Home » Period Pain Home Remedies: मासिक पाळी दरम्यान होतात असह्य वेदना तर मग ‘हे’ घरगुती उपाय करा

Period Pain Home Remedies: मासिक पाळी दरम्यान होतात असह्य वेदना तर मग ‘हे’ घरगुती उपाय करा

मासिक पाळीदरम्यान महिलांना दोन प्रकारच्या वेदना होतात. पहिल्याला प्राथमिक डिस्मेनोरिया आणि दुसऱ्या याला सेकेंडरी डिस्मेनोरिया म्हणतात.

0 comment
Period Pain Home Remedies
Share

मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेकदा आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही स्त्रियांच्या शरीराला सूज येते, तर काहींना असह्य वेदना होऊ लागतात. मासिक पाळीदरम्यान महिलांना दोन प्रकारच्या वेदना होतात. पहिल्याला प्राथमिक डिस्मेनोरिया आणि दुसऱ्या याला सेकेंडरी डिस्मेनोरिया म्हणतात. प्राथमिक डिस्मेनोरियामुळे पोटाच्या खालच्या भागात वेदना होतात परंतु हा आजार नाही. ही वेदना मासिक पाळीच्या सुरुवातीला होते आणि २ ते ३ दिवसांत बरी होते. या काळात पोटाच्या खालच्या भागात आणि मांडीत वेदना जाणवतात आणि गर्भाशयात फायब्रॉइड्स, पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज किंवा एंडोमेट्रिओसिस सारखा कोणताही आजार असेल तर मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होतात आणि त्याला सेकेंडरी डिसमेनोरिया म्हणतात. मासिक पाळी सुरू होण्याच्या आठवडाभर आधी ही वेदना वाढते आणि काही वेळा यामुळे बद्धकोष्ठता, गॅसच्या तक्रारीही होतात. 40% स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दुखण्याबरोबरच अंगाला सूज येणे, स्तन दुखणे , पोटात खुप दुखणे , एकाग्रता कमी होणे, मूड बदलणे, थकवा अशी काही लक्षणे आढळतात.तुम्हाला किंवा तुमच्या घरात असलेल्या माता – बहिणींना हा त्रास होत असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी आहे. आज आपण मासिक पाळी  दरम्यान होणाऱ्या वेदना घरच्या घरी कशा कमी करू शकू हे जाणून घेणार आहोत.(Period Pain Home Remedies)

Period Pain Home Remedies

Period Pain Home Remedies

 
– आल्या मध्ये अँटीऑक्सिडंट घटक आढळतात. अशावेळी मासिक पाळी दरम्यान आल्याचं सेवन केल्यास त्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. आल्याचे सेवन तुम्ही चहा म्हणून किंवा आल्याचे पाणी करूनही करू शकता.
 
– मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तेल मालिश हा सर्वात सोपा आणि जलद मार्ग आहे. ऑइल मसाज किंवा बॉडी मसाजमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवण्यापासून बचाव होतो. पोट आणि पाठीच्या खालच्या भागाला मसाज केल्याने मासिक पाळीच्या दुखण्यात आराम मिळतो.
 
– मासिक पाळीच्या काळात महिलांमध्ये गॅसची समस्या वाढते. गॅसच्या समस्येमुळे ही पोटदुखी होते.यावर मात करण्यासाठी जीरे हा उत्तम पर्याय आहे. अर्धा चमचा जिरयामध्ये मध्ये अर्धा चमचा मीठ मिसळून कोमट पाण्यासोबत प्यायल्याने मासिक पाळीत तात्काळ आराम मिळतो.
Period Pain Home Remedies

Period Pain Home Remedies

–  मासिक पाळीदरम्यान अंगाला सूज येणे स्वाभाविक आहे. परंतु मासिक पाळी सुरु झाल्यास थोड्या वेळेसाठी मीठाचे सेवन कमी केल्यास आपल्या मूत्रपिंडांना जास्त पाणी काढून टाकण्यास मदत होईल. तसेच या काळात घट्ट कपडे घालू नका, विशेषत: कंबरेपासून सैल कपडे घाला. अन्यथा आपल्या पोटावर दबाव येईल आणि अस्वस्थता वाढेल.
 
– निरोगी आणि हर्बल पुदिना चहा प्यायल्याने मासिक पाळीदरम्यान जाणवणाऱ्या कळा पासून आराम मिळतो. पुदिन्याच्या पानांमध्ये पाचन गुणधर्म देखील असतात जे मासिक पाळीदरम्यान महिलांमध्ये पोटाशी संबंधित समस्या देखील दूर करतात. पुदिन्याचा चहा प्यायल्याने सूज येणे आणि गॅसची समस्या देखील कमी होते.(Period Pain Home Remedies)
 
=======================
 
=======================
 
– पोटदुखीसह शरीरातील जवळजवळ प्रत्येक दुखण्यावर मसाज हा उपचार आहे. मासिक पाळीच्या काळातही मसाज केल्याने दुखण्यात बराच आराम मिळतो. पण हा मसाज तुम्हाला पोटात नाही तर पायावर करावी लागेल. मासिक पाळीच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी पायात प्रेशर पॉईंट असतो. हा बिंदू घोट्याच्या हाडापासून तीन बोटांच्या रुंदीवर स्थित आहे. जर आपण आपल्या अंगठ्याने आणि बोटांनी हळूवारपणे या बिंदूची मालिश केली तर पोटदुखीसह उलट्या आणि चक्कर येणे यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळेल. 
 
– काही वेळा पीरियड्सदरम्यान डिहायड्रेशनमुळेही महिलांना त्रास होऊ शकतो. अशा वेळी महिलांनी मासिक पाळीदरम्यान भरपूर पाणी प्यावे. पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ तर बाहेर पडतातच, पण त्या व्यक्तीला हायड्रेटेडही ठेवता येते.
 
(डिस्क्लेमर: वरील लेख माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील उपाय करण्याआधी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यावा.) 

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.