सध्या आपण २१ व्या शतकात जगत आहोत तरीही काही गोष्टींबद्दल बोलणे टॅबू मानले जाते. त्यापैकीच एक असलेल्या मासिक पाळीबद्दल बोलताना थोडे अडखळतात. मासिक पाळी हा एक शब्द नव्हेच तर अशी गोष्ट आहे जी महिलांच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्वाची गोष्ट आणि त्यामुळे तिच्यात बदल होताना दिसून येतात. या संबंधित काही परंपरा सुद्धा आहेत. ज्या आजही पाळल्या जातात. पूर्वोत्तर भारतात असलेले आसाम असे एक राज्य आहे जेथे मासिक पाळी येणे हे एका सणाप्रमाणे साजरे केले जाते. तर जाणून घेऊयात याच अनोख्या परंपरेबद्दल अधिक. (Period tradition)
आसाम मध्ये मासिक पाळीसंदर्भात असलेल्या परंपरेला ‘तुलोनिया बिया’ असे म्हटले जाते. या राज्यात जेव्हा राज्यात मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी येते तेव्हा हा सण अगदी आनंदात साजरा केला जातो.
सात दिवस वेगळे ठेवले जाते
तुलोनिया बिया मध्ये मुलीला सात दिवस वेगळे ठेवले जाते. तिला एका खोलीत बंद केले जाते आणि तिला भेटण्याची सुद्धा परवानगी नसते. खासकरुन पुरुषांना. या दरम्यान मुलीला फळंच खायला दिली जातात. एका दिवसात फक्त एकादाच खाल्ले जाते आणि ते सुद्धा उकळवून दिलेले पदार्थ.

जेव्हा चार दिवस पूर्ण होतात तेव्हा मुलीला हळदीच्या पाण्याने अंघोळ घातली जाते. ज्या ठिकाणी तिला अंघोळ घातली जाते तेथे केळीचे झाडं लावले जाते. तर अन्य समुदायात मुलीचे केळ्याच्या झाडाशी लग्न केले जाते. चौथ्या दिवसानंतर मुलीच्या घरी काही महिला येतात ज्या तिला मासिक पाळी संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी सांगतात. या सर्व गोष्टी बिया नाम या नावाचे गाणे गाऊन सांगितल्या जातात.
लग्नाप्रमाणेच असतो कार्यक्रम
आसाम मध्ये जेव्हा मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी येते तेव्हा खुप आनंद व्यक्त केला जातो. सर्व नातेवाईकांना बोलावले जाते. ऐवढेच नव्हे तर काही लोक कार्ड सुद्धा छापतात. हॉल बुक करतात. त्यासाठी मुलीला सजवले सुद्धा जाते. तिला साडी नेसली जाते आणि मेकअप ही केला जातो.(Period tradition)
हे देखील वाचा- मासिक पाळी सुरु झाल्यानंतर मुलींची उंची वाढत नाही?
‘या’ आहेत मासिक पाळी संदर्भातील परंपरा
-तमिळनाडूत ‘मंजल निरातु विजा’ सण साजरा केला जातो. हा सण मासिक पाळी संबंधित आहे.
-नेपाळ मध्ये सुद्धा चौपाडी प्रथा आहे. या दरम्यान महिलेला वेगळे करुन एका मोठ्या बेड्यांमध्ये बांधले जायचे. मात्र सरकारकडून ही परंपरा बंद करण्यात आली.
-ओडिसा मध्ये मासिक पाळीचा सण साजरा करण्याच्या प्रथेला राजा प्रभा असे म्हटले जाते.
-केवळ भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा मासिक पाळी संदर्भात परंपरा आहे. जसे जापान मध्ये मुलीची आई सोकीहान नावाची पारंपरिक डिश बनवते.
-इज्राइलमध्ये मुलीला मासिक पाळी आल्यानंतर मध खायला दिले जाते.