पाकिस्तान या देशाची दहशत इतकी वाढली आहे की, आता या देशातील नागरिकांवर बंदी घालण्यास जगभरातील देशांनी सुरुवात केली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या दशकापासून पाकिस्तानमधील येणा-या नागरिकांची संख्या वाढली आहे. या वाढत्या नागरिकांसोबत ब्रिटनमध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे स्थानिक ब्रिटीश नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. गेल्या स्थानिक निवडणुकीमध्ये या नाराजीचा फटका स्टारमर सरकारला बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानातून येणाऱ्या निर्वासितांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी ब्रिटन सरकारनं आता व्हिसाचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. (Britain)
बहुतांश पाकिस्तानी विद्यार्थी शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये येतात, आणि तिथेच स्थायिक होतात. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या आणि कामाच्या व्हिसाच्या नियमातही बदल करण्याचा निर्णय स्टारमर सरकारनं घेतला आहे. ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षात पाकिस्तानमधून येणा-या निर्वासीतांची संख्या लक्षणीय वाढली आहे. या लोंढ्यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या सुविधांवर आता बोजा पडायला सुरुवात झाली आहे. शिवाय ब्रिटनमधील ग्रुमिंग गॅंगचे प्रकरण उघड झाल्यावर मोठी खळबळ उडाली होती. अनेक ब्रिटीश संघटनांनी पुढे येत पाकिस्तानमधून येणा-या निर्वासितांवर पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी होऊ लागली होती. या ग्रूमिंग गॅंगमध्ये पाकिस्तानी नागरिकांचा भरणा आहे. या ग्रुमिंग गॅंगनं हजारो ब्रिटीश मुलींचे आयुष्य उदधवस्त केले आहे. त्यातच 10 वर्षीय सारा हिच्या हत्यानंतर ब्रिटनमध्ये ग्रूमिंग टोळ्यांविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. (Latest News)
ब्रिटनमधील अनेक मान्यवर लेखक, चित्रकार, उद्योजक पुढे आले आहेत, आणि त्यांनी या ग्रुमिंग गॅंगनी केलेले गुन्हे समोर आणायला सुरुवात केली आहे. एलॉन मस्क यांनीही ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांना लक्ष्य करत सोशल मिडियावर ग्रुमिंग गॅंगचे वास्तव उघड केले आहे. 1997 ते 2013 च्या दरम्यान इंग्लंडमधील रोदरहॅम शहरात या ग्रुमिंग गॅंगकडून 1500 हजार मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती आहे. त्यातील बहुसंख्य मुली या 11 ते 16 वयोगटातील आहेत. हे अत्याचार पाकिस्तानी वंशाच्या गुन्हेगारांनी केले आहेत. अशा ग्रुमिंग गॅंगनी अनेक ब्रिटीश मुलींना आपल्या जाळ्यात ओढत ड्रग्जचाही व्यापार केला आहे. या सर्वांविरोधात आता ब्रिटनमध्ये आवाज उठवण्यात येत असून स्टारमर सरकारनं पाकिस्तानमधून येणा-यांवर कडक निर्बंध घालावेत अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे स्टारमर सरकारनं व्हिसा अभ्यासासाठी एक समिती स्थापन केली. त्यातून पाकिस्तानचे अनेक नागरिक शिक्षणाच्या बहाण्यानं ब्रिटनमध्ये येत असल्याचे स्पष्ट झाले. (Britain)
हे पाकिस्तानी विद्यार्थी नंतर ब्रिटनमध्येच आश्रय घेत असून त्यांच्याच आधारावर अन्य पाकिस्तानी नागरिक ब्रिटनमध्ये येत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ब्रिटन सरकार आता व्हिसा नियमात बदल करण्यास सुरुवात केली आहे. यात पाकिस्तानला काळ्या यादीत म्हणजेच ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची तयारी सुरु केली आहे. या नवीन व्हिसा धोरणात पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर व्हिसा निर्बंध असणार आहेत. ब्रिटिश गृह कार्यालयाने याबाबत आपले धोरण स्पष्ट केले आहे. नवीन व्हिसा धोरणात पाकिस्तान आणि आणखी काही देशांना ‘उच्च जोखीम’ श्रेणीत वर्ग करण्यात येणार आहे. ब्रिटिश सरकारनं नेमलेल्या समितीनुसार गेल्या वर्षी एक लाख पाकिस्तानी नागरिकांनी ब्रिटनमध्ये आश्रय मागितला होता. त्यापैकी 16 हजार लोक पूर्वी विद्यार्थी व्हिसावर ब्रिटनमध्ये आले होते. यात पाकिस्तानसह नायजेरिया आणि श्रीलंका येथील विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. आता या सर्वांवरच निर्बंध टाकण्याची तयारी ब्रिटनमध्ये सुरु झाली आहे. (Latest News)
==============
हे देखील वाचा : War : पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनेलिया यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक
Operation Sindoor : बलुचिस्तानची हिंगलाज माता !
==============
ब्रिटनमध्ये ग्रुमिंग गॅंग बाबत खुलासा झाल्यावर पाकिस्तानी नागरिकांच्या विद्यार्थी व्हिसाकडे संशयाने पाहिले जात आहे. स्थानिकांमध्ये याबाबत राग वाढत आहे. त्यामुळेच ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या लेबर पक्षाला अलिकडच्या स्थानिक निवडणुकांमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला आहे. बेकायदेशीर स्थलांतर आणि इमिग्रेशन धोरणाचे अपयश यामुळे पंतप्रधानांच्या पक्षाचा पराभव झाल्याची भावना आहे. रेड वॉल गटाचे खासदार जो व्हाईट यांनी सरकारला या निर्वासीतांवर कठोर कारवाई करा, अन्यथा पुढील परिणामांना सामोरे जा, असा इशाराच दिला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून ब्रिटननं पाकिस्तानी निर्वासितांचा ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करण्याचे धोरण स्विकारले आहे. (Britain)
सई बने