Home » Pakistani Player’s Weird Behaviour : पाकड्यांचे चाळे आजचे नाहीत…

Pakistani Player’s Weird Behaviour : पाकड्यांचे चाळे आजचे नाहीत…

by Team Gajawaja
0 comment
Pakistani Player's Weird Behaviour
Share

एशिया कप (Asia Cup) मधल्या इंडिया-पाकिस्तानच्या Match दरम्यान पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने सेलिब्रेशन म्हणून एक४७ ची Action केली. तसा तो त्यांचा राष्ट्रीय खेळच आहे म्हणा… पण नंतर अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला, तो म्हणजे हरीस रौफ… ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकने भारताचे विमान पाडले अशा आशयाचे तो हातवारे करत होता. दोघांवर जाम टीका तर झाली. मुळात रौफला पाकिस्तानची इकॉनॉमी आणि पाकच्या क्रिकेटची इमेज कशी ढासळत चालली आहे, हे दाखवायचं असावं. भारत आणि पाकिस्तान काही प्रोटोकॉल्सनुसार एकत्र खेळत होते.

त्यानुसार भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हँडशेक केलं नाही, पण कोणालाही डिवचलं नाही. पण दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी आपली लायकीच दाखवली, आणि पायावर धोंडासुद्धा मारून घेतला. पण तुम्हाला माहितीये का हे पहिल्यांदा नाहीये. यापूर्वीसुद्धा पाकिस्तानच्या खेळाडूंनी कित्येक वेळा माती खाल्ली आहे, विचित्र गोष्टी केल्या आहेत. कशाप्रकारे क्रिकेटविश्वास त्यांनी आपली इमेज खराब करून घेतली आहे, चला जाणून घेऊ. (Pakistani Player’s Weird Behaviour)

Pakistani Player's Weird Behaviour

आधी तर हा प्रसंग सांगतो की, पाकिस्तान हा देश कशाप्रकारे सेफ नाहीये. कारण दोन वेळा इंटरनॅशनल टीम्सवर दहशतवादी हल्ले झाले आहेत. एकदा न्यूझीलंडवर होटलमध्ये असताना… 2002 साली न्यूझीलंडची टीम कराचीच्या होटलमध्ये असताना बाहेर भयंकर बॉम्बस्फोट झाले होते. तेव्हा टीम कशीबशी वाचली होती आणि त्यानंतर 2009 साली श्रीलंका टीमवर झालेला मोठा attack … यात अनेक मोठे खेळाडू जखमी झाले होते आणि सुदैवाने बचावले. तसा तो देशच दहशतवादासाठी जन्मलाय म्हणा. या गोष्टी तर घडल्याच पण मैदानातसुद्धा त्यांनी कधीच ही घाणेरडी वृत्ती सोडली नाही.

2014 दरम्यान श्रीलंका आणि पाकिस्तानदरम्यानच्या एका मॅचमध्ये अहमद शेहजाद श्रीलंकेच्या तिलकर्तने दिलशानला चक्क इस्लाम मध्ये कन्व्हर्ट व्हायला सांगत होता. मॅच संपल्यानंतर दोघे आपापल्या ड्रेसिंग रूमकडे जात असताना शहजाद दिलशानला म्हणत होता की, If you are a non-Muslim and you turn Muslim, no matter whatever you do in your life, straight to heaven. दिलशानने उत्तर नाही दिलं… तर हा परत म्हणाला “Then be ready for the fire.”…. हा तोच शहजाद आहे जो एका मध्ये कॅच ड्रॉप करून असं हाताच्या कोपऱ्यात मी कॅच धरल्याचं सांगत येत होता.

===================

हे देखील वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळातील आकाशाची स्थिती

===================

आपल्या सर्वांनाच पाकिस्तानी टीममधला दानिश कनेरियातर माहिती असेल. आता तो माहिती आहे. पण त्याला जे टॉर्चर केलं गेल टीममध्ये हे खूप जणांना माहिती नाही. आपल्या १५ वर्षांच्या करिअरमध्ये पाकड्यांनी कशी माती खाल्ली आहे याचे अनेक खुलासेसुद्धा त्याने केले होते. दानिशने मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितलं होत की शाहिद आफ्रिदीने त्याला धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती केली होती. टीममध्ये असताना त्याच्यासोबत भेदभाव केला जात होता, तसच हिंदू असल्यामुळे सर्व प्लेयर्स त्याला डीवचायचे, असंही त्याने सांगितलं.

पाकिस्तान टीममध्ये असताना कधीच आदर मिळाला नाही. ते लोकं तर दानिश सोबतजेवत सुद्धा नव्हते. टीममध्ये इतकी वाईट ट्रिटमेंट पाकिस्तानी खेळाडूंव्यतिरिक्त दुसरं कोणीही देऊ शकणार नाही. सुधारणारच नाहीत. ते सोडा… पाकिस्तानी टीममधल्या एका क्रिकेटरने Convert केल सुद्धा होतं. तो म्हणजे मुहम्मद युसूफ… जो आधी युसुफ योहाना म्हणजे ख्रिश्चन होता. याचा अर्थ पाकिस्तानी खेळाडूंना मुस्लिम शिवाय दुसरा धर्मीय माणूसंच टीममध्ये नको. किंवा त्याने इस्लाम कबूल करून घ्यावा. (Pakistani Player’s Weird Behaviour)

आता जरा स्लेजिंग विषयावर येऊया. इंडिया आणि पाकिस्तानच्या स्लेजिंग रायव्हलरीला खूप मोठा इतिहास आहे. अगदीच किरण मोरे आणि जावेद मियादाद पासून ते काल परवा झालेल्या हरीस रौफ आणि अभिषेक शर्माची वादावादी असो. असाच एक स्लेजिंग सिन १९९६ च्या वर्ल्ड कपमध्ये झाला होता. आमिर सोहेल आधी बाउंड्रीवर बाउंड्री ठोकत होता. व्यंकटेश प्रसादलाही त्याने बरच हाणल. आणि सारखा action करून दाखवत होता की जिकडे प्लेयर लावशील तिकडे चौका मारीन. यानंतर पुढच्या एका बॉलवर प्रसादने सोहेलचा दांडकाच उडवला… पाकिस्तान्यांची तेव्हापासून आतापर्यंत जिरलीच आहे. पण चरबी काही कमी होत नाहीये. असो पाकिस्तानला खूप खूप शुभेच्छा त्यांचा डाउनफॉल असाच कायम राहो.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.