Parenting Tips : ज्यावेळी तुम्ही विमानातून तुमच्या बाळासह प्रवास करता त्यावेळी ते अचानक रडू लागल्यास त्याला शांत कसे करायचे असा प्रश्न निर्माण होतो. बाळाच्या रडण्यामुळे आपल्यासह आजूबाजूला बसलेल्यांना त्रास होईल याची चिंताही व्यक्त केली जाते. पण अशी स्थिती उद्भवल्यास तुम्ही पुढील काही गोष्टी करू शकता. जेणेकरून तुमचा प्रवास आरामदायी होऊ शकतो.
शांत राहा
सर्वप्रथम स्वत: ला शांत करा. लक्षात ठेवा, आपल्यामुळे आजूबाजूंना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मुलं तुम्हाला शांत राहिलेले पाहून थोड्यावेळाने ते ही आपोआप शांत होईल.
कानावर पडणारा दबाव ओळखा
विमानातून प्रवास करताना कधीकधी बाळाच्या कानावर दबाव निर्माण होऊ शकतो. खरंतर असे होणे सामान्य बाब आहे. यावेळी तुम्ही बाळाला दूध देऊ शकता. ही एक सोपी ट्रिक आहे ज्यामुळे बाळ रडणे थांबवू शकते.
आवडीची वस्तू द्या
प्रवासावेळी मुलांच्या आवडीची खेळणी किंवा वस्तू सोबत ठेवा. जेणेकरून बाळ रडायला लागल्यास त्याला त्या वस्तू द्या. यामुळे बाळ आनंदीत होऊन शांत होईल. (Parenting Tips)
बाळाला हलक्या हाताने गोंजारा
कधीकधी बाळाला हलक्या हाताने गोंजारल्याने ते शांत होते. अथवा बाळाला उचलून घेऊन हळूहळू चाला. यामुळे बाळ रडणे थांबवेल.