Home » नव्या बाळासाठी शॉपिंग करताना ‘या’ 5 गोष्टी नक्की खरेदी करा

नव्या बाळासाठी शॉपिंग करताना ‘या’ 5 गोष्टी नक्की खरेदी करा

नव्या बाळासाठी कपडे खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. याशिवाय बाळासाठी आवश्यक वस्तू कोणत्या आहेत याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर..

by Team Gajawaja
0 comment
New Born Baby Shopping Tips
Share

Parenting Tips : ज्यावेळी नवा पाहुणा घरी येणार असतो त्यावेळी त्याच्या स्वागतासाठी घरी जोरदार तयारी केली जाते. नवजात बाळासाठी शॉपिंग करताना काही गोष्टी अशा असतात त्या आवर्जुन घेतल्या पाहिजेत. कारण बाळासाठी त्या अत्यावश्यक असतातच. पण बाळाची सुरक्षितताही राखली जाते. बाळाला खरेदी करताना कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….

बाळाचे कपडे
सर्वप्रथम बाळासाठी सुती आणि मऊसर कपडे खरेदी करावेत. कॉटनचे कपडे लहान मुलांच्या त्वचेसाठी उत्तम असतात. या कपड्यांमध्ये बाळ खुप कंम्फर्टेबल राहते. यामुळे बाळाचे कपडे खरेदी करताना असे कपडे निवडा ज्यामुळे परिधान केल्यानंतर त्रास होणार नाही.

डायपर
बाळासाठी अत्याधिक प्रमाणात डायपर खरेदी करता. कारण लहान बाळाला सातत्याने डायपर बदलावे लागते. यावेळी उत्तम ब्रॅण्डचे आणि कंम्फर्टेबल डायपरच बाळासाठी खरेदी करा. जेणेकरून बाळाला डायपरचा त्रास होणार नाही. कारण काही डायपरच्या वापराने बाळांच्या त्वचेवर लाल डाग, इंन्फेक्शनची समस्या उद्भवते. अशातच डॉक्टरांच्या सल्लानुसारही डायपर खरेदी करू शकता.

वाइप्स आणि स्किन केअर प्रोडक्ट्स
बाळाच्या स्वच्छतेसाठी नेहमीत वाइप्सचा वापर करा. जेणेकरुन बाळाची त्वचा मऊ, केमिकल फ्री राहिल. बाळाच्या त्वचेला सूट होणारे लोशनही खरेदी करा. जेणेकरून बाळाची त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होईल.

दूधाची बॉटल
बाळासाठी काही गोष्टी खरेदी करताना दूधाची बॉटलही घ्या. याशिवाय दूधाची बॉटल क्लिन करण्यासाठी येणारे लिक्विडही घेऊ शकता. बाळासाठी दूधाची बॉटल खरेदी करताना त्याचा आकार, बॉटलच्या आजूबाजूची कडा पाहा. (Parenting Tips)

झोपण्यासाठी लागणारे सामान
बाळासाठी मऊ आणि उत्तम ब्रॅण्डचा बेड अथवा पाळणा खरेदी करा. याशिवाय बाळासाठी एक स्लिपिंगग बॅग आणि मंद प्रकाशाचा लॅम्पही खरेदी करा.

(अशाच गाजावाजासंबंधित वेगवेगळ्या माहितीसाठी येथे क्लिक करा.)

आणखी वाचा :
विमानात तुमचे मुलं अचानक रडू लागल्यास करा ‘हे’ काम
सासू-सासऱ्यांसोबत सातत्याने वाद होतात? या गोष्टींकडे द्या लक्ष
तुरूंगात जन्माला येणाऱ्या बाळाच्या जन्मदाखवल्यावर कुठचा पत्ता लिहितात? जाणून घ्या नियम

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.