सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना चालवत आहेत. या योजनाअंतर्गत शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढवण्यासह काही लाभ ही मिळतात. सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या या योजनांपैकीच एक प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे. ही योजना वृद्ध, आणि लहान शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी बनवण्यात आली आहे. ही एक स्वैच्छिक आणि तुमच्या सोईनुसार अशी पेंन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत वयाच्या ६० व्या वर्षानंतर प्रत्येक लाभार्थ्याला सरकारकडून ३ हजार रुपयांची पेंन्शन दिली जते. यासाठी शेतकऱ्यांना केवळ पीएम किसन मानधन मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. (Pension scheme for farmers)
या व्यतिरिक्त जर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास तर शेतकऱ्याचा नवरा किंवा बायकोला पेंन्शनच्या रुपात त्याचा ५० टक्के मिळवत हक्क मिळू शकतो. पारिवारीक पेंन्शन केवळ नवरा-बायकोसाठी लागू आहे. तसेच मुलांना याचा लाभ घेता येणार नाही.
पीएम किसान मानधन बद्दल अधिक
केंद्र सरकारद्वारे चालवली जाणाऱ्या योजनेत वयाच्या ६० वर्षानंतर पेंन्शन सुरु होते. यामध्ये १८ ते ६० वर्षापर्यंत कोणताही व्यक्ती अर्ज करु शकतो. यामध्ये वयानुसार प्रत्येक महिन्यात तुम्हाला एक मर्यादित रक्कम भरल्यानंतर वयात्या ६० वर्षानंतर ३ हजार रुपये महिन्याला किंवा ३६ हजार अशी वार्षिक पेंन्शन मिळणार आहे. यामध्ये तुम्ही ५५ रुपये ते २०० रुपये प्रति महिना तुमचे योगदान देऊ शकता.
पीएम किसानच्या हप्त्या अंतर्गत पैसे कापले जातील
पीएम किसान अंतर्गत सरकार गरीब शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला २ हजार रुपयांच्या ३ हप्त्यात ६ हजार रुपयांचे आर्थिक मदत देते. या योजनेतील खातेधारकांनी जर पेंन्शन योजना पीएम किसान मानधन मध्ये सुद्धा सहभागी होऊ पाहत असतील तर त्यांना रजिस्ट्रेशन करणे सोप्पे होणार आहे. दुसरा ऑप्शन असा की, पेंन्शन योजनेत प्रत्येक महिन्यात कापले जाणारे पैसे सुद्धा ३ हप्त्यात मिळणाऱ्या रक्कमेमधून कापले जातील. (Pension scheme for farmers)
हे देखील वाचा- क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ‘या’ चुका करणे टाळा, अन्यथा होईल नुकसान
दरम्यान, पेंन्शन योजनेत कमीत कमी ५५ रुपये आणि अधिकाधिक २०० रुपये प्रति महिना द्यावे लागतात. अशाप्रकारे अधिकाधिक योगदान २४०० रुपये व कमीत कमी योगदान ६६० रुपये आहे. ६ हजार रुपयांमधील अधिकाधिक योगदान २४०० रुपये कापले गेले तर सम्मान निधीचे ३६०० रुपये खात्यात राहतील. तर ६० वर्षानंतर तुम्हाला ३ हजार रुपये प्रति महिन्याला पेंन्शनचा लाभ मिळणार आहे. तर २ हजारांचे ३ हप्ते सुद्धा येणार. ६० वर्षानंतर एकूण फायदा ४२००० रुपये वार्षिक असणार आहे.