आजच्या काळात प्रत्येकजण हेल्थ कॉन्शस आहे आणि म्हणूनच शरीराचा आकार राखण्यासाठी लोक आपल्या आहाराची विशेष काळजी घेतात. पण बाहेर पार्टीला जावं लागलं की मग डाएट बिघडतो. बहुतेक लोक पार्टीला गेल्यावर उलट भरपूर खातात, त्यामुळे त्यांचे वजन वाढते. सहसा सण आणि लग्न सराईत अनेक पार्ट्यांना जावे लागते. पार्ट्यांमध्ये वारंवार बाहेर खाल्ल्यामुळे वजन वाढणे सहाजिकच आहे. . पण जर तुम्ही मर्यादित प्रमाणे खाल्ले तर तुम्ही तुमचे वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता.आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या टिप्सबद्दल सांगत आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही पार्ट्यांमध्ये जाऊनही तुमचे वजन सहज राखू शकता. (Party weight loss)
-उपाशी पोटी जाऊ नका
बहुतांश लोकांना अशी सवय असते की, पार्टीला जेव्हा जायचे असते तेव्हा ते काहीच खात नाहीत. अशा प्रकारे ते आपल्या कॅलरी काउंटला बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही पद्धत चुकीची आहे. यामुळे तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकते. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा पार्टीत जाऊन ओव्हरइटिंग करता. ऐवढेच नव्हे तर पार्टीत खुप वेळ थांबल्यानंतर अधिक ही खाता. अशातच बेस्ट पर्याय म्हणजे तुमचा डाएट शेड्युल फॉलो करा. पार्टीत जाण्यापूर्वी एखादे केळ, सफरचंद खा.
-सलादपासून सुरुवात करा
भले तुम्ही पार्टीत आहात, पण तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. पार्टीत मजा करा पण खाण्याच्या बाबतीत त्याची सुरुवात सलाद पासून करा. जेणेकरुन तुम्ही आधीच ओव्हरइटिंगच्या समस्येपासून दूर रहालय
-हेल्दी पदार्थ खा
पार्टीत तुम्हाला असे ही काही पदार्थ मिळतील ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील.पार्टीत प्रोटीन आणि फायबरचा भरपूर स्रोत असलेले पदार्थ खा. जसे की, टोफू,पनी, ग्रिल्ड चिकन असे काही. या व्यतिरिक्त तुम्ही ताजी फळं, भाज्या, ब्राउन राइस ही खाऊ शकता. पार्टीत प्रोसेस्ड आणि डीप फ्राय पदार्थांपासून दूर रहा.
-लहान प्लेट घ्या
बहुतांश लोकांची अशी सवय असते की, प्लेटमध्ये एकदाच भरपूर प्रमाणात पदार्थ घेतात. मात्र ते खाल्ले जात नाहीत. ऐवढेच नव्हे तर जेव्हा प्लेटमध्ये खुप पदार्थ असतात तेव्हा काही लोक ओव्हरइटिंग सुद्धा करतात. अशातच वजन वाढले जाते. त्यामुळे नेहमीच नियम करा की, पार्टीत लहान प्लेटमधून पदार्थ खा.
-व्यायामाकडे लक्ष द्या
पार्टीत खुप खाल्ल्यानंतर तुमच्या कॅलरीज ही वाढल्या जातात. अशातच गरजेचे आहे की, तुम्ही पुढच्या दिवशी वर्कआउट जरुर करा. जेणेकरुन तुमच्या कॅलरीज बर्न होतील.(Party weight loss)
-गोड पदार्थांपासून दूर रहा
पार्टीत विविध प्रकारचे स्वीट पदार्थ असतात. ते अगदी चविष्ट सुद्धा असतात.मात्र यामुळे सुद्धा कॅलरीज वाढल्या जातातच. पण तुम्हाला उर्जा ही मिळते. मात्र जर ब्लड शुगर कमी झाल्यास तुम्हाला थोड्यावेळाने पुन्हा भूक लागू शकते. अशातच तुम्ही ओव्हरइटिंग करता.
हेही वाचा- उलटं चालल्याने महिलांचे पोट आणि वजन होते कमी
-कोल्ड्रिंक्सपासून दूर रहा
पार्टीत विविध कोल़्डड्रिंक्स मिळतात.त्यामुळे लोक विचार न करतात ते पितात. अशा प्रकारच्या कोल्डड्रिंकसमध्ये केवळ कॅलरीज असतात,ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. अशातच बेस्ट ऑप्शन असा की, तुम्ही कॉकटेल किंवा कोल्डड्रिंक ऐवजी पाणी प्या.