ज्या प्रकारे वैदिक ज्योतिष शास्रात व्यक्तीची कुंडली पाहून तेथील ग्रहांची स्थितींचा अभ्यास करुन व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्यासंदर्भातील काही गोष्टी सांगितल्या जातात. अशाच प्रकारे तळहातावरील रेषांचा ही अभ्यास करत व्यक्तीच्या भविष्याबद्दल खुप काही सांगितले जाते. हस्तरेषेच्या शास्रानुसार, तळहातावरील रेषा आणि निशाणी असतात जे शुभ आणि अशुभचे संकेत देतात. याच्या मदतीने तुम्ही किती भाग्यशाली आहात किंवा नाही हे सुद्धा कळते. (Palmistry)
तळहातावर काही शुभ रेषा असतील तर व्यक्तीला राजयोगाचे सुख प्राप्त होते. तसेच व्यक्तीला आयुष्यात प्रत्येक प्रकारचे सुख मिळते. अशा व्यक्ती काही गोष्टींची जरी कमतरता असेल तरीही यश मिळवण्यात यशस्वी होते. तर जाणून घेऊयात कुठे-कुठे राजयोग सुख देणाऱ्या रेषा कुठे असतात आणि त्याचा अर्थ काय याबद्दल अधिक.
गजलक्ष्मी योग
हस्तरेषा ज्योतिष शास्रानुसार ज्या लोकांच्या तळहातावर मणिबंध पासून सुरु झालेली एखादी रेषा स्पष्ट आणि गडद होत थेट शनि पर्वतावर जाऊन मिळत असेल, तसेच सूर्य पर्वताकडे वर येत असेल, जीनवरेषा आणि आरोग्य रेषा अगदी स्वच्छ असेल तर अशा व्यक्तीच्या हातावरुन त्याला गजलक्ष्मी योग असल्याचे सांगितले जाते. जर अशी रेषा असेल तर व्यक्तीवर नेहमीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. अशी लोक आयुष्यात खुप धन कमावतात. समाजात त्यांना उत्तम मान-सन्मान मिळतो.
शनि पर्वत
जेव्हा एखाद्याच्या हातावर शनि पर्वत वर जात असल्याचे दिसत असेल अथवा चंद्र पर्वतावरुन कोणतीही रेषा निघत असेल आणि शनि पर्वताला मिळाली असेल तर शुभ संकेत मानले जातात. अशा व्यक्तीच्या आयुष्यात उत्तम कामाची कधीच कमतरता नसते. ही लोक प्रत्येक परिस्थितीत आपली संधी निर्माण करतातच. नशीबाची उत्तम साथ लाभते. तसेच ही लोक बोलण्यात खुप हुशार असतात.(Palmistry)
हे देखील वाचा- पायात किंवा हातात काळा धागा का बांधतात? जाणून घ्या काय असतात धागा बांधण्याचे नियम
अमला योग
हस्तरेषा शास्रानुसार असा व्यक्ती खुप धनवान आणि कुश बुद्धीचा असतो ज्याच्या हातावर अमला योग असतो. अमला योग हातावर सुर्य, चंद्र आणि शुक्राच्या परिणामामुळे तयार होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हातावर सूर्य, चंद्र आणि शुक्र पर्वत दिसतो आणि चंद्र पर्वताची एखादी रेषा बुध पर्वतावर जाऊन मिळत असेल तर व्यक्ती धन आणि बुद्धीवान असतो. अशा लोकांना प्रत्येक प्रकारच्या भौतिक सुखाचा लाभ घेता येतो.
ज्या व्यक्तींच्या हातावर शुक्र आणि चंग्र पर्वंत विकसित असतो आणि गुरु पर्वतावर क्रॉस निशाणी असते ती व्यक्ती उद्योग-व्यवसायात खुप यश मिळवते. अशी लोक खुप मेहनती आणि दूरदृष्टी असतात. त्यांच्या आयुष्यात धन-दौलतीची कमतरता नसते.