भात एक करार केला. या करारात अशी अट मान्य केली गेली ती म्हणजे ६ महिने या बेटावर फ्रांन्सचे शासन तर ६ महिने स्पेनचे शासन असणार आहे.