Home » पापुआ न्यू गिनी आणि भारत

पापुआ न्यू गिनी आणि भारत

by Team Gajawaja
0 comment
India
Share

भारतापेक्षा (India) सातपट लहान असलेल्या देशात भारताचे पंतप्रधान नरेंद्र  मोदी पोहचले आणि  पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवत पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.  पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मॅरापे यांनी भारतीय पद्धतीनं पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. ते चक्क मोदी यांच्या पाया पडले.  वयानं आणि अनुभवानं मोठ्या असलेल्यांना मान देण्याची ही भारतीय (India) पद्धत. जेम्स मॅरापे यांनी अशाप्रकारे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केल्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला. पण तिकडे आपला शेजारी देश चीन मात्र या घटनेनं प्रचंड अस्वस्थ झाला असणार. अगदी छोटा देश असणा-या पापुआ न्यू गिनीचे महत्त्व आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे आहे. पापुआ न्यू गिनीला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय (India) पंतप्रधान आहेत. पापुआ न्यू गिनी हा तसा दुर्लक्षित देश अगदी लोकसंख्याही 99 लाखाच्या आसपास पण याचा फायदा चीननं घेतला होता. चीननं आपल्या नेहमीच्या पद्धतीनं या देशात आपला हस्तक्षेप वाढवला होता. चीनचा हा वाढता प्रभाव सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण भारतीय पॅसिफिक क्षेत्रासाठी धोकादायक ठरणार हे जाणून भारतानं गेल्या काही वर्षापासून या देशाबरोबर राजकीय सलोखा संपादीत केला आहे. त्यामुळेच पापुआ न्यू गिनी कितीही छोटा देश असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौ-याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर बहुतांश आदिवासी वस्ती असलेला हा पापुआ न्यू गिनी देश कसा आहे, याचीही उत्सुकता वाढली आहे. 

पापुआ न्यू गिनी हा देश म्हणजे, नैऋत्य पॅसिफिकमध्ये, न्यू गिनीचा पूर्व अर्धा भाग आणि त्याच्या किनारी बेटांचा देश आहे. सांस्कृतिक आणि जैविक विविधतेचा देश म्हणून या देशाकडे बघितले जाते.  बहुतांशी पापुआ न्यू गिनी समुद्रकिनारे आणि प्रवाळ खडकांनी व्यापला आहे.  या देशात सक्रिय ज्वालामुखी आहे. शिवाय ग्रॅनाइट माउंट विल्हेल्म, दाट रेनफॉरेस्ट आणि कोकोडा ट्रेलसारखे हायकिंग मार्ग आहेत. येथील पारंपारिक आदिवासी गावे ही देशाची मुळ ओळख आहे. हा देश अगदी छोटा असला तरी त्याची भाषिक वैविधताही बरीच आहे. मुळात प्रत्येक आदिवासी टोळीची एक भाषा आहे. त्यामुळे या देशात, टोक पिसिन, इंग्रजी, हिरी मोटू, पापुआ न्यू गिनी सांकेतिक भाषा अशा विविध भाषा बोलल्या जातात.  पापुआ न्यू गिनी हा देश ऑस्ट्रेलियापासून जवळ आहे.   

गेल्या काही वर्षात चीननं या देशात गुंतवणूक वाढवली आहे. चीनने आपल्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ अंतर्गत येथे गुंतवणूक केली आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये  सोने, तांब्यासारख्या अनेक धातूंच्या खाणी आहे. चीनचा यावर डोळा आहे. चीनने या देशाबरोबर मुक्त व्यापार करारही केला आहे. अशा परिस्थितीत पीएम मोदींचा हा दौरा या क्षेत्रातील संबंध वाढवण्याचा प्रयत्न आहे. (India)

पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी त्यांची अनेक वर्षाची जुनी परंपराही खंडित केली आहे. सामान्यतः पॅसिफिक देश पापुआ न्यू गिनी सूर्यास्तानंतर आलेल्या कोणत्याही नेत्याचे औपचारिक स्वागत करत नाही.  परंतु पंतप्रधान मोदींसाठी ही औपचारिकता दूर सारण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांचे चक्क पापुआच्या पंतप्रधानांनी पाया पडून स्वागत केले. या घटनेनं चीनच्या भुवया वर झाल्याच पण जागतिक राजकारणातही या घटनेची आणि पंतप्रधान मोदी यांच्या पापु न्यू गिनीच्या दौ-याची चर्चा सुरु झाली.  पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा भारत आणि पॅसिफिक देशांसोबतचे संबंध नूतनीकरण करण्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. भारत आणि पॅसिफिक देशांमधले संबंध सध्याच्या काळात खूप महत्त्वाचे आहेत  कारण चीन आपला प्रभाव या देशांमध्ये वाढवत आहे. चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठीही पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे.  

========

हे देखील वाचा : प्राचीन घरांचा वारसा जोपासणारे चेट्टीनाड हेरिटेज टाउन

========

पापुआ न्यू गिनीच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी सोमवारी फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशनच्या तिसर्‍या शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवणार आहेत.  पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मॅरापे या परिषदेचे उपाध्यक्ष असतील. जेम्स मॅरापे देखील असतील. FIPIC या परिषदेत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत.  पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतानंतर या परिषदेतही भारताचे (India) वर्चस्व राहिल हे सिद्ध झालं आहे.  त्यामुळेच चीनची यावर काय प्रतिक्रिया येते हे जाणून घेणंही महत्त्वाचे असेल.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.