दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांनी पॅनिको नावाचे 3500 जुन्या संस्कृतीबद्दल गडप झालेली वर्षापूर्वीचे शहर शोधले आहे. कॅरल संस्कृतीशी निगडीत असलेल्या या शहराला गेली आठ वर्ष शोधण्यात येत होतं. पॅनिको नावाच्या या शहरामुळे अमेरिकेतील सर्वात हस्य उलगडण्यास मदत होणार आहे. पेरुमध्ये मिळालेले हे शहर बारांका प्रांतात आहे. पॅसिफिक किनाऱ्यावरील संस्कृतींना अँडीज आणि अमेझॉनच्या संस्कृतींशी जोडणारे व्यापारी केंद्र म्हणून हे पॅनिको शहर काम करीत असल्याचा अंदाज पुरातत्वशास्त्रज्ञांना आहे. यासंदर्भात आता आणखी शोध सुरु करण्यात आला आहे. दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांनी एका प्राचीन शहराला शोधले आहे. बरांका प्रांताच्या उत्तरेस असलेल्या या पॅनिको शहराला तत्कालीन व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख प्राप्त होती. या शहराच्या शोधामुळे कॅरल संस्कृतीबद्दल अनेक नवीन माहिती उघड होणार आहे. (Panico City)
कॅरल ही अमेरिकेतील सर्वात जुनी संस्कृती म्हणून ओळखण्यात येते. मात्र आता त्या संस्कृतीची फारशी माहिती उपलब्ध नाही. पॅनिको शहर सापडल्यानं कॅरल संस्कृतीचा उदय ते तिचा अस्त या महत्त्वाच्या टप्प्यातील घडामोडी जाणता येणार आहेत. हे शहर पेरुची राजधानी लिमापासून 200 किमी उत्तरेस सापडले आहे. पॅनिको शहर समुद्रसपाटीपासून 600 मीटर उंचीवर असून शहराच्या मध्यभागी एक गोलाकार रचना आहे. एका उंच टेकडीवर ही गोलाकार रचना असून त्यामध्ये दोन खांब आहेत. या रचनेच्या सभोवताली दगडी आणि मातीच्या इमारती आहेत. संशोधकांच्या सांगण्यानुसार या रचना 1500 ते 1800 या काळात बांधल्या गेलेल्या आहेत. मात्र या सर्व संस्कृतीवर अरब देशांपासून ते भारतीय संस्कृतीचाही प्रभाव आहे. याच कालखंडात या भागातील संस्कृतीचाही विकास होत होता. त्यामुळे पॅनिको शहरात ज्या रचना सापडल्या आहेत, त्याची वास्तुकला ही संमिश्र स्वरुपाची आहे. पॅनिको शहराचा शोध गेली आठ वर्ष या भागातील संशोधक करत होते. या शोधामध्ये एकूण 18 इमारती सापडल्या आहेत. यात काही मंदिरे असून बाकी मोठी घरे आहेत. (International News)
ही घरे बांधण्याच्या पद्धतीवरुन पॅनिको शहर हे सुनियोजीत शहर असल्याची माहितीही देण्यात आली आहे. पॅनिको शहरात ज्या इमारती सापडल्या आहेत, त्याच्या आतही वैशिष्टपूर्ण वस्तू सापडल्या आहेत. या इमारतीमध्ये मातीच्या मुर्ती आढळून आल्या असून शंख-शिंपल्यांपासून तयार केलेले दागिनेही येथे मिळाले आहेत. यावरुन या पॅनिको शहरात महिलांना बरोबरीचा हक्क प्रदान कऱण्यात येत होते, हे स्पष्ट झाले आहे. कॅरल ही अमेरिकेतील सर्वात जुनी संस्कृती मानली जाते. ही संस्कृती 5000 वर्षांपूर्वी सुपे खोऱ्यात जपली गेली होती. या पॅनिको शहराची संपूर्ण रचना नियोजनबद्ध होती. या पॅनिको शहरात 32 अन्य रचना सापडल्या आहेत. त्यामध्ये पिरॅमिड, सिंचन व्यवस्था यांचा समावेश आहे. कॅरल संस्कृतीमध्ये इजिप्त, भारत, सुमेरसह चीनच्या संस्कृतीचा मिलाफ झालेला असल्याचे मानण्यात येते. कारण या पॅनिको शहरात सापडलेली सिंचन व्यवस्था ही भारताच्या समकालीन रचानांसारखीच आहे. शिवाय या कॅरल संस्कृतीवर चीनच्या संस्कृतींचाही मोठा प्रभाव आढळून येतो. त्यामुळे या काळात पॅनिको मधील नागरिक भारत, चीनसह अन्य देशांबरोबर व्यापार करत असावेत असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. (Panico City)
=============
हे ही वाचा : Elon Musk : द अमेरिका पार्टी !
=============
संशोधनानुसार, पॅनिको हे केवळ एक निवासी शहर होते. पण हे शहर पॅसिफिक किनाऱ्याला अँडीज पर्वत आणि अमेझॉन बेसिनशी जोडणारे एक प्रमुख व्यापारी केंद्र होते. या शहरात अनेक देशातून व्यापारी येत असत. त्यात भारत आणि चीनमधील व्यापारांचाही समावेश असावा असे संशोधकांचा अंदाज आहे. त्यामुळेच या शहरावर अनेक देशांच्या संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. पॅनिको शहरात मोठ्या प्रमाणात शंखांचे हार आणि मातीच्या मूर्तींवरून आढळून आल्या आहेत. त्यामुळे हे शहर व्यापारी, सांस्कृतिक, आणि धार्मिक उपक्रमांचे प्रमुख केंद्र असल्याची माहितीही पुढे आली आहे. सध्या या पॅनिको शहरातील कॅरल संस्कृतीचे संशोधन डॉ. रूथ शीडी करत आहेत. डॉ. रुथ हे कॅरल संस्कृतीचे अभ्यासकही आहेत. त्यांच्यामते, 1500 ते 1800 या दरम्यान पॅनिको शहर विकासाच्या शिखरावर होते, तेव्हाच येथील कॅरल संस्कृतीचाही विकास झाला. आता याच पॅनिको शहराचे आणखीन संशोधन करण्यात येत असून त्यातून कॅरल संस्कृतीचा लोप कसा आणि का झाला, याचा शोध घेण्यात येत आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics