Home » प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ मध्ये समतोल राखण्यासाठी ‘या’ टीप्स नक्की वाचा

प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ मध्ये समतोल राखण्यासाठी ‘या’ टीप्स नक्की वाचा

by Team Gajawaja
0 comment
Personal Life
Share

आयुष्यात मजा-मस्ती करण्यासाठी प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमध्ये समतोल राखणे अत्यंत गरजेचे असते. सध्याच्या काळात लोक प्रोफेशनल लाइमध्ये अधिक त्रस्त दिसून येतात आणि याच कारणामुळे पसर्नल लाइफमध्ये ही त्याचा प्रभाव दिसतो. काही वेळेस वर्किंग स्टाइल ही आयुष्यातील नात्यात आणि परिवारात बाधा बनवतात. प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफचा समतोल राखल्यास सर्वकाही सुरळीत होते. मात्र त्यासाठी योग्य प्लॅनिंग करणे अत्यावश्क असते. तर याच संबंधितच्या काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Personal-Professional Life)

-टाइम मॅनेजमेंट करा
प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यात समतोल राखण्यासाठी फार महत्वाची भुमिका बजावते ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. खासकरुन महिलांना प्रोफेशनल कामांमुळे घरातील काही जबाबदाऱ्या सोडाव्या लागतात. अशातच गरजेचे आहे की, टाइम मॅनेजमेंट. त्यानुसार तुम्ही गोष्टींसाठी वेळ काढा आणि त्यांना प्राथमिकता द्या. जसे की, ऑफिसचे काम सुरु करण्यापूर्वी घरातील सर्व महत्वाची कामे उरकून घ्या. जेणेकरुन ऑफिसच्या दरम्यान घरातील कामे करण्यापासून तुम्ही दूर रहाल.

Personal-Professional Life
Personal-Professional Life

-डेली शेड्युल बनवा
घर आणि ऑफिसचे कामे योग्य पद्धतीने पूर्ण होण्यासाठी निश्चितपणे डेली शेड्युल तयार करु शकता. त्यामध्ये सकाळ पासून ते रात्रीपर्यंत कोणते कामे करायची आहेत ते ट्रॅक करता येईल. जसे की, खाण्याची वेळ, काम करण्याची वेळ अशा पद्धतीनुसार तुम्ही शेड्युल तयार करा. (Personal-Professional Life)

-एखाद्याची मदत घ्या
प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमध्ये समतोल राखण्यासाठी एखाद्याची मदत घेऊ शकता. महिला किंवा पुरुष दोघे ही काम करणारे असतील तर त्यांनी घरी कामावरुन आल्यानंतर एकमेकांना मदत करावी. सध्या केयर टेकर घरात ठेवल्याने तुमची घरातील कामे हलकी होतात. मात्र हेच जर तुम्ही एकमेकांच्या मदतीने केली तर अधिक सोप्पे होईल.

हे देखील वाचा- सणासुदीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताय..? वजन वाढू नये म्हणून अशी घ्या काळजी

-कामातून ब्रेक घ्या
बहुतांशवेळा आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे आपण स्वत:साठी वेळ काढतच नाही. अशातच काही वेळासाठी का होईना कामातून ब्रेक घ्या. यावेळी तुम्हाला आवडत असलेली एखादी गोष्ट करा किंवा अगदीच वेळ असेल तर प्रोफेशन लाइफ आणि पर्सनल लाइफ कशा पद्धतीने मॅनेज करायचे याबद्दल प्लॅनिंग करा. जर तुम्ही वेळोवेळी अधित तणाव न घेता प्लॅनिंग करत असाल तरच तुमची कामे ही सुरळीत पार पडू शकतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.