Home » हेल्दी टाएटमुळे PCOD बरा होऊ शकतो?

हेल्दी टाएटमुळे PCOD बरा होऊ शकतो?

by Team Gajawaja
0 comment
PCOD
Share

पॉलीसिस्टिक ओवरी डिजीज म्हणजेच पीसीओडी सध्याच्या बहुतांश तरुणींना आणि महिलांना होत आहे. यामुळे त्या फार त्रस्त असतात. हे एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. यामुळे महिलांच्या पीरियड्सवर परिणाम होतो आणि प्रेग्नेंसीवेळी ही समस्या येतात. याचा थेट परिणाम महिलांच्या वजनावर सुद्धा होतो. यामुळे काही महिलांना अधिक थकवा ही जाणवतो. पीसीओडी मध्ये महिलांच्या ओवरीत सिस्ट म्हणजेच लहान लहान गाठी होतात. पीरियड्सचा परिणाम केवळ शरिरावरच नव्हे तर इमोशनली सुद्धा होऊ शकतो. (PCOD)

पीसीओडीमुळे होणाऱ्या हार्मोनल इंबॅलेन्समुळे महिला इमोशनली काही समस्यांचा सामना करतात. पीसीओडीत तुम्ही तुमच्या डाएटची काळजी घेतली पाहिजे. हेल्दी डाएट आणि योग्य लाइफस्टाइलच्या मदतीने तुम्ही पीसीओडी बरा करु शकता याच बद्दल तज्ञ काय म्हणतात हे पाहूयात.

पीसीओडीची कारणं
पीसीओडीची अनेक कारण असू शकतात. पण खालील काही कारणं ही मुख्य कारणांमध्ये ओळखली जातात.

-अनहेल्दी लाइफस्टाइल
-खाण्यापिण्यात बेजबाबदारपणा
-शरिराची हालचाल न होणे
-पीरियड्स असंतुलित होणे
-पोषक तत्व असलेली भोजन न करणे
-अनुवांशिक कारण
-शरिरात इंसुलिनचे प्रमाण अधिक होणे
-अचानक वजन वाढणे
-सिगरेट आणि दारुचे अधिक सेवन

हेल्दी डाएट आणि पीसीओडी
पीसीओडीला मॅनेज करण्यामध्ये हेल्दी डाएटची फार महत्वाची भुमिका असते. यासाठी तुमचे डाएट योग्य असले पाहिजे. तुमच्या डएटमध्ये शुगर आणि कार्ब्स कमी असले पाहिजे. तर प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असले पाहिजे. योग्य डाएटचा हार्मोन्सवर सकारात्मक परिणाम होतो. इंफ्लेमेशन कमी करते आणि पीसीओडीच्या लक्षणांमध्ये सुधारणा करण्यास मदत करते. तुम्ही दीर्घकाळापर्यंत हेल्दी डाएट फॉलो केल्याल तर पीसीओडी पासून बरे होऊ शकतात. परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणे सुद्धा फार महत्वाचे आहे. (PCOD)

हेही वाचा- लालचुटक लिचीचे फायदे…

कसे असावे डाएट?
-जर तुम्ही पीसीओडीमुळे त्रस्त असाल तर संतुलित डाएट घ्या. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये तृणधान्य, फळं, भाज्या, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करा.
-अशातच शरिराला पुरेसे न्युट्रिएंट्स मिळतात, ज्यामुळे हार्मोन्स बॅलेन्स होतात. हेल्दी डाएटममुळे इंसुलिन स्तर सुधारतो जो पीसीओडीला मॅनेज करण्यासाठी फार महत्वाचे असते.
-फायबरयुक्त फळ आणि भाज्या खा.
-या व्यतिरिक्त नियमित व्यायाम करणे ही फार महत्वाचे आहे. त्याचसोबत तुम्ही जे काही खाता त्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजेय
-प्रोसेस्ड फूड्स, अधिक शुगर आणि ट्रांन्स फॅट्स खाऊ नये. अँन्टी इंफ्लेमेटरी फूड्स जसे की, हळद, आल आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सचा आपल्या डाएटमध्ये समावेश करावा.
-हाइड्रेट राहणे सुद्धा फार महत्वाचे आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.