तुम्ही सुद्धा पर्सनल लोन (Personal Loan)घेण्याचा विचार करतायत? तर तुम्हाला या संबंधित काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे अत्यावश्यक आहे. कारण पर्सनल लोन हे अशा प्रकारचे एक कर्ज आहे ज्यामध्ये तुम्हाला मोठी संपत्ती गहाण किंवा गॅरेंटीच्या रुपात ठेवावे लागत नाही. बँक काही गोष्टी आणि तुमची कर्ज फेडण्याची क्षमता पाहून तुम्हाला कर्ज देते. दरम्यान, पर्सनल लोनसाठी काही महत्वाची कागदपत्र आणि योग्यता असण्याची गरज असते. अशातच आम्ही तुम्हाला पर्सनल लोनसंदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्हीच फायद्यात राहणार आहात.
पर्सनल लोनवरील व्याज दर हा अधिक असतो. पण विविध बँकेचे व्याजदर ही वेगवेगळे असतात. खरंतर कर्ज हे व्याजाच्या काही फॅक्टर्सवर निर्भर असतात. असे असू शकते की, बँक वेगवेगळ्या व्याज दरावर कर्ज देईल. तर पाहूयात बँक कोणत्या गोष्टींच्या आधारावर पर्सनल लोनचे व्याजदर हे ठरवले जातात.
-क्रेडिट स्कोर
क्रेडिट स्कोर हे दाखवतो की, व्यक्तीला पर्सनल लोन देण्यात किती जोखिम आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोर कमी असेल तर बँक अधिक जोखिम घेत अधिक व्याज दर हा कर्जावर लागू करते. त्यामुळेच नेहमीच सल्ला दिला जातो की, ७५० किंवा अधिक क्रेडिट स्कोर असणे गरजेचे असते.
-महिन्याभरातील उत्पन्न
बँक असे मानते की, जो कोणीही पर्सनल लोन घेत आहे त्याने त्याची वेळेवर परतफेड केली पाहिजे. त्यामुळ ज्या लोकांचे उत्पन्न अधिक असतो त्यांना पर्सनल लोक लवकर आणि कमी दरात मिळते.

-कुठे काम करता त्यावर अलंबून असते
पर्सनल लोनचे व्याजदर ठरवताना हे सुद्धा पाहिले जाते की. तुम्ही कुठे आणि काय काम करता. प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना लवकर आणि उत्तम व्याजदरावर पर्सनल लोन दिले जाते. तर शासकीय नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या जॉब सिक्युरिटीच्या कारणामुळे उत्तम व्याजदर लागू करत पर्सनल लोन मिळते.(Personal Loan)
हे देखील वाचा- बँक खात्यात झिरो बॅलेंन्स असला तरीही पैसे काढता येतात?
-बँकेसोबत तुमचे संबंध
जर तुमचे बँकेसोबत उत्तम आणि जुने संबंध असतील आणि यापूर्वी सुद्धा तुम्ही एखादे लोनची वेळेवर परतफेड केली असेल तर तुम्हाला अगदी सोप्प्या अटींसह आणि कमी व्याज दरात लोन मिळू शकते. बँकेत असलेल्या ग्राहकांना प्री-अप्रूव्ड लोनची ही ऑफर मिळू शकते.
योग्यता
वय- अर्जदाराचे कमीत कमी १८ वर्ष आणि अधिकाधिक ६० वर्ष असावे
क्रेडिट स्कोर- ७५० पेक्षा अधिक
सॅलरी- नोकरदार वर्गासाठी कमीत कमी सॅलरी १५ हजार रुपये प्रति महिला
स्थिर रोजगार- एकूण कार्याचा अनुभव २ वर्ष, ज्यामध्ये १ वर्ष नोकरी असावी किंवा स्वत:चा व्यवसाय असेल तर कमीत कमी २ वर्षांची अट
रोजगाराचा प्रकार- प्रतिष्ठित संस्था, खासगी किंवा सार्वजनिक संस्था, शासकीय संस्था, पीएसयुमध्ये काम करणारी व्यक्ती.