Home » पाकिस्तानातील हिरामंडी कसा बनला वेश्याव्यवसायाचा अड्डा? ज्यावर भंसाली तयार करतायत वेब सीरिज

पाकिस्तानातील हिरामंडी कसा बनला वेश्याव्यवसायाचा अड्डा? ज्यावर भंसाली तयार करतायत वेब सीरिज

by Team Gajawaja
0 comment
Pakistan Heera mandi
Share

प्रसिद्ध फिल्ममेकर संजय लीला भंसाली सध्या आपल्या एका नव्या प्रोजेक्टमुळे फारच चर्चेत आहे. कारण ते पाकिस्तान मधील हीरामंडीवर वेबसीरिज तयार करत आहे. हा एक पीरियड ड्रामा असणार असून त्यामध्ये बॉलीवूड मधील काही अभिनेत्र्यांना यामध्ये कास्ट केले जाणार आहे. ही सीरिजचे काम मोठ्या स्तरावर सुरु आहे. तर लाहौर मधील हीरामंडीला शाही मोहल्ला या नावाने सुद्धा ओळखले जाते. याचे नाव पंजाब प्रांताचा राजा हीरा सिंह नाभा याच्या नावावरुन ठेवण्यात आले होते. हीरामंडीला एकेकाळी तहबीज, मेहमाननवाजी आणि कल्चरसाठी ओळखले जायचे.तसेच मुघलांच्या काळात येथे नर्तिका संगीत आणि नृत्य सादर करुन संस्कृती दाखवत. ऐवढेच नव्हे तर उर्दू भाषा आणि साहित्याचा वारसा वाढण्यात त्यांची सुद्धा महत्वाची भुमिका असायची.(Pakistan Heera mandi)

शाही मोहल्ला का म्हटले जाऊ लागले?
हीरामंडी १५ व्या १६ व्या दशकात लाहौरच्या मुघल काळात उच्चभ्रु वर्गासाठी नर्तिकांचे नाचणे हे संस्कृतिचे केंद्र होते. असे म्हटले जाते की, राजकुमार आणि शासकांना या ठिकाणी पाठवले जायचे. तसेच त्यांना येथे विरासत आणि संस्कृतीची माहिती दिली जात होती. त्यामुळेच त्याचे नाव शाही मोहल्ला असे पडले. परंतु हळूहळू हे ठिकाण मुघलांसाठी वेश्यांचा अड्डा बनला. येथे अफगाणिस्तान आणि उज्बेकिस्तान येथील महिलांना आणण्यात आले होते. अहमद शाह अब्दालीच्या आक्रमणादरम्यान हीरामंडीचे नाव पहिल्यांदाच वेश्यावृत्तीशी जोडले गेले. सैनिकांनी त्या महिलांसोबत वेश्यालय स्थापन करुन त्यांनी त्यांना आक्रमणादरम्यान गुलाम बनवले होते. ब्रिटिश शासन काळात हे पुढे वेश्याव्यवसायाचे केंद्र बनवले.

ब्रिटिशांच्या शासनकाळात हीरामंडीचे सौंदर्य हळूहळू कमी होऊ लागले. इंग्रजांनी नर्तिकांना प्रॉस्टिट्युड असे नाव दिले. अशाच हे मोहल्ले बदनाम होऊ लागले. त्यांनी बळजबरीने नर्तिकांना वेश्या बनवण्यासाठी मजबूर केले होते.

हे देखील वाचा- ‘या’ शहरात माणसांपासून जनावरांपर्यंत सर्वजण आहेत दगडाचे, कहाणी ऐकून व्हाल सुन्न

Pakistan Heera mandi
Pakistan Heera mandi

दरम्यान, सध्या परिस्थिती अशी आहे की लाहौर मधील सर्वसामान्य सुद्धा या ठिकाणाचे नाव घेण्यास थोडे लाजतात. पण संध्याकाळ होताच येथे एक वेगळाच नजारा पहायला दिसून येतो. कारण येथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना शोधण्यासाठी कस्टमर्स येतात. एकमेकांसोबत त्यांचे होणारे बोलणे या सर्व गोष्टी निमुटपणे सुरु असतात. पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्ट्सनुसार, ज्या महिला येथे जबरदस्तीने आल्या आणि वेश्या झाल्या असतील तर त्यांची पुढची पिढी सुद्धा या कामात सहभागी झाली.(Pakistan Heera mandi)

हीरामंडी मधील जी स्थिती आहे त्यासंदर्भात नर्तिकांबद्दल विविध दावे केले जातात. येथील काही महिला आहेत ज्या फक्त मुजरा करतात. त्यांनी असा दावा केला की, त्या कधीच वेश्यावसायात उतरल्या नाहीत. त्यांनी स्वत:ला त्यापासून नेहमीच दूर ठेवले. रात्री ११ ते १ वाजेदरम्यान त्या मुजरा करुन आपले आयुष्य जगत आल्या आहेत. पिढ्यान पिढ्या हे काम पुढे असेच सुरु राहिले आहे. त्या अशा म्हणतात की. आम्ही वेश्यांचा विरोध करतो. पण काही महिला आपला उदरनिर्वाह व्हावा म्हणून वेश्याव्यवसाय करतात. पाकिस्तानातील ही हीरामंडी सकाळच्या वेळेस एका बाजाराप्रमाणे दिसते. येथे तुम्हाला स्वादिष्ट अशा खाण्याच्या गोष्टी मिळतात. मुघल काळातील राजांच्या पायाची शोभा वाढवणारे खुस्सा ही मिळतात. खुस्सा हे एक खास प्रकारचे फुटवेअर आहे. पण रात्र होताच येथील स्थिती पूर्णपणे बदलते आणि येथे मेहफिल सजलेली असते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.