Home » भारतात श्रीमंतांकडे ४० टक्क्यांहून अधिक संपत्ती, तर गरिबांची स्थिती खराब

भारतात श्रीमंतांकडे ४० टक्क्यांहून अधिक संपत्ती, तर गरिबांची स्थिती खराब

by Team Gajawaja
0 comment
Oxfam Report
Share

भारतात श्रीमंत आणि गरिबांमधील अंतर फार अधिक वाढले आहे. ऑक्सफॅमच्या एका रिपोर्टमध्ये (Oxfam Report) याबद्दलची माहिती दिली गेली आहे. सध्याच्या काळात भारतात १ टक्के सर्वाधिक श्रीमंतांकडे देशातील एकूण संपत्तीचा ४० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. दुसऱ्या बाजूला खालच्या बाजूने ५० टक्के लोकसंख्येकडे एकूण संपत्तीचा केवळ ३ टक्के हिस्सा आहे.

WFE च्या वार्षिक बैठकीत जारी केला रिपोर्ट
वर्ल्ड इकोनॉमिक फोरच्या वार्षित बैठकीत आपल्या रिपोर्टमध्ये ऑक्सपॅम इंटरनॅशनलने ही माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतात सर्वाधिक दहा श्रीमंतांवर पाच टक्के टॅक्स लावल्याने मुलांना शाळेत जाण्यासाठी संपूर्ण पैसे मिळू शकतात.

केवळ अदानीवर टॅक्स लावून मिळू शकतात १.७९ लाख कोटी
रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, केवळ एक अरबपति गौतम अदानी यांना २०१७-२०२१ दरम्यान मिळालेल्या नफ्यावर एक टक्का जरी टॅक्स लावला तरीही १.७९ लाख कोटीची रक्कम मिळू शकते. जो भारतातील प्राथमिक महाविद्यालयांसाठी ५० लाखांहून अधिक शिक्षकांची एका वर्षाच्या वेतनाची गरज पूर्ण होऊ शकते.

अरबपतिंवर लावला जाणार २ टक्के टॅक्स
सर्वाइवल ऑफ द रिचेस्ट अशा नावाच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, जर भारतातील अरबपतिंच्या संपूर्ण संपत्तीवर जर दोन टक्के दराने टॅक्स लावल्यास तर देशाला पुढील तीन वर्षापर्यंत कुपोषित लोकांच्या पोषणासाठी ४०,४२३ कोटी रुपयांची गरज पूर्ण होईल.

Oxfam Report
Oxfam Report

रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
रिपोर्टनुसार, देशातील सर्वाधिक १० श्रीमंतर अरबपतिंवर पाच टक्के दराने टॅक्स लावल्यास मिळाली रक्कम २०२२-२३ साठी आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाच्या बजेटपेक्षा १.५ पट अधिक आहे. रिपोर्टमध्ये लैंगिक असमानतेच्या मुद्द्यावर असे म्हटले गेले की, महिला श्रमिकांच्या एका पुरुषाद्वारे कमावण्यात आलेल्या प्रत्येक एक रुपयाच्या तुलनेत केवळ ६३ पैसे मिळतात. (Oxfam Report)

अनुसूचित जातींना मिळणाऱ्या मानधनात तफावत
अशा प्रकारची अनुसूचित जाति आणि ग्रामीण श्रमिकांना मिळाले मानधन यामध्ये फार तफावत आहे. तर प्रगत सामाजिक वर्गाला मिळणाऱ्या मानधानाच्या तुलनेत अनुसूचित जातिला ५५ टक्के आणि ग्रामीण श्रमिकांना ५० टक्के वेतन मिळते.

गरिब अधिक टॅक्स पेमेंट करतातयत
ऑक्सफॅम इंडियाचे सीईओ अमिताभ बेहर यांनी म्हटले आहे की देशातील उपेक्षित लोक-दलित, आदिवासी, मुस्लिम, महिला आणि अनौपचारिक क्षेत्रातील कामगार अशा दुष्टचक्राने ग्रस्त आहेत ज्यामुळे सर्वात श्रीमंतांचे अस्तित्व सुनिश्चित होते. श्रीमंताच्या तुलनेत गरजेच्या वस्तू आणि सेवांवर अधिक खर्च करत आहेत. वेळ आली आहे की, श्रीमंतांवर टॅक्स लावला पाहिजे. हे निश्चित केले पाहिजे की, त्यांना योग्य हिस्स्याचे पेमेंट केले पाहिजे.

हे देखील वाचा- येणाऱ्या पुढील काही वर्षात ‘ही’ शहरं पूर्णपणे पाण्याखाली जाणार?

श्रीमंतांच्या संपत्तीत वेगाने वाढ
ऑक्सफॅमने असे म्हटले आहे की, जागतिक स्तरावर सर्वाधिक श्रीमंत एक टक्क्यांनी गेल्या दोन वर्षात जगातील अन्य लोकसंख्येच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट संपत्ती मिळवली आहे. रिपोर्टनुसार अरबपतिंकडे संपत्ती प्रतिदिन २.७ अरब डॉलरने वाढत आहे. तर कमीत कमी १.७ अरब श्रमिक आता त्या देशात राहतात जेथे महागाई दर वेतनाच्या वाढीमुळे अधिक आहे. जगात गेल्या एका दशकात सर्वाधिक श्रीमंतांनी एक टक्क्याने सर्व प्रकारच्या नव्या संपत्तीचा जवळजवळ अर्धा हिस्सा तरी मिळवला आहे. गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच अत्याधिक धन आणि अत्याधिक गरिबी एकत्रित वाढली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.