Home » पाकिस्तानच्या एकमेव डीजे आर्टीस्टला बलात्काराची धमकी…

पाकिस्तानच्या एकमेव डीजे आर्टीस्टला बलात्काराची धमकी…

by Team Gajawaja
0 comment
DJ artist of Pakistan
Share

भारतावर कायम आगपाखड करणा-या पाकिस्तानची मानसीकता किती संकूचित आहे, याचा प्रत्यय नुकताच जगाला आला आहे.  जगभर संगीत क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कार्यरत आहेत.  मात्र पाकिस्तानमध्ये संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका महिलेला (DJ artist of Pakistan) चक्क मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत.  पाकिस्तानमध्ये फार कमी महिला कलाकार संगीत क्षेत्रात आहेत.  यापैकी एक म्हणजे नेहा खान.  नेहा खान ही पाकिस्तानची एकमेव डीजे आर्टिस्ट आहे.  या नेहा खानवर आता पाकिस्तानमधील कट्टरवादी नाराज झाले असून तिला चक्क मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.  पाकिस्तानमध्ये आल्यास तिला थेट विमानतळावरच मारण्यात येईल, अशी धमकी कट्टरवाद्यांनी तिला दिली आहे.  एका संगीत महोत्सवात पुरुष कलाकारांच्या सोबतीनं आपली कला सादर केली, हाच मोठा गुन्हा नेहानं केल्याचं या कट्टरवाद्यांचं म्हणणं आहे.

पाकिस्तानची एकमेव महिला डीजे आर्टिस्ट(DJ artist of Pakistan) नेहा खान सोशल मिडियावर प्रसिद्ध आहे.  नेहाचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर आहेत.  याच नेहा खानवर आता पाकिस्तानच्या कट्टरवाद्यांची नजर पडली आहे. स्वतः नेहानेच तिला येणा-या अनुभवांबाबत एका मुलाखतीमध्ये माहिती दिली.  पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशाच्या उत्तरेकडील खोऱ्यातील हुंजा फेस्ट नावाचा संगीत महोत्सव होतो.  या महोत्सवात नेहा खानने आपला कार्यक्रम सादर केला.  यामुळे तिला मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले.  हुन्जा फेस्टमध्ये सामिल झालेली नेहा ही एकमेव महिला कलाकार होती.  या महोत्सवात अन्य पाच पुरुष कलाकार होते.  आणि एकटी महिला म्हणून नेहा खान होती.  सर्व पुरुषांमध्ये गाणा-या या एकट्या नेहाचे कौतुक होण्याऐवजी तिच्यावर कट्टरवाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.   या संगीत महोत्सवानंतर तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनीही नेहावर अनेक टिकाटिपण्णी केली.   भविष्यात डिजे आर्टिस्ट होण्याचा विचार करु नकोस असाही सल्ला तिला मिळाला.   पण यापेक्षाही गंभीर म्हणजे या महोत्सवात गाणं ऐकायला आलेल्यांनी तिला मारण्याचीही धमकी दिली.  

पाकिस्तानची पहिली आणि एकमेव महिला डीजे(DJ artist of Pakistan) म्हणून नेहा खान जगभरात प्रसिद्ध आहे.  कॅनडामध्ये शिक्षण झालेल्या नेहाला लहापणापासून संगीताची आवड होती.  याच आवडीतून नेहा खान डिजे आर्टीस्ट म्हणून काम करु लागली.  कॅनडामधून शिक्षण पूर्ण करुन पाकिस्तानला आलेल्या नेहानं संगित क्षेत्रात आपलं करिअर करण्याचं स्वप्न बघितलं.  पण हे स्वप्न पूर्ण करतांना तिला अनेक संकटांना तोडं द्यावे लागले.    मोठ्या आवाजात गाणी वाजल्याबद्दल तिच्यावर टिका झाली.  काही काळानंतर तिने तिच्या मित्रांच्या मदतीनं डीजे म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली.   

===========

हे देखील वाचा :उपासमारीच्या लिस्टमध्ये पाकिस्तान, श्रीलंका सर्वाधिक पुढे तर भारत पहा कोणत्या स्थानावर

===========

मात्र नेहाला आता तिचे हेच करिअर तिला त्रासदायक ठरले आहे.  नेहा खानला आता जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत.  असे फोन आणि मेसेजही तिला आले आहेत.  सध्या पाकिस्तानच्या बाहेर असलेली नेहा परत आल्यास विमानतळावरच तिची मान उडवण्याची धमकीही तिला मिळाली आहे.  यात नेहाला अधिक दुःख होतं आहे की पाकिस्तानमधील काही महिलांनीही तिच्यावर टिका केली आहे.  नेहा खान ही पाकिस्तानची पहिली आणि एकमेव महिला डीजे(DJ artist of Pakistan) आहे. याचे तिथे कौतुक न होता तिला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे नेहा आता आपल्या देशाला कायमचा निरोप घेण्याच्या विचारात आहे.  एकूण जगभरात महिला सर्वच क्षेत्रात आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवत आहेत.  मात्र पाकिस्तानच्या संकुचीत मानसीकतेमुळे तेथील कतृत्वान महिलांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी देश सोडण्याची वेळ आली आहे.  

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.