Home » पाकिस्तानातील ‘या’ पंतप्रधानांनी भारतात सादर केले होते हिंदू विरोधी बजेट

पाकिस्तानातील ‘या’ पंतप्रधानांनी भारतात सादर केले होते हिंदू विरोधी बजेट

लियाकत अली खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले. त्याआधी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या अंतरिम सरकारमध्ये भारताचे अर्थमंत्री पद भुषवले होते. वर्ष 1946 मध्ये त्यांजी बजेट सादर केले त्याला सोशलिस्ट बजेट असे म्हटले.

by Team Gajawaja
0 comment
Pakistan PM
Share

लियाकत अली खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले. त्याआधी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या अंतरिम सरकारमध्ये भारताचे अर्थमंत्री पद भुषवले होते. वर्ष 1946 मध्ये त्यांजी बजेट सादर केले त्याला सोशलिस्ट बजेट असे म्हटले. मात्र बक्कळ टॅक्समुळे त्यांचे हे बजेट हिंदू विरोधी असल्याचे म्हटले गेले. (Pakistan PM)

जिन्ना यांच्या नंतर ते मुस्लिम लीगचे सर्वात मोठे नेते होते. त्यामुळे जिन्नांनी त्यांना मुस्लिम लीगच्या प्रतिनिधीच्या रुपात अंतरिम सरकारमध्ये जागा दिली. जुन्या संसद भवनात त्यांनी भारतीय अर्थमंत्र्यांच्या रुपात पहिले बजेट सादर केले होते. जे सोशलिस्ट असल्याचे सांगितले गेले. त्यांच्या या बजेटमुळे व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर लागला गेला. त्यांना असे वाटले की, त्यांचा व्यवसाय आता पूर्णपणे ठप्प होणार आहे. एक लाखाच्या प्रॉफिटवर 25 टक्के टॅक्स लावला होता. कॉर्पोरेट टॅक्स दुप्पट करण्यात आला होता. त्याचसोबत काही अन्य कर ही बजेटमध्ये सादर केले गेले. टॅक्स चोरी करणाऱ्यांच्या विरोधात एका आयोगाचे गठन करण्याची घोषणा सुद्धा त्यांनी बजेटच्या भाषणात केली होती.

सरदार वल्लभ भाई पटेलांसारख्या दिग्गज नेत्यांचे असे मानणे होते की, हे बजेट हिंदूविरोधी आहे. त्यांनी असे सुद्धा म्हटले हे विचारपूर्वक उचललेले पाऊल आहे. करंतर त्या वेळी उद्योगात हिंदूंचे वर्चस्व होते. टाटा आणि गोदरेज सारखे पारसी व्यावसायिक ही होते. केवळ एकमेव औषध कंपनी सिपलाचे मालकी हक्क मुस्लिम परिवाराकडे होते. त्याचे संस्थापक होते केए हामिद. त्यावेळी घनश्याम दास बिरला, जमन लाल बजाज सारखे उद्योगपतींचे काँग्रेस सोबत उत्तम नातेसंबंध होते. त्या लोकांना सुद्धा वाटले की, बजेटमध्ये उद्योगच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बिरला आणि बजाज हे महात्मा गांधीचे निकटवर्तीय होते. स्वातंत्र्यता आंदोलनासाठी जेव्हा कधी गरज भासायची तेव्हा ही लोक आर्थिक मदत करायचे.

तर लियाकत अली खान यांच्यावर आर्थिक मंत्र्यांच्या रुपात असा आरोप लावण्यात आला की, ते हिंदू मंत्र्यांच्या प्रकरणात निर्णय घेण्यात विलंब लावत आहेत. सरदार वल्लभ भाई पटले यांनी गृह मंत्र्यंच्या रुपात ठणकावून सांगितले होते की, लियाकत अली खान यांच्या परवानगीशिवाय एक कर्मचारी सुद्धा नियुक्त करायचा नाही. त्यावेळी लियाकत अली खान यांच्या पक्षात सुद्धा माहौल तयार करणारे समोर आले आणि असे म्हटले ही, ते मुस्लिम विरोधी असू शकत नाहीत. कारण त्यांची बेगम ही मूळ रुपात हिंदू होती. बजेटच्या बारक्याव्यांचा अंदाज कोणालाही नव्हता.कारण ते बजेटचे कागदपत्र आपल्या घरातून थेट संसद भवनात पोहचले होते. (Pakistan PM)

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला?
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला होता, जो एक प्रकारे केवळ औपचारिकता होता. यामध्ये कोणत्याही नवीन कराची तरतूद नव्हती. स्वतंत्र भारत सरकारचा नियमित अर्थसंकल्प अवघ्या काही महिन्यांनी येणार होता, म्हणून हे करण्यात आले. लियाकत अली खान यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1895 रोजी हरियाणातील कर्नाल येथे एका राजघराण्यात झाला. अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून बीएससी-एलएलबी आणि ऑक्सफर्डमधून एलएलएम केलेल्या लियाकत अली खान यांनी वकिली हा त्यांचा व्यवसाय निवडला आणि त्याच बरोबर राजकारणात हात आजमावण्यासाठी ते मुस्लिम लीगच्या जवळ आले.

पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनले
नंतर जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना मुझफ्फरनगर, यूपी येथे मालमत्ता मिळाली तेव्हा ते येथेही आले. लियाकत अली खान यांनीही येथून निवडणूक लढवली आणि संयुक्त प्रांतात आमदारही झाले. ते 1932 ते 1940 पर्यंत संयुक्त प्रांत विधान परिषदेचे उपाध्यक्ष देखील होते. काही वेळातच ते मुस्लिम लीगचे मोठे नेते बनले. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न होते, त्यामुळे ते ब्रिटीश राज्यकर्त्यांच्याही जवळ होते. (Pakistan PM)

पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा तेच लियाकत अली खान पहिले पंतप्रधान झाले. 16 ऑक्टोबर 1951 रोजी रावळपिंडी येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सुरक्षा दलांनी हल्लेखोराला जागीच ठार मारले असले तरी ते पंतप्रधानांना वाचवू शकले नाहीत. हल्लेखोर अफगाणी होता, त्यामुळे लियाकत अली खान यांच्या हत्येचे रहस्य हल्लेखोराच्या मृत्यूसोबतच दडले गेले. आजपर्यंत पाकिस्तान सरकारला कळू शकले नाही की त्यांच्या पहिल्या पंतप्रधानाची हत्या का झाली?


हेही वाचा- लोकमान्य टिळकांवर लागला होता देशद्रोहाचा आरोप…


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.