Home » Paper Mache : काश्मिरच्या कलाकारांची कला जगभर

Paper Mache : काश्मिरच्या कलाकारांची कला जगभर

by Team Gajawaja
0 comment
Paper Mache
Share

पृथ्वीवरील स्वर्ग अशी काश्मीरची ओळख आहे. बर्फानं आच्छादलेल्या येथील शिखरांवरुन नजर हटत नाही. काश्मीरचे दललेक हे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण. यासोबत काश्मीरची शाल, गालीचे, अक्रोड, सफरचंद, केशर असा अनेक गोष्टींसाठी काश्मीर ओळखले जाते. मात्र अजून एका कलेसाठी काश्मीर ओळखले जाते. ही कला म्हणजे, पेपर माचे (Paper Mache). काश्मीरची पेपर माचे कला म्हणजे, कागदापासून रंगीत आणि सजावटीच्या वस्तू तयार करण्याची कला आहे. (Paper Mache)

पेपर माचे ही काश्मीरची हस्तकला म्हणून ओळखली जाते. जसे काश्मीरच्या घराघरात गालीचे तयार होतात, तसेच येथील पिढ्यानपिढ्या ही पेपर माचे कला करत आहेत. ही कला 14 व्या शतकात मुस्लिम संत मीर सय्यद अली हमदानी यांनी पर्शियातून मध्ययुगीन भारतात आणल्याची माहिती आहे. आता याच कलेनं काश्मीरमधील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार दिला आहे. सध्या परदेशात या काश्मीरच्या कलेनं आपला वर्चस्मा तयार केला आहे. येथून मोठ्या प्रमाणात कलाकुसरीच्या वस्तू तयार होत असून त्याला युरोपीय (Europe) बाजारात मोठी मागणी आहे. मुख्य म्हणजे युरोपच्या ख्रिसमसला सुंदर करण्याचे काम काश्मीरमधील याच पेपर माचे कलेतून करण्यात येत आहे. दरवर्षी काश्मीरमध्ये पेपर माचे कलेच्या माध्यमातून ख्रिसमससाठी लागणा-या शोभेच्या अनेक वस्तू तयार केल्या जातात. (Social Updates)

या वस्तूंना युरोपमधून मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावर्षी तर गेल्या अनेक वर्षांपेक्षा अधिक मागणी काश्मीरच्या पेपर माचे वस्तूंना आल्यामुळे काश्मीरच्या अनेक घरातील महिला या कलेपासून कलाकुसरीच्या वस्तू कऱण्यात गुंतल्या आहेत. ख्रिसमससाठी आत्तापर्यंत 15 कोटी रुपयांच्या पेपरमाचे कलेपासून तयार झालेल्या शोभिवंत वस्तूंची निर्यात कऱण्यात आली आहे. काश्मीरमध्ये दरवर्षी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लागणा-या शोभिवंत वस्तू मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात. या सर्व वस्तू पेपर माचे या काश्मीर हस्तकेलपासून तयार होतात. पेपरच्या लगद्यापासून तयार होणा-या या सर्व वस्तू पर्यावरणपूरक असतात. यंदाही मोठ्या प्रमाणात या पेपरमाचेपासून तयार झालेल्या वस्तूंना मागणी आली आहे. (Paper Mache)

आत्तापर्यंत ख्रिसमससाठी युरोपच्या बाजारात 15 कोटी रुपयांच्या वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. मात्र ही मागणी आणखी वाढल्यानं काश्मीरच्या घराघरातील महिला सध्या पेपर माचे कलेपासून वस्तू तयार करतांना आणि त्या तयार वस्तूंवर कलाकुसर करतांना दिसत आहेत. पेपर माचे ही कला काश्मीरच्या घरात एका पिढी कडून दुसर-या पिढीकडे जाते. या पेपर माचे कलाकुसरीच्या वस्तू दिसायला अत्यंत देखण्या आणि वजनानं हलक्या असतात. त्यामुळे त्यांची मागणी जास्त असते. पेपर माचे ही काश्मीरमधील कला किमान 700 वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते. मध्यंतरीच्या काळात ही कला नामशेष झाल्यासारखे होते. मात्र गेल्या काही वर्षात या कलेचा रोजगार निर्मितीसाठी उपयोग करण्यात आला. ही काश्मीरची मुळ कला पुन्हा तरुणांना शिकवण्यात आली. अनेक महिलांनी पेपर मोचा कलेचे पुन्हा शिक्षण घेतले. त्यातून रोजगार निर्मिती कशी होईल, याचीही माहिती स्थानिक प्रशासनानं दिली. (Social Updates)

=======

हे देखील वाचा : Kashmir : काश्मीरच्या थंडीत कांगरीची गर्मी !

Coconut Oil : आणि खोबरेल तेलाचे कोडे सुटले !

=======

त्याचा उपयोग करत अनेक महिलांना घरगुती स्वरुपात या पेपर माचे कलेपासून वस्तू तयार करण्याला सुरुवात केली. या वस्तूंनी बाजारात योग्य किंमत मिळवून देण्याचे काम प्रशासनानं केलं. आता याच वस्तू परदेशात, विशेषतः अमेरिका, लंडन सारख्या देशात लोकप्रिय झाल्या असून त्यांची वाढती मागणी आहे. आता सांकाक्लॉज सजावटीच्या मेणबत्त्या, ख्रिसमस ट्री, ख्रिसमस बल्ब, घंटा, रेनडिअर, बाहुल्या, तारे, बॉल अशा ख्रिसमस सजावटीच्या वस्तू या पेपर माचे कलेपासून तयार केल्या जात आहेत. ख्रिसमससाठी या वस्तूंची मागणी असली तरी वर्षभर येथील महिला त्याची तयारी करत असतात. तरीही या ऑर्डर पूर्ण करता येत नाहीत, अशी त्यांची खंत आहे. यातूनच युरोपच्या बाजारात काश्मीरच्या कलाकारांनी केलेल्या वस्तूंना किती मागणी आहे, याची कल्पना येते. काश्मीरमधील तरुण, विशेषतः महिला या व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतल्या आहेत. पेपर माचे या कलेसाठी काश्मीरचे मकबूल जान यांना अनेक पुरस्कांर मिळाले आहेत. ते या अनेक तरुणांना मार्गदर्शन करत आहेत. या कलेतून तयार केलेली उत्पादने युरोपियन देश, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि न्यूझीलंड या देशात मोठ्या प्रमाणात पाठवली जातात. (Paper Mache)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.