Home » Sealand Country : लोकसंख्या दोन, जगातील सर्वात छोटा देश!

Sealand Country : लोकसंख्या दोन, जगातील सर्वात छोटा देश!

by Team Gajawaja
0 comment
Sealand Country | International News
Share

एक असा देश, ज्याची लोकसंख्या फक्त दोन आहे. क्षेत्रफळ 550 square meters. म्हणजे एखाद्या bulding च्या कंपाऊंड एवढी जागा. तरीही या देशाचा स्वतःचा झेंडा आहे, चलन आहे आणि पासपोर्ट आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा देश ब्रिटनच्या अगदी जवळ आहे. पण एकेकाळी जगाच्या एक चतुर्थांश भागावर राज्य करणाऱ्या ब्रिटनला या देशाच काहीच करता आलं नाही. या देशाने अनेकदा ब्रिटनला जेरीस आणलं. या देशाचं नाव आहे सीलँड. हा देश कसा बनला ? काय आहे या देशाची कहाणी ? हे जाणून घेऊ. (Sealand Country)

1966 सालची ख्रिसमसची संध्याकाळ. पैडी रॉय बेट्स, हा रात्रीचे बारा वाजण्याची वाट पाहत झोपलेला आहे. काही दिवसांनी त्याच्या बायकोचा, जोनचा, वाढदिवस आहे आणि पैडीने तिला वचन दिलंय की यावेळी तो तिला असं गिफ्ट देणार, जे ती कधीच विसरणार नाही. आता पैडी कोण होता? हा माणूस आर्मीत मेजर होता. वयाच्या 15 व्या वर्षी आर्मीत गेला, दुसऱ्या महायुद्धात इटली, उत्तर आफ्रिका, आणि मध्य पूर्वेतील मोहिमांमध्ये त्याने भाग घेतला होता. एकदा तर त्याच्या तोंडासमोर ग्रेनेड फुटला होता, मोठ्या मुश्किलीने त्यांचा जीव वाचला. दुसऱ्यावेळी त्याचं विमान कोसळलं, शत्रूंनी त्याला पकडलं, पण हा तिथूनही पळाला! त्या रात्री सुद्धा हा माणूस स्वत:च्या घरातून चोरट्यासारखा पळाला. तर पैडी रात्री स्वत:च्या घरातून निघाला. जवळच समुद्र होता. तिथून बोट घेऊन तो समुद्रात गेला. (Top Stories)

साधारण 20 किलोमीटर समुद्रात गेल्यावर त्याची बोट थांबली. समुद्राच्या मधोमध एक छोटासा किल्ला होता. आता हा किल्ला म्हणजे काही भव्य गड किल्ल्यांसारखा नव्हता. ते दोन खांबांवर उभारलेलं काँक्रीटचं प्लॅटफॉर्म होतं. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी याचा वापर विमानविरोधी तोफा ठेवण्यासाठी आणि जर्मन जहाजांवर हल्ला करण्यासाठी केला होता. या किल्ल्याला इंग्रज रफ्स टॉवर म्हणायचे. युद्ध संपलं, तेव्हा हा किल्ला तसाच सोडून देण्यात आला. कोणी तिथे पुन्हा फिरकलं नाही. (Sealand Country)

पैडी घरातून निघताना या किल्ल्याचा विचार करूनच निघाला होता. रात्रीच्या अंधारात तो तिथे चढला, आणि किल्ल्यावर कब्जा केला. आधी सांगितलं तसं त्याच्या बायकोचा बर्थडे जवळ आला होता आणि त्याने तिला काही तरी असं गिफ्ट देण्याचं वचन दिलं होतं. जे ती कधीच विसरणार नाही. आणि त्याने त्याच्या बायोकोच्या बर्थडेच्या दिवशी, हा किल्ला गिफ्ट म्हणून तिला दिला जोन त्याची बायको तर खूष झाली. दोघं तिथे जाऊन सुट्टी एन्जॉय करायचे, अ‍ॅडव्हेंचर करायचे.(Top Stories)

Sealand Country

पण मग एकदा एका त्याचा मित्र मजा-मस्तीमध्ये म्हणाला, “अरे, तुझा तर स्वतःचा बेट आहे! यावर त्याची बायको हसत म्हणाली, “फक्त नारळाची झाडं, सूर्यप्रकाश आणि झेंडा हवाय, मग देश तयार!” सगळे हसले, पण पैडीच्या डोक्यात ही गोष्ट खट्कली.

काही दिवसांनी त्याने परत एक पार्टी ठेवली आणि तेव्हा तो म्हणाला, “रफ्स टॉवर आता एक नवीन देश आहे. त्याचं नाव असेल सीलँड!” सगळ्यांना वाटलं की पैडी मस्करी करतोय, पण पैडी सिरियस होता. त्याने किल्ल्यावर “सीलँड” असं रंगवलं आणि तिथे राहायला लागला. त्याचं पुढचं पाऊल तर आणखी धमाल! त्या काळात ब्रिटनमध्ये फक्त बीबीसी रेडिओ होता. आणि त्यावर गाणी रात्री उशिराच लागायची. पैडीला आयडिया सुचली – सीलँडवरून रेडिओ स्टेशन सुरू करूया! मग त्याने तिथे रेडिओ स्टेशन उभारलं. जिथे २४ तास गाणी वाजायची, आणि ती ब्रिटनपर्यंत पोहोचायची. लोकांना मजा यायची, पण ब्रिटिश सरकारची डोकेदुखी वाढली. (Sealand Country)

1968 साली ब्रिटिश नौदलाच्या जहाजांनी सीलँडवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी टॉवर पाडून टाकण्याची धमकी दिली. हे पाहून पॅडी रॉय बेट्स याचा मुलगा मायकेल बेट्स याने हवेत बंदुकीने गोळी झाडली आणि त्याने चेतावणी दिली की, सीलँडच्या हद्दीत कोणी येऊ नये!” पण ब्रिटिश सरकारने मायकेलला अटक केली, पण कोर्टात काय झालं? कोर्टाने मायकेलला गुन्हेगार मानण्यास नकार दिला. यामागचं कारण असं होतं की ब्रिटनची समुद्री हद्द किनाऱ्यापासून फक्त ६ किलोमीटरपर्यंत होती. म्हणजेच सीलँड ब्रिटनच्या हद्दीत येत नव्हता. त्यामुळे ब्रिटनचा कायदा सीलँडवर लागू होत नव्हता. मायकेल सुटला, आणि पैडी तर आणखी जोशात आला. त्यानंतर त्याचं म्हणणं असं होतं की, “कोर्टाच्या निर्णयानुसार मी सीलँडवर कोणाचाही खून सुद्धा करु शकतो.” (Top Stories)

पुढे त्याने 1975 साली त्याने 50 मित्रांना सीलँडवर राहण्यासाठी बोलावलं आणि सगळ्यांसमोर सीलँडच्या नव्या संविधानाची घोषणा केली. ७ प्रकरणांच्या या संविधानात सीलँडचा स्वतःचा पासपोर्ट, झेंडा आणि चलन होतं. चलनावर त्याच्या पत्नीचा जोनचा फोटो होता. आणि संविधानानुसार त्याचा मुलगा मायकेल सीलँडचा राजकुमार होता. हळूहळू पैडीने सीलँडवर संसाधनं जमा करायला सुरुवात केली. त्यांनी बोटींने तिथे राशन मागवलं. राहण्यासाठी १० खोल्या तयार केल्या आणि एक जनरेटर लावलं ज्यामुळे खोल्या गरम राहू शकत होत्या. (Sealand Country)

सीलँड कुठल्याही प्रकारे देश म्हणून पात्र नव्हता. कोणत्याही दुसऱ्या देशाने त्याला देश म्हणून मान्यता दिली नव्हती. तरीही त्याच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी घडल्या ज्या एखाद्या देशासोबत घडतात. काही गुप्त कागदपत्रांनुसार, ब्रिटन सरकारने सीलँडला बॉम्बने उडवायचाही प्लॅन केला होता! पण प्रत्यक्षात काहीच करू शकले नाहीत. 1978 साली तर सीलँडवर सत्तापालट करण्याचा प्रयत्न झाला.(Top Stories)

==============

हे देखील वाचा : Dalai Lama : ३० वर्षांपूर्वी गायब झालेला Monk अजूनही जिवंत?

==============

एका ऑस्ट्रियन व्यापाऱ्याने पैडी आणि जोनला ऑस्ट्रियाला बोलावलं. पण हा सापळा होता! पैडी ऑस्ट्रियाला गेल्यावरएक हेलिकॉप्टर सीलँडपर्यंत आलं. त्यातून काही लोक उतरले आणि त्यांनी मायकेलला बंधक बनवलं, त्यातील एका जर्मन व्यक्तीने स्वतःला सीलँडचा पंतप्रधान म्हणून घोषित केलं. पण पैडी काही हार मानणारा नव्हता. त्याने मित्रांसह हल्ला केला, मायकेलला सोडवलं सर्वांना पळवून लावलं आणि एका जर्मनला बंधक बनवलं. त्याच्या सुटकेसाठी जर्मनीकडे 30 लाखांची मागणी केली! प्रकरण इतकं पुढे गेलं की ब्रिटनमधील जर्मनीच्या राजदूताला सीलँडवर येऊन पैडीशी बोलावं लागलं. जर्मनीचा राजदूत स्वतः हेलिकॉप्टरने सीलँडला गेला आणि पैडीशी बोलून त्या राजदूताने जर्मन नागरिकाला सोडवलं. पैडीला तीस लाख कधीच मिळाले नाहीत. पण हा त्याच्यासाठी विजय होता. त्यांनी दावा केला की जर्मनीचा राजदूत त्यांच्याशी करार करण्यासाठी आला होता, याचा अर्थ ते सीलँडला देश म्हणून मान्यता देतात. एका अर्थाने गोष्ट बरोबर होती. (Sealand Country)

ब्रिटिश सरकारकडे पैडीच्या या म्हणण्याला कोणताही उत्तर नव्हतं, ते सीलँडवर हल्ला शकत नव्हते. त्यामुळे त्यांना लज्जास्पद परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं. आणि दुसरा कोणताही पर्यायही नव्हता. म्हणून अनेक वर्षं पैडी आणि त्याचं कुटुंब सीलँडवर आपली सत्ता चालवत राहिले. पुढे 1987 साली ब्रिटनने समुद्री हद्द 6 वरून 22 किलोमीटर केली. आता सीलँड त्यांच्या हद्दीत येत होतं. पण तरीही सीलँडने हार मानली नाही. आज, 2023 मध्येही सीलँड स्वतःला देश म्हणतो. पैडीचं 2012 साली निधन झालं, पण मायकेल सीलँड चालवतो. दोन गार्ड तिथे कायम असतात – हीच सीलँडची लोकसंख्या ! तिथली चलन, टपाल तिकिटं विकली जातात. इतकंच नाही, सीलँडची स्वतःची फुटबॉल टिमही आहे, जी जगभरात सामने खेळते. जगातील सगळ्यात छोट्या अनधिकृत देशाची माहिती तुम्हाला कशी वाटली ?


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.